विलफूल डिफॉल्टर्स म्हणजे काय?

विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने जवळपास 7000 कोटी रुपयांची बँकांची कर्जे बुडवल्याच्या बातम्या काही महिने झळकत आहेत. परंतु, आर्थिक समस्यांची कारणं देत किंवा नादारी जाहीर करत बँकांच्या पैशांवर डल्ला मारणारे 5,275 विजय मल्ल्या भारतात असल्याचे क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड किंवा सिबिलने म्हटले आहे. कर्जदारांच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. 
विलफूल डिफॉल्टर किंवा स्वेच्छेने कर्जाचा हप्ता बुडवणाऱ्यांनी थकवलेली कर्जे गेल्या 13 वर्षांमध्ये नऊपटीनं वाढली आहेत. इंडियास्पेंडने सिबिलच्या माहितीचा आढावा घेतला असता, अशा 5,275 विलफूल डिफॉल्टर्सनी भारतीय बँकांचे 56,521 कोटी रुपये थकवल्याचे आढळले आहे.
विलफूल डिफॉल्टर्स म्हणजे काय?
ज्यावेळी आर्थिकदृष्ट्या शक्य असूनही कर्जदार मुद्दामहून कर्जाचा हप्ता भरत नाही त्यावेळी बँक अशा कर्जदाराला विलफूल डिफॉल्टर म्हणून घोषित करते. या यादीमध्ये विजय मल्ल्या चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबईतील विनसम डायमंड्स अँड ज्वेलरी (3,263 कोटी रुपये), बीटा नाफ्थोल (951 कोटी रुपये), कानपूरची रझा टेक्सटाइल (694 कोटी रुपये) या कंपन्या पहिल्या पाचात आहेत.
स्टेट बँकेला सगळ्यात जास्त फटका
विलफूल डिफॉल्टर्सनी थकवलेल्या एकूण कर्जातला एकट्या स्टेट बँकेचा वाटा 32 टक्क्यांचा आहे. 2002 मध्ये विलफूल डिफॉल्टर्सची थकित कर्जे 6,291 कोटी रुपये होती जी 13 वर्षांमध्ये नऊपटीने वाढून 56,521 कोटी रुपये झाली आहेत. 
काही तज्ज्ञांच्यामते बँकांचे अध्यक्ष, ऑडिटर्स, रिझर्व्ह बँक आणि बँकांच्या संचालक मंडळावरील काही सदस्य यांच्यामध्ये असलेल्या लागेबांध्यांमुळे थकित कर्जे इतकी प्रचंड वाढली आहेत.
महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा
- 5,275 विलफूल डिफॉल्टर्सपैकी 1,138 कर्जबुडवे महाराष्ट्रातले असून त्यांनी थकवलेली कर्जे 21,647 कोटी रुपयांची आहेत.
- त्याखालोखाल पश्चिम बंगाल (710) आणि आंध्र प्रदेशचा (567) क्रमांक लागतो.
- दिल्लीमधल्या विलफूल डिफॉल्टर्सनीही 7,299 कोटी रुपयांची कर्जे थकवली आहेत.
- थकित कर्जांचा सगळ्यात मोठा फटका सरकारी बँकांना बसलेला असून त्यांचा हिस्सा तब्बल 79 टक्के इतका आहे.

पण मिडीया झोपलीय...

 पण मिडीया झोपलीय....

कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. पण मिडीया झोपलीय. मिडिया आणि लोकांना क्रिकेट शिवाय इतर स्पोर्ट्स कुठे रस आहे.

शरीराला_आवश्यक_खनिजं

शरीराला_आवश्यक_खनिजं
Minerals we need➖
कॅल्शिअम
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
लोह
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
सोडिअम
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
आयोडिन
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
पोटॅशिअम
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
फॉस्फरस
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
सिलिकॉन
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
मॅग्नेशिअम
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
क्लोरिन
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🔸खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔸
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यत ो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत

"एक्सपायरी डेट"


एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.
आपण ही आजच तपासा!
जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो गॅस सिलेंडर म्हणजे
आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे. त्यामुळे खालील सुचना वाचून
आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. कारण आपलं जीवन
आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे.
कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट.
सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन
रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची
एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या
अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी
डेट लक्षात येते.
उदाहरणार्थ :
A - जानेवारी ते मार्च
B - एप्रिल ते जून
C - जुलै ते सप्टेंबर
D - आॅक्टेबर ते डिसेंबर
या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!
समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A15 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी
डेट अाहे मार्च 2015. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2015 नंतर वापरणे गृहिणीसाठी
घातक आहे.

खरा सेल्फी........!

खरा सेल्फी........!

दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ?
कुणावर ओरडलो ?
कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ?
काय नको तसे वागलो,
काय हवे तसे वागलो,
. . . वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . . !!

रात्री या सर्वांचा विचार करायचा, जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा. . .
....चेहर्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाचा सेल्फी महत्वाचा असतो.

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...