शिबिराला भेट द्या
ग्रामीण किंवा शहरी भागातील पालक बऱ्याचदा आपल्या आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात. आज त्या मुलांना शिकण्याचा सर्वस्वी अधिकार आहे आणि तो शासनानेसुद्धा त्यांना देऊ केलेला आहे, परंतु ते माहितीच नसल्या कारणाने अनेक मुलं - मुली आज शिक्षणापासून आज वंचित राहिलेली आहेत आणि हे अत्यंत वेदनादायी आहे. हि परिस्थिती लक्षात घेऊन भावी पिढीला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये व त्यांच्या पालकांना " मोफत शिक्षणाचा कायदा ( RTE ) " या कायद्याची माहिती व्हावी तसेच या कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची माहितीसुद्धा सर्वसामान्य पालकांना मिळण्याकरिता दिनांक १० एप्रिल २०१६ रोजी ठाणे येथील ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे दुपारी ३ वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरीही सर्व पालकांनी या शिबिरास उपस्थित राहून मोफत शिक्षणाचा कायद्याची व त्याच्या प्रवेश प्रक्रियेसंबधित संपूर्ण माहितीचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती...
टिप्पण्या