पछाडलेला...

मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान, ढोंगी आणि मजेशीर प्राणी आहे. आनंदाच्या क्षणांसाठी किंवा दुःख विसरण्यासाठी म्हणा हवं तर, त्याने दारुचा शोध लावला म्हणून तो बुद्धिमान आहे.आता मद्यपी नशा करतात असा आरोप आहे. पण पछाडलेल कोण नसतं? कुणाला पैशाची पछाडलेल असते, कुणाला गरिबीनी! कुणाला सत्तेने पछाडलेल असते तर कुणाला विरोधाने! किंबहुना ज्यांना कोणत्याही गोष्टीने पछाडलेल नाही, त्यांचं जीवन व्यर्थच!

काळ बदलला, नी नशेत असताना काही चांगला विचार होऊ शकतो ही शक्यताच बहिष्कृत झाली. इतकी की, मद्याला स्पर्श देखील न करणाऱ्या माणसानं काही उलट सुलट वक्तव्य केलं तर त्याला काय दारू पिऊन आलाय का असं हेटाळलं जातं.संचारबंदीच्या काळातच ‘होममेड अल्कोहोल’ म्हणजे घरातल्या घरात दारु कशी बनवता येईल हे ऑनलाइन सर्च करणा-यांचं प्रमाण वाढलं. बाजारात दारु उपलब्ध नाही म्हणून ती घरी कशी बनवता येईल, दारु बनवण्याची ‘रेसिपी’ कुठे मिळेल, याचा विचाराने "पछाडलेला" हा बुद्धिमान प्राणी करु लागला. आहे की नाही गंमत! गुगल ट्रेंड्सनुसार, २२ मार्च ते २८ मार्च या आठवड्यात “घरी अल्कोहोल कसं बनवावं” (how to make alcohol at home) हे ऑनलाइन सर्च करणा-यांचं प्रमाण सर्वाधिक होतं.टाळेबंदीमुळे अनेकांचे लग्न सोहळे रखडले आहेत. त्यामुळे वधू-वरांची चांगलीच पंचाईत झाली आहे.ते देखील आपले लग्न होईल की नाही या विचाराने त्यांना पछाडलेल आहे.रेड झोनमध्येही मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी मिळाल्यानंतर मद्य ग्राहकांनी शहर व ग्रामीण भागातील दारूच्या दुकानांसमोर गर्दी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही दारूच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा लागल्या.मद्य विकत घेण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील दीड महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी जीव धोक्यात टाकून करोनाशी लढाई लढत आहेत; पण अचानक सुरू झालेल्या मद्याच्या दुकानामुळे लोकांची गर्दी उसळत आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यतेने डॉक्टरांना  देखील पछाडलेले आहे.



भारतात पॉर्न पाहणारांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.  
८९ टक्के भारतीय मोबाईलवरून थेट साईटवर जाऊन पॉर्न बघतात. काहीना अशा गोष्टीनेही पछाडलेले असते तर ३० ते ४० टक्के भारतीय पॉर्न ग्राहक हे व्हिडीओ डाउनलोड करून पाहतात, असं या पाहणीतून समोर आलं आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं ३,५०० पॉर्न साईट बंद केल्यानंतरची ही आकडेवारी झोप उडवणारी आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

अभिनंदन केले पाहिजे

बॅड पॅच

मनातलं मन...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....