स्पॉट फिक्सिंग - एक आठवण
जाणून घ्या
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तीळाशी संबंधित इतर रोचक गोष्टी...
शेयर करा...
शोध वडापावचा
आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? Being Marathi टिम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे.. 1965-70 चा तो काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या,उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणी त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मधे चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहील्यानंतर त्यांनी 'रूचिरा' हा पाककृतीचा छोटेखानी पुस्तीका लिहली, आजही पाककृती मधे 'कमलाबाई ओगले' यांच्या 'रूचिरा' चा विक्रम कोणी मोडू शकले नाही. अशा या आज्जीचा वयाच्या 86 व्या वर्षी 1999 साली पुण्यात निधन झाले. आज या आज्जीबद्दल कोणाला माहीत नाही म्हणून Being Marathi टीम तूम्हास ओळख करून देत आहे..
कृपया जरूर शेअर करा...
(माहीती Copy करताना पेजचे नाव जरूर टाका, आम्ही शोध घेऊन ही माहीती संकलीत केली आहे )
सोलानपाडा धबधबा
यालाच म्हणतात हिरो...
काय सांगतात नोटांवरील चित्रे
दंतकथा
असाही अनुभव.....
सकाळी सकाळी माझ्या मोबाईल ची रिंग वाजायला लागली होती. मी उठलो आणि मोबाईलकडे नजर गेली तर सकाळी सातची गजर वाजत होती. मी ती बंद करून तयारीला लागलो तयारी झाली.मी कळवा स्थानकाकडे जायला निघालो माझ्या फोनचा गजर पुन्हा सुरू झाला मी फोन घेतला तर माझ्या भावाचा फोन अरे आज मध्यरेल्वेचा मेगाब्लाॅक आहे आणि टिटवाळा - आसनगाव या स्थानकाकडे जाणा-या गाड्या काही कारणांनी बंद झाल्या आहेत. स्लो गाडी नाही सगळ्या फास्ट गाड्या ठाणे स्थानकातून सुटता आहेत. तू ठाणे स्थानकातून गाडी पकडली तर फायदेशीर ठरेल असा सल्ला मला त्याच्याकडून मिळाला मी पटकन भानावर आलो दर रविवारी प्रमाणे आज मध्यरेल्वेचा मेगाब्लाॅक असणार या विचारात कळवा स्थानक ही गाठले. तीथे नेहमी प्रमाणे तुरळक गर्दी होती पटकन रांगेत उभे राहून तिकीट काढले तेव्हा मनात शंका निर्माण झाली स्लो गाडी चालू आहे का ? असे प्रश्न विचारले असता क्षणाचा विलंब न करता त्याने हो असे उत्तर दिले हे ऐकाताच मी देवाचे आभार मानले.10:14 ची डोंबीवली गाडी कळवा स्थानकात येऊनजाण्याच्या तयारीत होती कल्याणला जायचे आहे मग आरामात जाऊ असे म्हणून ती गाडी सोडली.इंनडीकेटरवर पुढील गाडी कोणती याची आतूरतेने वाट पाहत बसलो आणि बघतो तर काय 10:53 मिनीटांची कर्जत गाडी इंनडीकेटरवर झळकू लागली.मला सिंघम 2 मधील गाणे आठवायला लागले आता माझी सटकली मनातल्या मनात मी डोंबीवली गाडी का सोडली याचा पश्चाताप मला पदोपदी व्हायला लागला.दर14-15 मिनीटांनी मुबईकडे जाणा-या गाड्या मात्र सुरळीत चालू असल्याने मला राग येतोय हे सिंघमचे गाणे मी मनातल्या मनात गुणगुणयला लागलो आणि तिकीट देणा-या बरे वाईट सुनवायला लागलो मनातल्या मनात तेवढ्यात 10:53 मिनीटांची कर्जत गाडीचे आगमन कळवा स्थानकात झाले. गाडी उशीरा येत असल्याने कळवा स्थानकात तोपर्यंत बरीच गर्दी जमा झाली होती. मला गाडीत जागा मिळेल का ? त्यापेक्षा मला निदान गाडीत चढायला तरी मिळेल का हा प्रश्न मला जास्त सतावत होता. कसातरी गाडीत चढलो सुटलो बाबा एकदाचो पण पुढे काय होणार आहे याची जाणीव मला त्यावेळी नव्हती.
असे कोणीतरी म्हटले आहे कामाची सुरुवात जर चांगली झाली तर आपले अर्धे पुर्ण होते पण येथे माझी सुरुवातच अशी झाली तर कामाची बोंब होणार अशातच गाडी 11:08 मिनीटांनी कोपर स्थानकात येऊन पोहचली निदान 11:30 पर्यंत मी कल्याण स्थानकात असेल असा अंदाज करत गाडी कोपर स्थानकातून कधी सुटेल याची वाट बघत बसलो. 5 मिनीटे झाली तरी गाडी काही पुढे जात नव्हती म्हणून मी समोर बसलेल्या अनोळखी माणसाकडून वाचण्यासाठी पेपर घेतला. मला वाचण्याची खुप आवड आहे. वाचत वाचत पुर्ण पेपर वाचून झाला तरी गाडी काही पुढे जाईना 11:40 मिनीटांनी मी गाडीतून खाली उतरलो मध्य रेल्वेचा गोंधळ काय आहे ते बघण्यासाठी तर समोरच मुंबईला जाण्यासाठी गाड्याचे इंडीकेटर पाहिले तर 00:00 हा टाईम पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी माझा कल्याणला जायचा बेत मी रद्द केला आणि कळवा स्थानकाकडे जाण्यासाठी गाडीची वाट बघत बसलो. अगदी लहानपणापासून मी लोकल मधून प्रवास केला त्यात एकदाही मी माझा बेत रद्द केला नाही. पण पहिल्यांदाच असा प्रसंग माझ्याबद्दल घडला 8 मे 2016 चा रविवार मी कधीच विसरू शकत नाही.
मला वाटले असा प्रसंग माझ्याबद्दल घडला पण गाडी जेव्हा दिवा स्थानकात आली. एक प्रवासी माझ्या शेजारी येऊन उभा राहिला त्याने मला प्रश्न विचारला गाडी कळवा स्थानकात थांबेल का ? मी लगेच हो म्हणून मोकळा झालो तेव्हा त्याने मला सांगितले अहो मी दादरवरून कळवा स्थानकाकडे येण्यास निघालो होतो. गाडीत बसलो तेव्हा गाडी ठाणे स्थानकापासून स्लो होणार आहे असे त्यावेळी अनाऊस करत होते म्हणुन मी निर्धास्तपणे गाडीत चढलो पण गाडी काही कळवा स्थानकात थांबली नाही. ती दिवा स्थानकात येऊन थांबली लगेच उतरलो आणि या गाडीत चढलो हे ऐकून मी गप्पच बसलो. मनात म्हटले आता गाडी कळवा स्थानकात थांबली पाहिजे नाहीतर काही खरे नाही. पण सुदैवाने गाडी थांबली आणि मी उतरलो आणि सुटलो बाबा एकदाचे असे म्हणत देवाचे आभार मानले.
माझे आवडते गाणे
तुम दूर नज़र आए, बड़ी दूर नज़र आए
बंद कर के झरोखों को ज़रा बैठी जो सोचने
मन में तुम ही मुस्काए, मन में तुम ही मुस्काए
पाकर तुझे, हाए मुझे कुछ होने लगा है
एक तेरे भरोसे पे सब बैठी हूँ भूल के
यूँ ही उम्र गुजर जाए, तेरे साथ गुजर जाए
तुम हो जहाँ साजन मेरी दुनिया है वही पे
दिन रात दुआ माँगे मेरा मन तेरे वास्ते
कहीं अपनी उम्मीदों का कोई फूल ना मुरझाए
जगते हुए सोयी रही, नींदो में जगी हूँ
मेरे प्यार भरे सपने, कही कोई न छीन ले
मन सोच के घबराए, यही सोच के घबराए
"नीट" च्या विद्यार्थीसाठी
नमस्कार मित्रांनों..,
सध्या राज्यात चालू असलेला "नीट (NEET)" घोळ तर प्रत्येक सुजाण नागरिकाला आणि पालकांना माहीतच आहे...खूप कमी वेळात विद्यार्थ्यांना नीट ची तयारी करावी लागेल..पण एक महत्वाची अडचण अशी आहे कि नीट च्या तयारीसाठी NCERT ची बुक मिळणे अगदी पुण्याच्या अप्पा बळवंत मध्येही मुश्किल झाले आहे...पण प्रत्येक अडचणीवर उपाय हा असतोच, याप्रमाणे आम्ही आपणास हि NCERT ची बुक डाउनलोड करण्यासाठी देत आहोत...
खाली दिलेल्या लिंक वरून आपण ती डाउनलोड करून स्मार्टफोन, कंप्युटर, टॅबलेट, लॅपटॉप वर वाचू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो...
महत्वाचं म्हणजे इथे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत आपणास हि बुक डाउनलोड साठी उपलब्ध आहेत..
खालील लिंक वरून आपण NCERT बुक डाउनलोड करू शकता...
http://empsckatta.blogspot.in/p/downloads.html
तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे का
नाॅलेज ची किंमत
बँकेवरील दरोडा
हॉंकॉंगमध्ये एका बँकेवर
दरोडा पडला. सगळ्यांनी
मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा
आहे पण जीव तुमचा आहे.’
दरोडेखारांनी ओरडून सांगताच सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.याला म्हणतात ‘माईंड
चेन्जिंग कन्सेप्ट’ (Mind
Changing Concept) म्हणजेच माणसांच्या सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची किमया.त्यातील एक महिला ‘सेक्सी’ पद्धतीने आडवी पडली होती.एक दरोडेखोर तिला ओरडून म्हणाला, ‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा दरोडा आहे, बलात्कार नाही.’ याला म्हणतात व्यावसायीक रहाणे (Being professional) आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले. त्यातला ज्युनिअर दरोडेखोर,जो एम.बी.ए. होता तो 6 वी पर्यंत शिकलेल्या सिनियर दरोडेखोराला म्हणाला.,
‘चला आता आपण पैसे मोजायला लागुया!’ त्यावर सिनिअर दरोडेखोर म्हणाला,‘वेडा आहेस की काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील. जरा दम धर. रात्री टी. व्ही.वरच्या बातम्या बघ. तुला
आपोआपच कळेल की आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.
’याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’ (Experience) असे म्हणतात. हल्ली कागदी डिगर्यां पेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.
दरोडेखोर बँकेतून निघून
गेल्यावर बँक मॅनेजर सुपरवायझरला म्हणाला,
‘ताबडतोब पोलिसांना फोन
कर!’ सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70 लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’ याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’(Swim with the tide). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.
सुपरवायझर म्हणाला, ‘जर
दर महिन्यात असा दरोडा
पडला तर कार मजा येईल!’
याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी
बदलणे’ (Changing priority). कारण ‘पर्सनल हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.दुसर्याह दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला. पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.कारण त्यांनी आणलेली
कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली.
मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?
खरी मेख काय आहे ते
सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.तो वैतागून म्हणाला, ‘आपण जिवावर उदार होऊन
दरोडा टाकला पण आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. पण त्या बँक मॅनेजरने मात्र काहिही न करता 80लाख डॉलर्स लाटले.खरे आहे माणसाने शिकले पाहीजे. नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षीत दरोडेखोर’ व्हायला पाहीजे.’याला म्हणतात ‘ज्ञान’
म्हणजेच 'नॉलेज’ (Knowledge) ज्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त
असते. तुमचे सोने नाणे लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच पळवून नेऊ शकत नाही.
आता मिळणार आॅनलाइन
मुंबई पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्यासाठी यापुढे महिनाभर वाट पहावी लागणार नाही. पोलिसांच्या विशेष शाखा १ ने ही सेवा ऑनलाइन सुरू केल्याने अर्जदारांना आठ दिवसांत चारित्र्य पडताळणीचा दाखला मिळू शकणार आहे. पूर्वी हा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. नव्याने सुरू केलेल्या ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहेत.
पूर्वी चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलिसांच्या तीन ते चार वेबसाइटवरुन फॉर्म भरून त्यांची प्रिंट काढावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेला विशेष शाखा येथे जाऊन फॉर्म आणि कागदपत्रे जमा करणे सक्तीचे होते. त्यानंतर ३ ते ४ दिवस संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीच्या अहवालासाठी उपस्थित राहावे लागत असे. त्यानंतर ३० दिवसांनी नागरिकांना चारित्र्याचा दाखला मिळत होता. मात्र पोलिसांच्या विशेष शाखा १ ने www.pcsmahaonline.gov.in व www.aaplesarkar.mahaonline.gov.in ही नवीन संकेतस्थळे सुरू केली आहेत.
नवीन प्रक्रियेतील टप्पे
- वरील दोन संकेतस्थळांवर अर्जदाराने माहिती भरावी
- संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीकरता उपस्थित रहावे
- संबंधित पोलिस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल ऑनलाइन अपलोड
- अहवालासंदर्भात पडताळणी करून अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र डिजिटल सहीद्वारे तयार
- प्रमाणपत्र तयार झाल्याचा अर्जदारास मेसेज
अभिनंदन केले पाहिजे
पुर्ण ठाणे जिल्ह्यातील भुमाफीया,अनधिकृत कामं करणारे लोक,खाड्या बुजवून चाळी-गोडाऊन उभारणारे,पर्यावरणाचा सत्यानाश करणारे,अवैध रेती उत्खनन करुन शासनाचा करोंडोंचा महसूल बुडवणारे,अनधिकृत केबल व्यावसायिक आदी सर्व घटकांना कायद्याचा चाप लावून त्यांचे सर्व गैर धंदे बंद पाडून सर्व सामान्यांना दिलासा देणा-या आणि ठाणे जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणा-या धडाडीच्या जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांची अवघ्या दीड वर्षात ठाण्यातून उचलबांगडी करुन पुन्हा हा जिल्हा विविध माफीयांच्या हाती देण्याचा अतिशय विधायक निर्णय घेतल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..! तमाम ठाणे जिल्हावासीयांच्या वतीने आपणास मनापासून धन्यवाद..!!
विजांपासून बचाव
काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे अशा वेळी आपण काळजीपुर्वक ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे तुम्ही अशावेळी बाहेर असाल तर प्रथम स्वतःला सुरक्षित करा तुम्ही जर घरांत असाल तर कुठलेही विद्युत उपकरण हाताळू नका किंवा वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. दारे व खिडक्यांपासून दूर रहा विजेपासून वाहणारा प्रवाह तारांमधूनः केबल मधून तसेच पाईप मधून वाहून तुमच्या शरीराला इजा पोहचवू शकतो. झाडाखाली चुकूनही उभे राहू नका हातात छत्री असेल तर बंद करुन दूर टाकून द्या मोकळ्या मैदानात झाडापासून दूर उभे रहा एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळपास ठेवू नका वीज लगेच त्याच्याकडे आकृष्ट होते. घरावर वीज पडू नये म्हणुन जुन्याकाळी विजा होत असताना लोक एखादा लोखंडाचा मोठा चमचा, पळी किंवा पावशी बागेत फेकून देत असत. वीज चमकत असताना तलावात पोहत असाल पोहणे बंद करून ताबडतोब पाण्यातून बाहेर जमिनीवर या.
बिझनेस च्या नावाखाली
कार्टून चॅनल्सनी आपली मर्यादा आेलांडायला सुरुवात केली आहे. मुलांचे मनोरंजन करतांना त्याच्यापुढे कोणत्या गोष्टी ठेवाव्यात याचे भान सुटत चालले आहे 'बिझनेस' च्या नावाखाली कार्टून चॅनल्स दिवसेंदिवस अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक कार्यक्रम दाखवू लागल्या आहेत. यामुळे कोवळ्या मनावर चुकीचे संदेश पोहचण्याची भिती व्यक्त होऊ शकते. टीव्हीवर मुलांनी कोणती चॅनल्स पहावीत याबाबत बरेचसे पालक जागरूक असतात पण कार्टून चॅनल लागले की ते देखील निर्धास्त होतात कारण बाकी काही बघण्यापेक्षा कार्टून बरे असे
ब-याच पालकांना वाटते. हे सर्व करतांना पालकांनाही डोळे उघडे ठेवावे लागणार आहेत. हाणामारीचा विषय तर यापूर्वी ही कार्टून मालिकांमध्ये होताच पण त्याचबरोबरीने सुड, द्वेष, मत्सर या आणि इतर अनेक गोष्टी यातून मुलांसमोर मांडल्या जातात.
आपण कार्टून चॅनल्सवर जे पाहतो तेच खरे असे मुलांना वाटत असते त्यामुळे त्या गोष्टी आत्मसात करायला त्यांना वेळ लागत नाही. आणि कुणावर तरी प्रयोग करुन पाहतात. कार्टून हे मुलांपर्यंत पोहचण्याचे एक प्रभावी माध्यम असुन त्याचा योग्य उपयोग व्हावा, शाळेत शिकविल्या जाणा-या विषयांशी संबंधित असावा जेणेकरून मुलांना तो विषय अधिक चांगल्या प्रकारे कळेल आणि अभ्यासातही गोडी निर्माण होईल,
शहरातील सामाजिक समस्यांवर कार्टून मालिकांमधून प्रकाश टाकला तर मुलांच्या मनात सजगता निर्माण होईल.पालकांनी मुलांसोबत कार्टून बघावे काय चांगले आणि काय वाईट हे त्यांना समजून सांगावे.
शिफारस
विराट कोहली तुफानच खेळतो यात काहीच शंका नाही. गेली अनेक वर्षे त्याच्या कामगिरीत सातत्य दिसते आहे कसोटी, वनडे असो किंवा टी - 20 त्याच्या धावांची चक्की सुरूच आहे. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा विराट कोहली हा 11 भारतीय आहे तसेच शतक करणारा चौथा कर्णधार ठरला आहे. वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय या भारतीयांच्या नावावर दोन शतके आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सात शतकी भागीदारी झाल्या असून त्यातील चार भागीदारींमध्ये विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. फलंदाजी करताना डावाला 'फिनिशिंग टच' देणे विराटला उत्तम जमते.आयपीएल मधे 3504 धावा केल्या आहेत तसेच टी - 20 मध्ये आतापर्यंत 992 धावा फटकावल्या आहेत. 2013 च्या आयपीएल मोसमात दोनवेळा शतकाने हुलकावणी दिली आहे. नुकत्याच झालेल्या टी -20 कोहलीने नेत्रदीपक कामगिरी केली होती. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि आॅस्टेलिया यांच्या विरुध्द कोहलीने सिंहाचा वाटा उचलला होता. आणि सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही कोहलीने पटकावला होता. 7.5 लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप तर 5 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे अर्जून पुरस्कारचे स्वरूप आहे. जर कोहलीला खेलरत्न पुरस्कार मिळाला तर तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी भारताचा माजी महान फंलदाज सचिन तेंडुलकर आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे
ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...
-
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट सम...
-
नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या ...
-
बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष स...
-
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडव...
-
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही...
-
गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि...
-
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी ...
-
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यां...
-
shanti sagar water park 9km away from Ambarnath Railway station water park price 350/- per person without food food available is...