पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फेसबुक प्रोफाइल खोटं असेल तर...

इमेज
सोशल नेटवर्किंगमुळे सेलिब्रिटीज चाहत्यांच्या अधिक जवळ आले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत, सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने खोटी प्रोफाइल्स बनवून त्यात गैरप्रकार होण्याचे प्रकार वाढले आहेत. सेलिब्रेटीजनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली असली तरी खोट्या प्रोफाइल्सना आजही लाखोच्या संख्येने हिट्स मिळतायत. अशा बनावट सेलिब्रिटी प्रोफाइल्सपासून आपणही सावध राहणं आवश्यक झालं आहे. कशी ओळखावीत? सर्वसामान्यपणे ख-या सेलिब्रिटीजची पेजेस व्हेरीफाइड असतात. ज्यामध्ये सेलिब्रिटीच्या नावापुढे निळ्या रंगाची, बरोबर असं दर्शवणारी अशी टिक असते, जी फेसबुककडूनच व्हेरीफाइड म्हणून पुरवली जाते. पेजला व्हेरिफाइडची टिक नसेल तर त्या पेजशी ऑफिशिअल वेबसाइट्सच्या लिंक कनेक्ट केलेल्या असतात. खोट्या पेजवरुन शेअर होणारा आशय अनेकदा इंटरनेटवर असणारे फोटो किंवा बातम्यांच्या लिंकच असतात. ख-या प्रोफाइलवरुन अनेकदा सेलिब्रिटीजचे आधी न पहिलेले फोटो आणि खासगी मतं शेअर केली जातात. फेसबुक शिवाय ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अनेक सेलिब्रिजची खोटी अकाऊंटस असून त्यांनाही ला