पोस्ट्स

भटकंती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

इमेज
        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,इतिहास आणि संस्कृती यांचे उत्तम मिश्रण असलेले भविष्य काळात "मिनी महाराष्ट्र" म्हणून ओळखले जाऊ शकते. निवासीय इमारती, आयटी पार्क्स शॉपिंग मॉल स्टेडियम यांची झपाट्याने वाढ झाली असून येथे अंदाजे ३३ तलाव आहेत म्हणून या शहराला "lake city" या नावाने देखील ओळखले जाते. ठाणे शहरात अनेक पर्यटन स्थळे आहेत उपवन तलाव, येऊरचे डोंगर, मासुंदा तलाव, प्रीती शिर्डी साई बाबा मंदिर वर्तक नगर ठाणे पोखरण रोड नंबर १ तसेच प्रति तुळजापूर असलेले तुळजाभवानी मंदिर जे पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे पश्चिम या परिसरात आहे. ठाणे स्थानकापासून या परिसरात येण्यासाठी तुम्हाला बस सेवा आणि ऑटो रिक्षा सुद्धा उपलब्ध आहेत या परिसरापासून नामदेव वाडी बस स्थानक ३ मिनिट सिद्धेश्वर तलाव ४ मिनिट आणि नितिन कंपनी केवळ ७ मिनिटांवर आहे.    दगडी खांब, उंचचउंच कळस, मंदिराच्या सभोवती गजमुख व प्रांगणात दगडी दीपस्तंभ हे वर्णन तामिळनाडू येथील एखाद्या मंदिराचे नसून असे हेमाडपंती शिल्प...

शांती सागर वॉटर रिसोर्ट अंबरनाथ एन्ट्री फी फक्त ३५०/ - रुपये

इमेज
shanti sagar water park 9km away from Ambarnath Railway station water park price 350/- per person without food food available is outside & inside in waterpark Parking available - four wheeler Two wheeler  Shanti Sagar Resort is on the bank of Ulhas River. Shanti Sagar Resort located along the Ulhas River and surrounded by palm groves this resort is a treat for the people who loves to be closer to the beauty of Mother Nature.The waterpark is located close proximity from Ambernath railway station. Shanti Sagar Resort and water park the perfect place where the comfort of staying and chills of thrills stay. The Shanti Sagar Resort entry fees for it's waterpark is INR 350 per person. The fee is the same for every one who is more than 2 years old. The time of the waterpark is 10.30 to 6.00 every day. Morning Train Thane to Ambernath (Platform No.5) 8:10 - Khopoli  8:30 - Badlapur  8:56 - Karjat  9:06 - Ambernath  9:27 - Ambernat...

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

इमेज
नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात सुरु झाली.कळवा सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित शोभा यात्रेचे हे २१ वे वर्ष आहे. संस्थेने सर्वांना समाजप्रबोधन हा विषय दिला होता, सर्व संस्थेने विषय छान मांडला होता, साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्य भरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज अन् वेशीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या.या शोभायात्रां मध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या. तर आपण पण भेट देउन सर्व दाखवायचा प्रयत्न केला आहे तर वीडियो पूर्ण पहा आणि शेयर नक्की करा. युट्यूब लिंक खाली दिली आहे नक्कीच पहा https://youtu.be/Zu2fSn_osTg?si=LeaFhqME5nKqqW-A धन्यवाद. प्रसन्नतेचा साज घेवून आले ...

भटकंती

इमेज
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. विशाळगड - विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर 'विशाळगड' उभा आहे. विशाळगडाची उभारणी इ.स. 10...

सोलानपाडा धबधबा

इमेज
सोलानपाड़ा धबधबा कर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हां धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदर आहे.लहान मुलाना देखील निर्धोक पणे पाण्यात डुंबण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो.सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे.स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ स्टेशन वरून दर पंधरा मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज पोहचता येते.त्या ठिकाणी गेल्या नंतर आणि तेथील सृष्टि सौंदर्य पाहिल्या नंतर येथून परत फिरायला मनच होत नाही

असाही अनुभव.....

इमेज
  शनिवार आला की बेत आखला जातो तो म्हणजे रविवारचा आठवड्याचे सहा दिवस काम काम आणि फक्त काम एकच दिवस मिळतो सुट्टीचा आमच्या हक्काचा रविवार आणि त्या दिवसाची आम्ही आतूरतेने वाट पहात असतो.असाच एका रविवारी मी कल्याणला जाण्याचा बेत आखला.किती दिवस चालू होते जायचे जायचे शेवटी तो दिवस आला आणि 8 मे ला कल्याण जाणे मी निश्चित केले पण नियतीला ते मान्य नव्हते असाच एका रविवारचा अनुभव माझ्या वाटेस आला.    सकाळी सकाळी माझ्या मोबाईल ची रिंग वाजायला लागली होती. मी उठलो आणि मोबाईलकडे नजर गेली तर सकाळी सातची गजर वाजत होती. मी ती बंद करून तयारीला लागलो तयारी झाली.मी कळवा स्थानकाकडे जायला निघालो माझ्या फोनचा गजर पुन्हा सुरू झाला मी फोन घेतला तर माझ्या भावाचा फोन अरे आज मध्यरेल्वेचा मेगाब्लाॅक आहे आणि टिटवाळा - आसनगाव या स्थानकाकडे जाणा-या गाड्या काही कारणांनी बंद झाल्या आहेत. स्लो गाडी नाही सगळ्या फास्ट गाड्या ठाणे स्थानकातून सुटता आहेत. तू ठाणे स्थानकातून गाडी पकडली तर फायदेशीर ठरेल असा सल्ला मला त्याच्याकडून मिळाला मी पटकन भानावर आलो दर रविवारी प्रमाणे आज मध्यरेल्वेचा मेगाब्लाॅक असणार या विचा...

निसर्ग पर्यटन केंद्र

इमेज
   मुंबई ठाणे परिसरातील शहरवासीय सुट्टीचा हंगाम किंवा निसर्ग भ्रमंती म्हणून अनेक वेळा आपण लोणावळा माथेरान माळशेज घाटात जातात. अशा हौशी मंडळींना शहरापासून थोड्या अंतरावर निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध करून द्यावे या हेतूने टिटवाळ्याजवळील म्हस्कळ येथील पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे. वनराईचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे तसेच मुंबईसह परिसरातील पर्यटकांना शहराजवळच पर्यटनाचे एखादे केंद्र उभे रहावे यासाठी ठाणे वनविभागाने टिटवाळाजवळील म्हस्कळ येथील काळू नदीच्या किना-यावर सुमारे पन्नास एकर क्षेत्रात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प पूर्ण करुन तो खुला करण्यात येणार आहे.   कल्याण जनता सहकारी बँक आणि ठाणे भारत सहकारी बँक यांनी म्हस्कळ येथील वनविभागाची 50 एकर जमीन वृक्ष संवर्धन करण्यासाठी घेतली होती. 140 प्रकाराच्या 20 हजार रोपांची लागवड करुन ही सर्व झाडे जगवली. नक्षञ बाग मसाल्याची पदार्थांची लागवड रबराची झाडे अशा विविध लागवडी करुन ठाणे जिल्ह्यातील जमीन विविध प्रकारच्या लागवडींना योग्य आहे हे दाखवून दिले. विद्यार्थांना आमंत्रित कर...

क्षणभर विश्रांती..........

इमेज
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो.तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून,पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.पाहता पाहता झोपीही गेला.मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो. तासाभराने तो उठून दाराकडे निघाला.मी ही उठून दार उघडले.तो सरळ कंपाउंड बाहेर गेला.बहुधा, त्याच्या घरी गेला असावा! दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला.तासाभराने उठून निघून गेला.      मग हे रोजचेच झाले.तो यायचा, झोप काढायचा आणि निघून जायचा.असे कित्येक आठवडे झाले.मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज ...

हॅपी जनी॑

इमेज
    प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.      उन्हाळी सुट्टया लागल्या की प्रत्येक कुटुंबाला वेध लागते पय॑टनाचे त्यात एप्रिल, मे महिना खास आणि वेगवेगळ्या स्थळी फिरायला कोणाला आवडणार नाही साहजिकच अशा ठिकाणी जाण्यासाठी तिकीटे, हॉटेल, गाइड या सव॑ गोष्टीची गरज भासतेच आणि आपण तशी व्यवस्थाही करतो पण ऐनवेळी सहलीवर जायचे म्हटले तर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.                                अशा वेळी 'एअर बीएनबी' ही व्यवस्था अतिशय फायदेशीर ठरते. इंटरनेटवर अतिशय लोकप्रिय झालेली ही संकल्पना आता तुम्हाला अॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून तुम्ही कोणत्याही...

नागला जंगल

इमेज
नागला जंगल ठाणे -बोरीवली घोडबंदर रोड अहमदाबाद हायवेला जिथे मिळतो तिथे उजवीकडे वळल कि लगेच खाडीवरचा मोठा  पूल लागतो पूल ओलांडले का साधारण अर्ध्या -पाऊन किमी वर नागलाच्या जंगलात जाणारा रस्ता आहे.हि हिरवी वाट वेगळ्या विश्वात नेणारी आहे.आपण मुबई-ठाण्यात आहोत हे आपण चक्क विसरून जातो.आणि आपल्याला घनदाट जंगलाचा जबरदस्त फील जाणवतो.गायमुखचा समोरचा हा भूभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उत्तरेचा भाग आहे.हे म्हणजे नागाला जंगल.हाच पट्टा पुढे कामण,तुंगारेश्वरच्या टेकड्यांना जोडतो.त्यामुळे या जंगला मधील बिबट्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाण्या येण्याचा मार्ग सुरक्षित होतो.त्या ठिकाणी बिबटे,सांबर.रान डूकर,विविध रंगी फुलपाखरे आणि कीटक दिसतात.तसेच समुद्री गरुड,ब्राह्मणी घार देखील गुण्या गोविंदाने राहतात.                                                                ठाणे -बोरीवली घोडबंदर रोड अहमदाबाद हायवेला जिथे मिळतो तिथे उजवीकड...