कामगार दिवसाच्या हादि॑क शुभेच्छा

महाराष्ट्राचे महानराष्ट्र बनो, शेतकर्यांच्या सातबार्यावरून आत्महत्येची साडेसाती कायमची निघुन जावो, गिरणी कामगारांची घराबाबतची दिवास्वप्ने दिव्यात पुर्ण न होता ती मुंबईतच साकार होवोत, महाराष्ट्रातल्या तमाम आई-बाबांनी भ्रूणाच्या लिंगाकडे पाहुन आनंद मानण्यापेक्षा भ्रूण कीती सर्वगुणसंपन्न आहे हे पाहुन प्रफुल्लित होण्याचे दिवस लवकर जवळ यावेत, मानसाच्या जाती कडे पाहण्यापेक्षा त्याच्या मती कडे पाहण्याची सुबुद्धी लवकरच सगळ्यांना प्राप्त होवो, प्रशासकीय अधिकार्यांना मेल्यानंतर भ्रष्टाचारातुन कमवलेला पैसा वरती नेता येत नाही याची जाणिव लवकरात लवकर होवो, राजकारण्यांवर तत्वावर पाणी सोडण्याची सध्या सतत येणारी वेळ कधीतरीच यावी, डॉक्टरांना रूग्णांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची नजर प्राप्त होवो, रूग्णांच्या नातेवाईकांमद्धे डॉक्टरांना समजुन घेण्यासाठी समजुतदारपणा वाढो, वेळेवर न्याय न देणे म्हणजेच न्याय नाकारणे याची उजळणी न्यायालयांनी निदान ह्यावर्षी तरी पुर्ण करावी, आई-वडीलांनी दिलेले पैसे हे डेट साठी नसुन शिकुण अप टू डेट होण्यासाठी असतात हे ज्ञान विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्राप्त होवुन त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावाव्यात.............हिच १ मे...म्हणजेच महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी ईश्वर चरणी प्रार्थना...माझ्या तमाम महाराष्ट्रीय बंधु भगिनिंना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....