असाही अनुभव.....

  शनिवार आला की बेत आखला जातो तो म्हणजे रविवारचा आठवड्याचे सहा दिवस काम काम आणि फक्त काम एकच दिवस मिळतो सुट्टीचा आमच्या हक्काचा रविवार आणि त्या दिवसाची आम्ही आतूरतेने वाट पहात असतो.असाच एका रविवारी मी कल्याणला जाण्याचा बेत आखला.किती दिवस चालू होते जायचे जायचे शेवटी तो दिवस आला आणि 8 मे ला कल्याण जाणे मी निश्चित केले पण नियतीला ते मान्य नव्हते असाच एका रविवारचा अनुभव माझ्या वाटेस आला.
   सकाळी सकाळी माझ्या मोबाईल ची रिंग वाजायला लागली होती. मी उठलो आणि मोबाईलकडे नजर गेली तर सकाळी सातची गजर वाजत होती. मी ती बंद करून तयारीला लागलो तयारी झाली.मी कळवा स्थानकाकडे जायला निघालो माझ्या फोनचा गजर पुन्हा सुरू झाला मी फोन घेतला तर माझ्या भावाचा फोन अरे आज मध्यरेल्वेचा मेगाब्लाॅक आहे आणि टिटवाळा - आसनगाव या स्थानकाकडे जाणा-या गाड्या काही कारणांनी बंद झाल्या आहेत. स्लो गाडी नाही सगळ्या फास्ट गाड्या ठाणे स्थानकातून सुटता आहेत. तू ठाणे स्थानकातून गाडी पकडली तर फायदेशीर ठरेल असा सल्ला मला त्याच्याकडून मिळाला मी पटकन भानावर आलो दर रविवारी प्रमाणे आज मध्यरेल्वेचा मेगाब्लाॅक असणार या विचारात कळवा स्थानक ही गाठले. तीथे नेहमी प्रमाणे तुरळक गर्दी होती पटकन रांगेत उभे राहून तिकीट काढले तेव्हा मनात शंका निर्माण झाली स्लो गाडी चालू आहे का ? असे प्रश्न विचारले असता क्षणाचा विलंब न करता त्याने हो असे उत्तर दिले हे ऐकाताच मी देवाचे आभार मानले.10:14 ची डोंबीवली गाडी कळवा स्थानकात येऊनजाण्याच्या तयारीत होती कल्याणला जायचे आहे मग आरामात जाऊ असे म्हणून ती गाडी सोडली.
   इंनडीकेटरवर पुढील गाडी कोणती याची आतूरतेने वाट पाहत बसलो आणि बघतो तर काय 10:53 मिनीटांची कर्जत गाडी इंनडीकेटरवर झळकू लागली.मला सिंघम 2 मधील गाणे आठवायला लागले आता माझी सटकली मनातल्या मनात मी डोंबीवली गाडी का सोडली याचा पश्चाताप मला पदोपदी व्हायला लागला.दर14-15 मिनीटांनी मुबईकडे जाणा-या गाड्या मात्र सुरळीत चालू असल्याने मला राग येतोय हे सिंघमचे गाणे मी मनातल्या मनात गुणगुणयला लागलो आणि तिकीट देणा-या बरे वाईट सुनवायला लागलो मनातल्या मनात तेवढ्यात 10:53 मिनीटांची कर्जत गाडीचे आगमन कळवा स्थानकात झाले. गाडी उशीरा येत असल्याने कळवा स्थानकात तोपर्यंत बरीच गर्दी जमा झाली होती. मला गाडीत जागा मिळेल का ? त्यापेक्षा मला निदान गाडीत चढायला तरी मिळेल का हा प्रश्न मला जास्त सतावत होता. कसातरी गाडीत चढलो सुटलो बाबा एकदाचो पण पुढे काय होणार आहे याची जाणीव मला त्यावेळी नव्हती.
   असे कोणीतरी म्हटले आहे कामाची सुरुवात जर चांगली झाली तर आपले अर्धे पुर्ण होते पण येथे माझी सुरुवातच अशी झाली तर कामाची बोंब होणार अशातच गाडी 11:08 मिनीटांनी कोपर स्थानकात येऊन पोहचली निदान 11:30 पर्यंत  मी कल्याण स्थानकात असेल असा अंदाज करत गाडी कोपर स्थानकातून कधी सुटेल याची वाट बघत बसलो. 5 मिनीटे झाली तरी गाडी काही पुढे जात नव्हती म्हणून मी समोर बसलेल्या अनोळखी माणसाकडून वाचण्यासाठी पेपर घेतला. मला वाचण्याची खुप आवड आहे. वाचत वाचत पुर्ण पेपर वाचून झाला तरी गाडी काही पुढे जाईना 11:40 मिनीटांनी मी गाडीतून खाली उतरलो मध्य रेल्वेचा गोंधळ काय आहे ते बघण्यासाठी तर समोरच मुंबईला जाण्यासाठी गाड्याचे इंडीकेटर पाहिले तर 00:00 हा टाईम पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी माझा कल्याणला जायचा बेत मी रद्द केला आणि कळवा स्थानकाकडे जाण्यासाठी गाडीची वाट बघत बसलो. अगदी लहानपणापासून मी लोकल मधून प्रवास केला त्यात एकदाही मी माझा बेत रद्द केला नाही. पण पहिल्यांदाच असा प्रसंग माझ्याबद्दल घडला 8 मे 2016 चा रविवार मी कधीच विसरू शकत नाही.
  मला वाटले असा प्रसंग माझ्याबद्दल घडला पण गाडी जेव्हा दिवा स्थानकात आली. एक प्रवासी माझ्या शेजारी येऊन उभा राहिला त्याने मला प्रश्न विचारला गाडी कळवा स्थानकात थांबेल का ? मी लगेच हो म्हणून मोकळा झालो तेव्हा त्याने मला सांगितले अहो मी दादरवरून कळवा स्थानकाकडे येण्यास निघालो होतो. गाडीत बसलो तेव्हा गाडी ठाणे स्थानका
पासून स्लो होणार आहे असे त्यावेळी अनाऊस करत होते म्हणुन मी निर्धास्तपणे गाडीत चढलो पण गाडी काही कळवा स्थानकात थांबली नाही. ती दिवा स्थानकात येऊन थांबली लगेच उतरलो आणि या गाडीत चढलो हे ऐकून मी गप्पच बसलो. मनात म्हटले आता गाडी कळवा स्थानकात थांबली पाहिजे नाहीतर काही खरे नाही. पण सुदैवाने गाडी थांबली आणि मी उतरलो आणि सुटलो बाबा एकदाचे असे म्हणत देवाचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे

तूच तुझी वैरी

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....