पोस्ट्स

मिर्चमसाला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फक्त दोनच.......

इमेज
सिनेमांची कमाई आता 100 कोटींवरून 200 कोटींवर झेपावणार असल्याच्या कितीही बाता बॉलिवूडकरांकडून मारल्या जात असल्या, तरी त्या पोकळ ठरल्याचं दिसून येतंय यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुमारे 80 हिंदी चित्रपटांपैकी जेमतेम 2 चित्रपटांना 100 कोटींचा आकडा गाठता आलाय. प्रेक्षकांची पसंती आशयघन सिनेमांना जास्त मिळते. सिनेमातून दिल्या जाणा-या संदेशावर लोकांचं लक्ष आहे. यावर्षांची सुरुवातच अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर असे दोन तगडे स्टार असलेल्या 'वझीर' ने झाली खरी पण हा चित्रपट चालला नाही. अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' नं आशयाच्या जोरावर 128 कोटीचा बिझनेस केला. त्याच्यानंतर मात्र शाहरूखचा 'फॅन' प्रियांका चोप्राचा 'जय गंगाजल' सोनम कपूरचा 'नीरजा' हे चित्रपट पोटापुरता गल्ला जमवत एक्झिट घेतली.पण अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल 3' या मल्टीस्टारर चित्रपटानं 106 कोटींचा आकडा पार केला.

दखल

इमेज
चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असे मानले तर आपल्या चित्रपटातून आपण काय संदेश देत आहोत आणि समाजमनावर त्याचा काय परिणाम होणार आहे हा विचार दिग्दर्शकाने करणे अपेक्षित आहे. अनेकदा चित्रपट पाहून तरूण वाईट शिकतात, मग रामायण बघून चांगले का शिकत नाहीत, असा प्रश्न केला जातो. चित्रपट, साहित्य या सगळ्यांचाच समाजमनावर कळत नकळत परिणाम होत असतो. परिणाम होत नसेल तर त्या चित्रपटाला अर्थ तरी काय राहिला? म्हणूनच चित्रपटासारखे माध्यम अतिशय काळजीपूर्वक आणि जवाबदारीने हाताळले पाहिजे.शाहीद कपूर चा उडता पंजाब हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुन्हा शाहीद कपूर ने आपल्या अभिनयाने सर्वाना आपली दखल घ्यायला भाग पाडले.                त्याचे वडील अभिनयातले 'दादा' म्हणून ओळखले जातात. तरी त्याने त्यांची ओळख सुरूवातीच्या काळात कधी सांगितली नव्हती. त्याला नृत्याची आवड होती.नृत्यात निपुण आहे म्हणून 'दिल तो पागल है' नाहीतर 'ताल' सारख्या चित्रपटात नाचणा-यांच्या गर्दीत तो पहिल्यांदा झळकला. मग एका पॉप गाण्यात तो चमकला. त्याला पहिल्यानंतर हा पोरगेलसा दिसणारा बॉलिवूडचा हिरो...

क्रिकेटवर चित्रपट नकोसा....

इमेज
आयपीएल असो वा वनडे सामने क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. मात्र क्रिकेटवर आधारित चित्रपटांची बॉक्स आॅफिसवरची टक्केवारी फारशी बरी नाही. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यावर डॉक्युड्रामा असल्याने अर्थातच त्याबाबत उत्सुकता आहे. तसेच 'धोनी... चा टीझर आल्यापासून इंडस्ट्रीत ब-यापैकी सकारात्मक चर्चा आहे. मात्र आजची सिने परिस्थिती बघता चित्रपटात क्रिकेट असो वा नसो चांगला आशय असणे खूप गरजेचे आहे. क्रिकेट हा तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने दिग्दर्शकांच्या दृष्टीने हे सिनेमे बनवणे आणखी अवघड असते. भारतात मनोरंजनाची दोन मुख्य साधने म्हणजे चित्रपट आणि क्रिकेट मात्र बॉक्स आॅफिसवरची आकडेवारी बघता मोठ्या पडद्यावर जेव्हा जेव्हा क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांकडे पाठ फिरवली आहे. हॉकी, बॉक्सिंग, अथलेटिक्स या सगळ्या इतर खेळांवरील हिंदी चित्रपटांनी चांगला गल्ला कमावला असून क्रिकेटच्या पदरी मात्र कायमच निराशाच आल्याचे चित्र आजवर दिसून आलेत. क्रिकेटवर आधारित 'पटियाला हाऊस', 'दिल बोले हडीप्पा','फेरारी की सवारी','चैन कुली...

सैराटबद्दल ......

इमेज
सैराटबद्दल,..... निळू फुलेंनी सांगितलेल्या एका वाक्यावर  माझा विश्वास आहे. ' समाज कधी तमाशाने बिघडत नसतो,किर्तनाने सुधरत नसतो.' मला एका गोष्टीचं नवल वाटत ,ज्या समाजाने मर्डर सारखे चित्रपट स्वीकारले ,पोर्नस्टार सनी लिओनला स्वीकारले ,त्या समाजाला नागराज मंजुळेंच्या सैराटबद्दल आक्षेप असावा ? कदाचित् फँड्रीने जाती-व्यवस्थेवर मारलेल्या दगडाने जखमी झालेल्या जातीयवादी समाजाची जखम सैराट येईपर्यंतही बरी झालेली दिसत नाही. नागराज मंजुळेंजी अभिनंदन. तुप घालून वरण-भात खाण्याची सवय झालेल्या समाजाला हिरव्या मिरचीचा ठेचा वाढल्याबद्दल..

सैराट बघा

इमेज
‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिला आहे. त्यातूनचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर आणि प्रोमो गाणे प्रदर्शित करून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. सैराट बघण्याची 17 कारणे --------------------------------- 1) जगभर गाजलेला फँड्री बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट 2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत 3) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात 2016 मधील एकमेव मराठी चित्रपट 4) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट 5) हॉलीवुड मधे संगीत रिकॉर्डिंग झालेला सैराट हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट 6) रिंकू राजगुरु ह्या नाववीत शिकणाऱ्या अकलूजच्या ( सोलपुर ) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रिय पुरस्कार पटकावला 7) 'पिस्तुल्या' , 'फँड्री' आणि आता 'सैराट' या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रिय पुरस्कार मिळवून देऊन हैट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक- नागराज पोपटराव मंजुळे 8) नवख्या नॉन-एक्टर प...

मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे 'नटसम्राट'

                                   मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे                    नटसम्राट' हा चित्रपट. ह्या चित्रपटाच आताच मोठ्या जोश्यात आगमन झाले. चित्रपट सुपर हिट झाला. त्याबद्द्ल सर्व मराठीबांधवांना धन्यवाद. परंतु ह्या चित्रपटाची copy लिक झाली. परंतु मी सर्व ज्यानी हा चित्रपट पाहीला नाही व पहायचा आहे त्याना विनंती आहे की हा कृपया चित्रपट थिएटर मधेच जाउन पहावा कारण ह्या चित्रपटातील profit मधून काहीभाग गरीब शेतकऱ्यांना जानार आहे. त्या गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून. सर्वानी हा चित्रपट नक्की थिएटर मधेच पहा .