डॉक्टर ! तुम्हीसुद्धा.....




गर्भलिंग चाचण्या करताना कारवाईच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी सोनोग्राफी सेंटरमध्ये गणपती लक्ष्मीचे फोटो ठेवले जातात. मुलगा असल्यास गणपतीच्या फोटोकडे आणि मुलगी असल्यास लक्ष्मीच्या फोटोकडे केवळ बोट दाखवले जाते. त्याशिवाय सांकेतिक भाषेत इंग्रजीत मंडे आणि फ्रायडे असे सांगितले जाते. मंडेच्या इंग्रजी स्पेलिंगची सुरुवात 'एम' म्हणजे मेल आणि फ्रायडेची सुरवात 'एफ'ने होते. 'एफ' म्हणजे फिमेल असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते.
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाने राज्यातील ६० डॉक्टर गर्भवती महिलांच्या पाच नातेवाईकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. त्यापैकी बहुतांश डॉक्टर पुणे, धुळे जळगावमधील आहेत. दरम्यान, गुप्तपणे अशा चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांवर गुप्तचरांमार्फत नजर ठेवण्यात येत आहे.

गर्भलिंग चाचण्यांप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. त्यासाठी व्हिजिलन्स इतर गुप्तचर यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. या चाचणी करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेसमोरही होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत राज्यातील ६० डॉक्टरांवर कारवाई केली आहे. केवळ डॉक्टरच नव्हे तर गर्भवती महिलेला गर्भलिंग चाचणी करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून पाच नातेवाईकांवरही कारवाई झाली आहे.

गुप्तपणे गर्भलिंग चाचण्या करणाऱ्या केंद्रांवर छापेही टाकण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी सातारा येथे रुग्णवाहिकेत गर्भलिंग चाचणी करताना डॉक्टरांना रंगेहाथ पडकले होते. पण आरोग्य विभागाच्या भरारी पथकाला प्रत्येक वेळेस संबंधितांना रंगेहाथ पडकता येत नाही. राज्यात कारवाई होत असल्यामुळे गर्भवती महिलांना शेजारील राज्यांतही नेले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

देशात 'अच्छे दिन' येणार.....



देशात 'अच्छे दिन' येणार, असा विश्वास जनतेला देऊन पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आदल्याच दिवशी भारताला एक चांगली बातमी मिळाली आहे. पाकिस्ताननं आज भारताच्या १५१ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे. भारत-पाक मैत्रीच्या नव्या अध्यायाचा हा शुभारंभ ठरावा, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी दिले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भाजपनं नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं होतं. ते स्वीकारून शरीफ उद्या मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहेत. त्यानंतर २७ मे रोजी द्विपक्षीय संबंधांबाबत भारत-पाकमध्ये चर्चाही होणार आहे. या सर्व घडामोडींचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. दोन्ही देशांना 'अमन की आशा' असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर, पाकिस्ताननं १५१ भारतीय कैद्यांची सुटका करण्याची घोषणा काल केल्यानं सगळ्यांनाच सुखद धक्का बसला होता. त्यानंतर आज कराची तुरुंगातील ५९ कैद्यांना पाकनं मुक्त केलं. थोड्याच वेळात हैदराबाद तुरुंगातून ९१ कैदी सोडण्यात आले. या कैद्यापैकी १५० जण मच्छिमार आहेत. हे सर्वजण लाहोरकडे निघाले असून वाघा सीमेकडून सोमवारी भारतात प्रवेश करणार आहेत. म्हणजेच, मोदींच्या शपथविधीआधी हे भारतीय नागरिक स्वगृही परतलेले असतील. स्वाभाविकच, त्यांच्या कुटुंबीयांसाठी उद्यापासून 'अच्छे दिन' सुरू होणार आहेत. पाककडून पुढेही असंच सहकार्य मिळत राहावं, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केलेय.

श्रीलंकेचीही खुशखबर

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला येण्याआधी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनीही भारतीयांना खुशखबर दिली आहे. तेही श्रीलंकेतील सर्व भारतीय कैद्यांची सुटका करणार आहेत. सद्भावना म्हणून आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय.

अंधश्रद्धेच्या आहारी

 अंधश्रद्धेच्या आहारी जात मुंबईतील मुलीशी जमलेले लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार्याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. मात्र आता या व्यापार्याने तिसर्या मुलीशी लग्नाचा घाट घातल्याची माहिती हाती आल्याने याविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे समितीच्या वंदना शिंदे यांनी सांगितले. भांडुप येथे राहणार्या आणि वांद्रे येथे सोन्याचे दुकान असणार्या एका सराफाने मुंबईतील एका मुलीशी विवाहाची बोलणी सुरू केली होती. मात्र अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या त्याच्या आईवडिलांनी दोघांची कुंडली एका मांत्रिकाला दाखविली. त्यात त्यांचेगुणजुळत नसल्याचे मांत्रिकाने सांगताच जमत आलेले लग्न व्यापार्याने मोडले. म्हसवडजवळील रांजनी हे या व्यापार्याचे गाव आहे. आता या व्यापार्याने आणि त्याच्या आईवडिलांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह ठरविला. दहावीतील आपल्या मैत्रिणीचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठ्या असणार्या इसमाशी लावला जात असल्याची माहिती तिच्या मैत्रिणींना कळली. त्यांनी ही माहिती वंदना शिंदे यांच्यामार्फत सातारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांना कळविली. पोतदार यांनी गुप्त माहिती काढून विद्यार्थिनीसोबत विवाह होत असल्याची खात्री करून घेत ही बाब सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल पांडे यांच्या कानावर घातली. पांडे यांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश म्हसवड पोलीस ठाण्याला दिले. पोलिसांनी वेगाने हालचाली करून त्या अल्पवयीन मुलीच्या वयाचा पुरावा मिळविला आणि त्यानंतर ताबडतोब तिच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १४९ अन्वये अल्पवयीन मुलीचे लग्न करण्याची ताकीद दिली. अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा डाव उधळला जाताच या व्यापार्याने त्या मुलीच्या आईवडिलांवर दबाव आणत जून रोजी अन्य मुलीसोबत लग्न करण्याचा घाट घातला असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत विवाह होत असल्याची माहिती मिळताच आम्ही धुळदेवला जाऊन संबंधित मुलीच्या नातेवाइकांना कायदेशीर नोटीस दिली आहे. नवर्याकडील मंडळी जर लग्नासाठी आताच आग्रह धरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हसवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक कोरे यांनी सांगितले.


"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...