पोस्ट्स

कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक छोटासा प्रयत्न

खूप छान जुगलबंदी आहे इथे रंगली कविता आणि चारोळींची होतात इथे जबरदस्त दंगली काहीजण अप्रतीम शब्दांनी एकमेकांनासोबत नडली काहींना रविवारी देखील कामाची आहे पडली कविता आणि चारोळींच्या शब्दांवर प्रीत आमची जडली

माझी कविता

आठवणी राज्य करतात  माझ्या मनावर... तुला पाहताच अश्रूही येतात पटकन डोळ्यांवर...  झोपही उडून जाते  माझी तुझ्या आठवणींवर...  अन लिहीत बसतो  मी फक्त आणि फक्त तुझ्यावर...  मग ताबा ही राहत नाही माझ्या स्वप्नांवर... - विनायक पवार

आमची बोली भाषा - अहिराणी

इमेज
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी... अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं...

गणपती बाप्पा मोरया...

इमेज
गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि मग बाहेर पडूया जशी व्यवसायात प्रगती करूया तशीच नोकरीत प्रमोशन घेऊया सुखाने,समाधानाने जगूया... एवढेच बोलून संपवूया चला आत 2021 कसे असेल ते पाहूया. - विनायक पवार

सहज सुचली म्हणून....

इमेज
तुझ्याच हाती सर्व काही. माझ्या हातात काहीच नाही. तुझ्या हाती माझा आणि आईवडीलांचा जीव माझ्याच बँकेत तुझी फीक्स आणि ठेव तूच माझी होम मीनीस्टर तूच माझी फायनांस मीनीस्टर तूच मूलाबाळांसाठी प्रेमाची माऊली जशी उन्हाळ्यात हवीहवीशी वाटणारी सावली तू वजा होता मी शून्य शून्य तू बेरीज होता मी धन्य धन्य माझ्याकडून छोटासा हा एक प्रयत्न पूर्ण होतील आपले इच्छा आणि स्वप्न चलातर मग लॉकडाऊन मध्ये घेऊन यळकोट जय मल्हार जेजूरीचे दर्शन.... विनायक पवार

शब्द काही सूचेना....

इमेज
खरंच खूपच छान कविता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे डावपेच, डोळ्यात पाणी आणणारे 'श्याम ची आई' पुस्तक,जबरदस्त गाजलेले नाटक 'ती फुलराणी' आणि तुकोबांचे अभंग तसेच विस्फारलेल्या डोळ्यांनी वाचलेले खगोलशास्र चादोबा आणि फास्टर फेणे यांच्याशी झालेली दोस्ती आम्हांलाही आठवतात त्या पुस्तकातल्या गोष्टी...

आरोग्यधन संपदा - हेल्थ आणि वेल्थ

*आरोग्य म्हणी* १. खाल दररोज गाजर-मुळे,     तर होतील सुंदर तुमचे डोळे. २. सकाळी नाश्ता करावा मस्त,     मोड आलेले धान्य करावे     फस्त. ३. डाळी भाजीचे करावे सूप,     अखंड राहील सुंदर रूप. ४. तरोट्याच्या भाजीला म्हणू     नका स्वस्त,     आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ५. जवळ करा लिंबू संत्री,      दूर होईल पोटातील वाजंत्री. ६. पपई लागते गोड गोड,     पचनशक्तीला नाही तोड. ७.पालेभाज्या घ्या मुखी;    आरोग्य ठेवा सदा सुखी. ८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;     आरोग्य धोक्यात आणू नका. ९. दररोज एक फळ खावू या;     आरोग्याचे संवर्धन करु या. १०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;        थांबवेल आरोग्याचा ऱ्हास. ११. प्रथिने, जीवनसत्वे आणि       क्षार;       आहारात यांचे महत्व फार. १२. हिरवा भाजीपाला खावा        रोज;         राहील निरोगी आरोग्याची        मौज. १३. जेवणा नंतर केळी खा;  ...

माझे आवडते गाणे

इमेज
अँखियों के झरोखों से मैने देखा जो सांवरे तुम दूर नज़र आए, बड़ी दूर नज़र आए बंद कर के झरोखों को ज़रा बैठी जो सोचने मन में तुम ही मुस्काए, मन में तुम ही मुस्काए एक मन था मेरे पास वो अब खोने लगा है पाकर तुझे, हाए मुझे कुछ होने लगा है एक तेरे भरोसे पे सब बैठी हूँ भूल के यूँ ही उम्र गुजर जाए, तेरे साथ गुजर जाए जीती हूँ तुम्हे देखके मरती हूँ तुम्हीं पे तुम हो जहाँ साजन मेरी दुनिया है वही पे दिन रात दुआ माँगे मेरा मन तेरे वास्ते कहीं अपनी उम्मीदों का कोई फूल ना मुरझाए मैं जब से तेरे प्यार के रंगो में रंगी हूँ जगते हुए सोयी रही, नींदो में जगी हूँ मेरे प्यार भरे सपने, कही कोई न छीन ले मन सोच के घबराए, यही सोच के घबराए गीतकार : रविन्द्र जैन, गायक : हेमलता, संगीतकार : रविन्द्र जैन, चित्रपट : अँखियों के झरोखों से (१९७८)

टिव्ही वाले दादा

इमेज
टिव्ही वाले दादा तुम्ही काही बी दाखवा.. कुबेर यंत्र हनुमान यंत्र महालक्ष्मी यंञ दाखवा... पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्या साठी एखाद यंत्र दाखवा टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा भवानी ची खोटी तलवार दाखवा खोटा इतिहास दाखवा पण .... छञपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी एकदा तरी दाखवा.. टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा ...... जोतिष्य भविष्य राशी चक्र सगळं थोतांड दाखवा... पण..... महामानव डाँ बाबासाहेब  आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा एकदा तरी दाखवा.... टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा....... रामदेव बाबा दाखवा कामदेव दाखवा ट्रीपल  श्री दाखवा आसाराम दाखवा  राजकारणात घुसलेले सगळे जंत दाखवा..... पण एकदा तरी अंगावर चिंध्या पांघरुन जनतेची निस्वार्थ पणे सेवा करणारे खरे संत गाडगेबाबा एकदा तरी दाखवा...

आधुनिक मामाचे गाव

आधुनिक मामाचा गाव  झुक झुक झुक आगीनगाडी  धुरांची रेषा विसरून गेली एसीचे डबे बुक करूया मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव हाय मोठा मॉल बझारला नाही तोटा ऑन लाईन शॉपिंगही करूया मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा पगारदार घेऊन येई ऑडी कार लाँग ड्राईवला जाऊया फोर व्हिलर शिकूया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको शिकलेली व्हाट्सअप मध्ये गुंतलेली तिला जोक पाठवूया रूसलेली मामी हसवूया  मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको चटपट  रोज रोज मॅगी झटपट पिझ्झा बर्गर खाऊया  मामाच्या गावाला जाऊया

मैत्रीण पाहिजे

मैत्रीण पाहिजे अशी कधी कधी तिढ्यात कधी कधी कोड्यात कधी गोडीत बोलणारी... मैत्रीण पाहिजे अशी कधी सुख वाटणारी कधी दु:ख वाटणारी कधी समजून घेणारी... मैत्रीण पाहिजे अशी कधी आपलंस करणारी कधी अश्रु पुसणारी कधी कधी झापणारी.. मैत्रीण पाहिजे अशी नेहमी मन जाणनारी ह्रदयात बसणारी गालात हसणारी.. मैत्रीण पाहिजे अशी वाट दाखवणारी कौतुकाने पाहणारी संकटात हात देणारी... मैत्रीण पाहिजे अशी ओठावर हसु आणनारी कधी डोळे वटारणारी चुकलं तर कान धरणारी... मैत्रीण पाहिजे अशी जीवाला जीव देणारी कधी भाव खाणारी कधी भाव देणारी... मैत्रीण पाहिजे अशी कधी तिखट बोलणारी कधी तिखट वागणारी कधी गोडी लावणारी... मैत्रीण पाहिजे अशी मंजुळ पाव्यासारखी दुधाच्या खव्यासारखी...

तूच तुझी वैरी

बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष समानता विचार मले पटते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते माणसानं म्हणतात मागं ठेवल्या बाया पण एका हातानं सांगा वाजतात का टाया बाईचं सुख पाहुन बाईच आतून पेटते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो कसा काय बाईले तो कमी लेखत असतो जागो जागी आपल्याले हेच दिसत असते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते एस. टी.त बाईले माणूस जागा देईन पण बाई मात्र बाईले तशीच ऊभी ठेईन आणखीनच ते आपलं फतकल मांडून बसते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते पोराची माय सारं घरूनच सांगते सून घरी आली की सासूलेच खूपते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते एक दिवस माह्या घरी सायी माही आली काय सांगू राज्या मले लय खुषी झाली बायकोले बापा माह्या हे बी खटकते खरं सांगतो बाईचं बाईच्या जिवावर उठते मले वाटलं सायीले सिनेमाले नेवाव बायकोची बहीण म्हणून मागीन ते देवाव बायकोले वाटे आता म...

आपण कोण आहोत

मित्रांनो... ते म्हणाले सतीची प्रथा चालू रहावी हे म्हणाले सतीची प्रथा बंद व्हावी हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले स्त्रीयांना शिक्षण नको हे म्हणाले स्त्रींयाना शिक्षण मिळायला हवे हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले विधवांचे केशवपनच व्हावे हे म्हणाले केशवपन बंद झाले पाहीजे हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले विधवांचा पुनर्विवाह नकोच हे म्हणाले विधवांचा पुनर्विवाह झाला पाहीजे हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार नको हे म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार हवा हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले स्त्रियांना संपत्तीत हिस्सा नको हे म्हणाले स्त्रीयांना संपत्तीत हिस्सा हवाच हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले इथे यांना वा त्यांना प्रवेश नको हे म्हणाले इथे सर्वांनाच प्रवेश मिळालयला हवा हरले ते आणि जिंकले हे! जगाचा इतिहास सांगतो सातत्याने ते हरले सातत्याने हे जिंकले ते सतत हरतात आणि हे सतत जिंकतात ... आपण कोण आहोत? ते आहोत की हे आहोत...?

मिसळ पाव

इमेज
॥ मिसळ पाव ॥ आयुष्य एक मिसळ आहे, ज्यात सुखाचे मोड आलेले मुग आणि मठ शोधावे लागतात. असंख्य अनुभवांचं फरसाणच अधिक असतं. ढिगभर आणि डिशभर दु:खाचा कांदा डोळ्यात पाणी आणतो. स्नेह,प्रेम, आपुलकी यांची हिरवीगार कोंथिंबीर मिसळीची शोभा वाढवते. मतभेदांचं दही, लिंबू जिभेला चरका मारतं, तरी ते हवं असतं. स्वप्नांच्या ठिसूळ पापडाचे क्षणात तुकडे तुकडे होतात. मनोरथांच्या रश्शात मनाचा पाव जितका बुडवावा तितका तो फुगत जातो. शेवटी जिवाच्या मित्रांबरोबर अशा मिसळीची लज्जत चाखण्यात खरी मजा असते. आणि अशावेळी हातातला स्टीलचा चमचादेखील सोन्याचा होऊन जातो.

चहा की काॅफी

इमेज
मला हे comparison आवडले. चहा…! की कॉफी…!! चहा म्हणजे उत्साह.. कॉफी म्हणजे स्टाईल..! चहा म्हणजे मैत्री.. कॉफी म्हणजे प्रेम..!! चहा एकदम झटपट.. कॉफी अक्षरशः निवांत..! चहा म्हणजे झकास.. कॉफी म्हणजे वाह मस्त..!! चहा म्हणजे कथा संग्रह.. कॉफी म्हणजे कादंबरी..! चहा नेहमी मंद दुपार नंतर.. कॉफी एक धुंद संध्याकाळी.!! चहा चिंब भिजल्यावर.. कॉफी ढग दाटुन आल्यावर.! चहा = discussion.. कॉफी = conversation..!! चहा = living room.. कॉफी = waiting room..! चहा म्हणजे उस्फूर्तता.. कॉफी म्हणजे उत्कटता..!! चहा = धडपडीचे दिवस.. कॉफी = धडधडीचे दिवस..! चहा वर्तमानात दमल्यावर.. कॉफी भूतकाळात रमल्यावर..!! चहा पिताना भविष्य रंगवायचे.. कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!

लोकशाही…२०१४

इमेज
ना ’शरदा’चे चांदणे ना ’सोनिया’चा दिस ’घड्याळा’चे ओझे ’हाता’ला म्हणून ’आय्‌’ कासावीस! ’कमळा’च्या पाकळ्यांची ’यादवी’ छ्ळते मनाला ’धनुष्य’ आलयं मोडकळीस पण जाणीव नाही ’बाणा’ला! ’विळा, हातोडा’ आणि ’कंदीला’ला आजच्या युगात स्थान नाही डब्यांना ओढू शकेल एवढी ’इंजिना’त जान नाही! ’मन’ आहे ’मुलायम’ पण ’माया’ कुठेच दिसत नाही ’हत्ती’वरून फिरणारा ’सायकल’वर बसत नाही! कितीही उघडी ठेवा ’कवाडे’ ’प्रकाश’ आत जाणार नाही विसरलेले ’आठवले’ तरीही ’गवई’ गीत गाणार नाही! ’बंडखोर पक्षां’चा थवा ’पार्टी’साठी आतूर कुंपणच खातय शेताला आणि बुजगावणंही फितूर! - डी. के. खिरे