आपुन माग राहून कसं चालेल… !!
छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची प्रतापगडावर भेट ठरली. याप्रमाणे छत्रपती शिवराय व त्यांचे दहा अंगरक्षक प्रतापगडावर पोहचले. अफजलखान अगोदरच शामियान्यात आला ह ोता. शिवराय व त्यांचे वकील शामियान्यात गेले. अफजलखानाने शिवरायांचे स्वागत केले. आणि आलिंगन दिले. अफजलखानाने शिवरायांची मान काखेत दाबण्याचा प्रयत्न केला आणि शिवरायांच्या पाठीत बिचवा खुपसला. पण चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. तेवढ्यात शिवरायांनी खानाच्या पोटात वाघनखे खुपसली. त्याच अवस्थेत अफजलखान लव्हा...लव्हा ( वाचवा वाचवा ) म्हणत पळत सुटला. बाहेर लोहार समाजाचे संभाजी कावजी उभे होते. त्यांनी "अफजलखानाला कापला...". शामियान्यात सन्नाटा पसरला. सय्यद बंडा शिवरायांवर वार करणार तेवढ्यात, जिवाजी महाले या नाभिक समाजाच्या सैनिकाने, सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला...!! ( खरच… " होता जिवा … म्हणून वाचला शिवा !!) शामियान्याबाहेर "सिद्धी इब्राहीम" हा "शिवरायांचा मावळा" शत्रूशी एकाकी झुंज देत होता. शिवरायांनी अफजलखानाला मारल्यानंतर काम संपले होते.... विजय जवळ होता पण अचानक एक घटना घडली. अफजल...