गुढी पाडवा शोभायात्रा २०२५
नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात सुरु झाली.कळवा सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित शोभा यात्रेचे हे २१ वे वर्ष आहे. संस्थेने सर्वांना समाजप्रबोधन हा विषय दिला होता, सर्व संस्थेने विषय छान मांडला होता, साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्य भरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज अन् वेशीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या.या शोभायात्रां मध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या. तर आपण पण भेट देउन सर्व दाखवायचा प्रयत्न केला आहे तर वीडियो पूर्ण पहा आणि शेयर नक्की करा. युट्यूब लिंक खाली दिली आहे नक्कीच पहा https://youtu.be/Zu2fSn_osTg?si=LeaFhqME5nKqqW-A धन्यवाद. प्रसन्नतेचा साज घेवून आले ...