मायाजाल

कार्ड क्लोनिंग कसे होते एटीएम मशीन मध्ये ज्या ठिकाणी डेबिट कार्ड आत टाकले जाते त्या ठिकाणी स्किमर बसविले जातात कार्ड आत टाकताच त्यामागील मॅग्नेटिक स्ट्रिप स्किमरमध्ये स्कॅन होते एटीएम मशीनवरील की - बोर्डच्या वरील बाजूस चुपा कॅमेरा बसविला जातो. या कॅमेरामध्ये कार्ड धारकाने दाबलेला पिन नंबर सेव्ह होतो स्किमरवर स्कॅन झालेल्या मॅग्नेटिक स्ट्रिपची भामटे तशाच प्रकारच्या अन्य स्ट्रिपवर प्रिंट आऊट काढतात आणि डुप्लिकेट कार्ड तयार करून त्याचा वापर करतात सेव्ह झालेला पिन नंबर घेऊन डुप्लिकेट कार्ड वापरेलले जाते अशा च प्रकारे दुकान,हॉटेल, मॉल, कॉफी शॉप मध्ये स्वाईप मशीनद्वारे डेटाचोरी करून डुप्लिकेट कार्ड द्वारे एटीएम सेंटर मधून तुमचे पैसे काढले जातात सायबर पोलीस सेल म्हणजे काय? २००० साली माहिती-तंत्रज्ञान आयटी कायद्याची निर्मिती झाली.त्याच वर्षी देशभरातल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण...