संधी की सुर्वणसंधी

गेला आठवडाभर शेअर बाजारात मंदी आहे. देशांतर्गत आर्थिक स्थिती नाजूक असतानाच करोना विषाणूची बाधा शेअर बाजारालाही झाल्याने गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा आकर्षक भावात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने या संधीचा फायदा घेता येईल. मात्र नवीन खरेदी अथवा विक्रीही टप्प्याटप्प्याने केली जावी.काही गुंतवणूकदारांची परिस्थिती ही किनाऱ्याजवळ गळ टाकून बसलेल्या व्यक्तीसारखी असते. मासे तर पकडायचे असतात पण खोल पाण्यात जायचे नसते. यांची अपेक्षा असते की, एखादा मासा किनाऱ्याजवळ येईल आणि गळाला लागेल. तर असे गुंतवणूकदार जेव्हा एखादा शेअर घेतात तो किंमत कमी म्हणून घेतात आणि कधी तरी तो वाढेल या भावनेने त्याला वर्षांनुवर्षे ठेवतात. अशा भावनेने घेतलेला शेअर कालांतराने मोठी कमाई करून देऊ शकतो असाच एक शेअर मी तुमच्या साठी माझी गुंतवणूक या पोस्टमधून घेऊन आलो आहे. सुमारे ११० वर्षांपूर्वी इम्पेरियल टोबॅको कंपनी या नावाने स्थापन झालेली आयटीसी ही देशातील एक अग्रगण्य एफएमसीजी मार्केटर आहे. सुरुवातीला केवळ तंबाखू आणि सिगारेट उत्...