सौ. यशोदाबेन नरेंद्र मोदी यांच्या त्यागाची कथा

सौ. यशोदाबेन नरेंद्र मोदी यांच्या त्यागाची कथा ->नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातमधील एका गरीब चहाविक्रेत्याच्या घरी झाला. लहानपणापासूनच धाडसी असलेले मोदी वयाच्या ८व्या वर्षापासून लक्ष्मण इनामदारांच्या प्रेरणेने राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जावू लागले व प्रखर राष्ट्रसेवक बनले.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण करुन पुर्णवेळ होवून संघाचे प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संघाचे पुर्णवेळ प्रचारक होण्यासाठी अविवाहीत असणे आणि स्वतःचे असे घर नसणे या मुख्य अटी आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे न ऐकता त्यांच्या लहाणपणीच सक्तीने त्यांचा विवाह १७ व्या वर्षी यशोदाबेन यांच्याशी केला. भारतमातेच्या सेवेचा ध्यास लागलेल्या मोदीचे मन संसारात अजिबात रमले नाही. त्यांनी यशोदाबेनला आग्रहाने पुढील शिक्षण घेण्यास सांगितले. तसेच, “मला राष्ट्राच्या सेवेसाठी संपूर्ण भारतभर फिरावे लागते व त्यामुळे घरी येता येत नाही”, असे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यावर यशोदाबेन पण त्यांच्याबरोबर घर सोडुन देशभर सेवेसाठी फिरायला तयार होत्या. मात्र महिलांसाठी संघात तशी व्यवस्था नव्हती.लग्नाच्या पहिल्या ३ वर्षात मोदी एकूण ३ महिनेच फक्त घरी आले असतील अन्य ३३ महिन्यांच्या काळात ते देशसेवेसाठी भारतभर भ्रमणच करत होते. त्यामुळे शेवटी यशोदाबेनने मोदींच्या राष्ट्रसेवेच्यामार्गात अडथळा न बनण्याचे ठरवून त्यांना पूर्णवेळ संघाचे प्रचारक होण्यास मोकळीक दिली व स्वतः माहेरी प्राथमिक शाळेत शिक्षकाचे काम करु लागल्या. एकडे मोदींनी २० व्या वर्षी घर कायमचे सोडले त्यानंतर ३ वर्षे हिमालयात साधना केली व पुढे संघाचे पुर्णवेळ प्रचारक
बनले. व देशसेवा करत करत भाजपात येवून ५१व्या वर्षी थेट मुख्यमंत्री झाले व ६३व्या वर्षी आता पंतप्रधान म्हणून सेवा करणार आहेत. तिकडे यशोदाबेन आता निवृत्त झाल्यात. त्यांना १४ हजार रुपये पेन्शन मिळते. त्या आपल्या भावाकडे राहतात.आता दिवसभर नामजप व प्रार्थना करत असतात. त्यांनी गेल्या ४३ वर्षात कधीही मोदींच्या सेवेच्या आड येण्याचा प्रयत्न केला नाही.आजही त्या म्हणतात की, “मोदी नक्कीच पंतप्रधान होणार आहेत.मला त्यांच्याविषयी काहीही तक्रार नाही. मला त्यांच्या राष्ट्र सेवेचा अडसर बनायचे नव्हते. म्हणून आम्ही दोघे ठरवून बाजूलाझालो”. यशोदाबेन आजही यशोदाबेन नरेंद्र मोदी असेच नाव लावतात. मोदींनीदेखील आजपर्यंत कधीही ते अविवाहीत आहेत, असे म्हटले नाही. यापूर्वी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील वैवाहिक स्थितीचा रकाना भरणे बंधनकारक नसल्याने तो रकाना ते रिकामाच ठेवत. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तो रकाना भरणे बंधनकारक केल्याने काल खासदारकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रातमोदींनी स्वतःच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला. यावर बिकाऊ मिडिया व कोणताही मुद्दानसणारे कॉंग्रेसवाले थयथयाट करु लागले.भारत देशाच्या सेवेसाठी अनेकांनी त्याग केलेला आहे. त्यात यशोदाबेन व नरेंद्र मोदींचे नावादेखील भविष्यात अग्रक्रमाने घेतले जाईल.
नमो नमो । वन्दे मातरम्

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे