विजांपासून बचाव

     पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विंजाचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.या विजेपासून सुरक्षितता आपण  बाळगली पाहिजे.
    काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे अशा वेळी आपण काळजीपुर्वक ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे तुम्ही अशावेळी बाहेर असाल तर प्रथम स्वतःला सुरक्षित करा तुम्ही जर घरांत असाल तर कुठलेही विद्युत उपकरण हाताळू नका किंवा वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. दारे व खिडक्यांपासून दूर रहा विजेपासून वाहणारा प्रवाह तारांमधूनः केबल मधून तसेच पाईप मधून वाहून तुमच्या शरीराला इजा पोहचवू शकतो. झाडाखाली चुकूनही उभे राहू नका हातात छत्री असेल तर बंद करुन दूर टाकून द्या मोकळ्या मैदानात झाडापासून दूर उभे रहा एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळपास ठेवू नका वीज लगेच त्याच्याकडे आकृष्ट होते. घरावर वीज पडू नये म्हणुन  जुन्याकाळी विजा होत असताना लोक एखादा लोखंडाचा मोठा चमचा, पळी किंवा पावशी बागेत फेकून देत असत. वीज चमकत असताना तलावात पोहत असाल पोहणे बंद करून ताबडतोब पाण्यातून बाहेर जमिनीवर या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

अभिनंदन केले पाहिजे

बॅड पॅच

मनातलं मन...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....