मी आस्तिक का नास्तिक .. ? जिथे थोथांड नाही , जिथे कर्मकांड नाहीत , जिथे दक्षिणेच्या रूपातील खंडणीची सक्ती नाही आणि जिथे मन प्रसन्न करणारे वातावरण आहे , अशा धार्मिक स्थळी मी इतरांबरोबर आपसूक नतमस्तक होतो . अशा स्थळांवर जाणे मला आवडते . मला काही कोणाची त्यासाठी जबरदस्ती नसते , पण ते आपोआप घडते . याचा अर्थ मी पूर्णपणे नास्तिक नाही ..! जिथे कर्मकांड सुरु असतात .. जिथे अमुकच कपडे घाला , अशी सक्ती असते .. बेल्ट काढा .. फक्त लुंगी लावा . अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आज्ञा असतात , जिथे दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांच्यासाठी वेगळ्या रांगा आणि श्रीमंत भाविकांसाठी विशेष सोय असते , तिथे मी सरळ बाहेर उभा राहतो . दर्शन घेत नाही . तिथे बहुदा मी नास्तिक ठरतो . माझ्या घरी सकाळी लावलेल्या अगरबत्तीचा सुवास घरातील वातावरण प्रसन्न करतो , हे देखील खरं आहे . मी शोध घेतोय ….. ...