पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्या आठवणी...

इमेज
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची. *ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची... *Moti* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं. *शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं... *दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं... *थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं... *चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे, *पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे... *गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं... *खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं. *गोट्या,विटीदांडू,लपाछपी........* कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा... *काचाकवड्या,जिबली* नाहीतर..... *भातुकलीचा* डाव मांडायचा... अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं... नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं... *गणगाटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा... *शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा... पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची... *बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळ

जुगलबंदी

इमेज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज, क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन आणि महान गोलंदाज, फिरकीचा बादशहा शेन वॉर्न यांच्यातलं द्वंद्व,जुगलबंदी प्रत्येकाला माहिती आहे. बहुतांश वेळा सचिनने शेन वॉर्नची धुलाई केलेली आहे. शेन वॉर्नबद्दल सचिनच्या अनेक खेळी गाजलेल्या आहेत. "सचिन कधीकधी पुढे येऊन वॉर्नला आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यासाठी भाग पाडायचा. कधीकधी बॅकफूटला जाऊन तो सुरेख फटके खेळायचा. एका प्रकारे हे शेन वॉर्नला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्यासारखं होतं. शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर फार कमी फलंदाज मोठे फटके खेळू शकायचे, सचिन त्यापैकी एक होता. सचिनला बाद करण्यासाठी शेन वॉर्न आपल्या शैलीत अनेक बदल करायचा पण यामध्ये त्याला फारसं यश लाभलं नाही." सचिन आणि शेन वॉर्न कसोटी सामन्यात १२ वेळा समोरासमोर आले, यापैकी ३ वेळा सचिन शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर बाद झाला. तसेच राजकारणी लोक आणि सर्वसामान्य माणसे जेव्हा आमने सामने तेव्हा काय धमाल उडते वाचा.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता आपल्या  फेसबुकवरुन ‘आपुलकीचा संवाद’ या नावाने जनतेशी संवाद साधला. पाच वाजता त्य

दूरदर्शन

इमेज
  मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं हे हमाल दे धमाल या चित्रपटातील हे अप्रतीम गाणे आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रीत झाले होते.विनोदाची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध नट होते आणि खरंच हे गाणे म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवासपट म्हणावे लागेल.ते आले, त्यांनी पहिले,ते लढले आणि जिंकून घेतलं सारं.अशा या लोकप्रिय नटाला लोकांनी डोक्यावर घेतले.तुम्ही ही घराबाहेर या लॉकडाऊनचा कालावधी संपल्यावर तुमचे स्वागत आहे.तुम्ही ही पहा पण टीव्हीतून न्यूज,मालिका,गाणे,चित्रपट बघा चांगली पुस्तके वाचा.तुम्ही ही लढा बाहेर पडतांना काळजी घ्या अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडा.रोज रोज शतपावली,औषधे,भाजीपाला,दुध,किराणा आणण्यासाठी अशी कारणे देऊन लढायला जाऊ नका.अशी लढाई जिंकून तुम्ही काहीही साध्य करणार नाही अशी हिरोपंती करून लोक तुम्हांला डोक्यावर नाही तर कुठे ठेवतील याचा विचार तुम्ही नक्कीच करा.     आजच्या काळातंल,आजच्या प्रेक्षकवर्गाला आजचं मनोरंजन पुरवणारं आजचं माध्यम म्हणजे टीव्ही (मालिका)आणि मोबाईल (वेब सीरिज). दूरदर्शनने छोटया पडद्यावरील मालिकाविरांना स्वतः

शब्द काही सूचेना....

इमेज
खरंच खूपच छान कविता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे डावपेच, डोळ्यात पाणी आणणारे 'श्याम ची आई' पुस्तक,जबरदस्त गाजलेले नाटक 'ती फुलराणी' आणि तुकोबांचे अभंग तसेच विस्फारलेल्या डोळ्यांनी वाचलेले खगोलशास्र चादोबा आणि फास्टर फेणे यांच्याशी झालेली दोस्ती आम्हांलाही आठवतात त्या पुस्तकातल्या गोष्टी...

फास्टफूड की सुपरफूड्स ...

इमेज
     'सुपरफूड्स' हा शब्द ऐकल्यावर कदाचित वाटेल की हे अन्नपदार्थ आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील का? आपल्याला परवडतील का? आपल्या जवळपासच्या दुकानामध्ये हे मिळतील का? पण अशी कोणतीही शंका तुमच्या मनात असेल तर ती तुम्ही लगेच काढून टाका काजू बदाम,अक्रोड म्हणजे सुपरफूड्स नव्हे असे अन्नपदार्थ जे आपण पिढयानपिढया खात आलो आहोत.आपल्याच परिसरात सहजपणे पिकणारे, वाढणारे धान्य,कडधान्य,फळे,भाज्या म्हणजेच सुपरफूड्स.     वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये कायम प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असतात. त्यामुळे दूध, पनीर या पदार्थांचा आहार समावेश करायला हवा. त्यासोबतच शेंगा आणि डाळींचाही आहार समावेश करावा.ज्या पदार्थांमधून शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं. गहू, ब्राऊन राईस, धान्य यामधून शरीराला मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. त्यासोबतच ताजी फळं, बटाटे, सुकामेवा आणि आंबा यांच्यामुळेदेखील कार्बोहायड्रेट्स वाढण्यास मदत होते.ज्या पदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचा अंश जास्त

एक छोटासा प्रयत्न...

इमेज
राजकारण हा विषय मलाच काय? कोणालाही न समजणारा विषय आहे तरी या विषयावर नेहमी शांत बसणारे माणसे देखील भरभरून बोलायला लागतात किती प्रेम किती जिव्हाळा असतो त्यांचा या विषयावर राजकारण इतिहासात देखील होते त्यांचे ज्वलंत उदाहरणे म्हणजे रामायण आणि महाभारत.शहाणे लोकांनी कोर्टाची पायरी चढू नयेत असे म्हणतात तसेच राजकारणावर बोलू काही त्यापेक्षा शांतपणे बसणे केव्हाही योग्यच म्हणावे लागेल. न्यूज चॅनलवाले मात्र आपले काम व्यवस्थित करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.श्रीमंत लोकांनाकडून लॉक डाऊन काळात कोणाकडून किती देणगी मिळाली किंवा लॉकडाऊन असताना श्रीमंत लोक घरात काय करतात? तसेच गरीब लोक कसे जगतात त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि सरकार त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करते याबद्दल न्यूज चॅनलवाले जीव मुठीत धरून पुढाकार घेतांना दिसत असले तरी मध्यमवर्गी लोकांचे काय? त्यांच्याकडे तर सरकारचे दुर्लक्षच आहे.निदान न्यूज चॅनलवाल्यांनी तरी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लॉकडाऊन मुळे आरोग्य,उदयोगधंदे,नोकरी आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. लॉकडाऊन मुळे

मराठी पाऊल पडते पुढे...

इमेज
    टीव्हीला छोटा पडदा म्हणण्याचे दिवस आता गेले. आता हाच छोटा पडदा मोठा झाला आहे आणि बॉलिवूडलाही टक्करही देत आहे. टीव्ही कलाकार आता बॉलिवूडकरांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अनेक शिफ्ट्समध्ये त्यांना काम करावं लागतं. मालिकेमधील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक महिने, वर्षे लागतात. टीव्हीवरील असाच एक नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम.       सोनी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'सीआयडी'मध्ये अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली. साटम सीआयडीच्या भागांसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करत. सीआयडीच्या टीमचे ते फार जुने सहकारी आहेत. साटम यांनी अभिनयाच्या जोरावर एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे.‘कुछ तो गडबड है’ हा संवाद ऐकला की आजही डोळ्यासमोर शिवाजी साटम यांचाच चेहरा येतो.पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शिवाजी साटम किती मानधन घ्यायचे? ‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवाजी साटम एका एपिसोडसाठी साधारणपणे १ लाख रुपये घ्याय

शो मस्ट गो ऑन...

इमेज
 मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बॅंक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. अनेक कम्पन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात.     मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केन्द्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.अशी ही आमची मुंबई आमच्या मुंबईला मायावि नगरी सुध्दा म्हटले जाते.असे म्हणतात मु

संधी की सुर्वणसंधी

इमेज
  गेला आठवडाभर शेअर बाजारात मंदी आहे. देशांतर्गत आर्थिक स्थिती नाजूक असतानाच करोना विषाणूची बाधा शेअर बाजारालाही झाल्याने गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा आकर्षक भावात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने या संधीचा फायदा घेता येईल. मात्र नवीन खरेदी अथवा विक्रीही टप्प्याटप्प्याने केली जावी.काही गुंतवणूकदारांची परिस्थिती ही किनाऱ्याजवळ गळ टाकून बसलेल्या व्यक्तीसारखी असते. मासे तर पकडायचे असतात पण खोल पाण्यात जायचे नसते. यांची अपेक्षा असते की, एखादा मासा किनाऱ्याजवळ येईल आणि गळाला लागेल. तर असे गुंतवणूकदार जेव्हा एखादा शेअर घेतात तो किंमत कमी म्हणून घेतात आणि कधी तरी तो वाढेल या भावनेने त्याला वर्षांनुवर्षे ठेवतात. अशा भावनेने घेतलेला शेअर कालांतराने मोठी कमाई करून देऊ शकतो असाच एक शेअर मी तुमच्या साठी माझी गुंतवणूक या पोस्टमधून घेऊन आलो आहे.    सुमारे ११० वर्षांपूर्वी इम्पेरियल टोबॅको कंपनी या नावाने स्थापन झालेली आयटीसी ही देशातील एक अग्रगण्य एफएमसीजी मार्केटर आहे. सुरुवातीला केवळ तंबाखू आणि सिगारेट उत्पादनात असलेली

आरोग्यधन संपदा - हेल्थ आणि वेल्थ

*आरोग्य म्हणी* १. खाल दररोज गाजर-मुळे,     तर होतील सुंदर तुमचे डोळे. २. सकाळी नाश्ता करावा मस्त,     मोड आलेले धान्य करावे     फस्त. ३. डाळी भाजीचे करावे सूप,     अखंड राहील सुंदर रूप. ४. तरोट्याच्या भाजीला म्हणू     नका स्वस्त,     आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ५. जवळ करा लिंबू संत्री,      दूर होईल पोटातील वाजंत्री. ६. पपई लागते गोड गोड,     पचनशक्तीला नाही तोड. ७.पालेभाज्या घ्या मुखी;    आरोग्य ठेवा सदा सुखी. ८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;     आरोग्य धोक्यात आणू नका. ९. दररोज एक फळ खावू या;     आरोग्याचे संवर्धन करु या. १०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;        थांबवेल आरोग्याचा ऱ्हास. ११. प्रथिने, जीवनसत्वे आणि       क्षार;       आहारात यांचे महत्व फार. १२. हिरवा भाजीपाला खावा        रोज;         राहील निरोगी आरोग्याची        मौज. १३. जेवणा नंतर केळी खा;         पचनशक्तीला वाव द्या. १४. साखर व तूप यांचे अती        सेवन करु नका,        मधुमेह व लठ्ठपणाला       आमंत्रण देऊ नका. १५. खावी रोज रसरशीत फळे;         सौंदर्यवृद्धीसाठी नको        प्रसाधन वेगळे. १६. गालावर खेळते सदा हास्य,         फळे व

दोन शब्दाची जादू...

इमेज
कोरोनामुळे  असलेल्या लॉकडाउन दरम्यान अशाप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.कृपया असे काहीतरी करू नका जेणेकरून तुम्ही अडचणीत याल काळजी घ्या. पोस्ट करतांना विचार करा.कोणतीही पोस्ट आली की फॉरवर्ड करू नका.पोस्ट आधी वाचा,विचार करा आणि मगच पोस्ट करा. फक्त दोन शब्दाची जादू आहे एक म्हणजे प्लीज आणि दुसरा शब्द म्हणजे थॅक्यू.                         प्रसंग पहिला एका वर्गात शिक्षकांनी विचारले: "प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?" बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात उत्तर दिले: "ताजमहाल"फक्त एक विध्यार्थी म्हणाला "रामसेतू" !शिक्षकांनी विचारले: "कसे ?" विध्यार्थी म्हणाला "रामसेतू प्रभू श्रीरामांनी आपल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी बांधला आणि तो सेतू बांधायचे काम झाल्यावर त्यांनी स्वार्थीपणे  बांधकाम करणाऱ्या वानरांचे हात नाही कापले तर, तर त्यां सर्

एक नाणे आणि दोन बाजू...

इमेज
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं नाही तर हा कालावधी वाढूही शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि कृपया आपल्या घरातच रहा कारण लॉकडाउन वाढविणे किंवा कमी करणे हे आपल्याच हातात आहे हे नेहमी लक्षात ठेवा.आपण स्वतः घरातच लॉक होऊन कोरोनाला डाउन करणे म्हणजेच  लॉकडाउन. एकीकडे करोनाबाधित रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे ‘सारी’ आजाराचेही (सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) सावट निर्माण झाले आहे.  विदर्भात सारीचे सुमारे साडेतीनशे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी हवालदील झाले आहे.           कोरोनाने शेअर बाजरात धुमाकूळ घातला २० जानेवारीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर ४२,२७३ चा उच्चांक मारत १३ मार्चला विक्रीचे दहा टक्क्यांचे खालचे सर्किट लागत २९,३८८ चा नीचांक नोंदविला गेला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १२,४३० च्या उच्चांकावरून ८,५५५ चा नीचांक नोंदवला. उ

थोडक्यात पण महत्वाचे...

इमेज
हा विषाणू घरगुती जंतुनाशके आणि विरंजक पदार्थ (ब्लीच) वापरून, किंवा साबण व पाण्याने सतत हात धुण्याने मारला जाऊ शकतो, असे हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. कोविड-१९ विषाणू स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या पृष्ठभागांवर ४ दिवसांपर्यंत, तर फेस मास्कच्या बाहेरच्या स्तरावर एका आठवडय़ापर्यंत चिकटून राहू शकतो हा विषाणू सामान्य तापमानात निरनिराळ्या पृष्ठभागांवर किती काळपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो याची संशोधकांनी चाचणी केली. छापील कागद व टिश्यू पेपरवर तो ३ तासांपेक्षा कमी वेळ टिकला, तर प्रक्रिया केलेले लाकूड व कापडावरून तो दुसऱ्या दिवसापर्यंत नाहीसा झाला. काच आणि चलनी नोटा यांवर तो दुसऱ्या दिवशीही दिसत होता, मात्र चौथ्या दिवशी तो नाहीसा झाला. मात्र, स्टेनलेस स्टील व प्लास्टिक यांवर तो ४ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत होता. धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या फेस मास्कच्या बाहेरील स्तरावर हा विषाणू ७ दिवसांनंतरही संसर्गक्षम असल्याचे दिसले. त्यामुळेच, सर्जिकल मास्क वापरताना तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे या संशोधका