पोस्ट्स

टॉक टाईम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मनातलं मन...

इमेज
  खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती...   आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत... प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्या...

पछाडलेला...

इमेज
मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान, ढोंगी आणि मजेशीर प्राणी आहे. आनंदाच्या क्षणांसाठी किंवा दुःख विसरण्यासाठी म्हणा हवं तर, त्याने दारुचा शोध लावला म्हणून तो बुद्धिमान आहे.आता मद्यपी नशा करतात असा आरोप आहे. पण पछाडलेल कोण नसतं? कुणाला पैशाची पछाडलेल असते, कुणाला गरिबीनी! कुणाला सत्तेने पछाडलेल असते तर कुणाला विरोधाने! किंबहुना ज्यांना कोणत्याही गोष्टीने पछाडलेल नाही, त्यांचं जीवन व्यर्थच! काळ बदलला, नी नशेत असताना काही चांगला विचार होऊ शकतो ही शक्यताच बहिष्कृत झाली. इतकी की, मद्याला स्पर्श देखील न करणाऱ्या माणसानं काही उलट सुलट वक्तव्य केलं तर त्याला काय दारू पिऊन आलाय का असं हेटाळलं जातं.संचारबंदीच्या काळातच ‘होममेड अल्कोहोल’ म्हणजे घरातल्या घरात दारु कशी बनवता येईल हे ऑनलाइन सर्च करणा-यांचं प्रमाण वाढलं. बाजारात दारु उपलब्ध नाही म्हणून ती घरी कशी बनवता येईल, दारु बनवण्याची ‘रेसिपी’ कुठे मिळेल, याचा विचाराने "पछाडलेला" हा बुद्धिमान प्राणी करु लागला. आहे की नाही गंमत! गुगल ट्रेंड्सनुसार, २२ मार्च ते २८ मार्च या आठवड्यात “घरी अल्कोहोल कसं बनवावं” (how to make alcohol at ho...

एक छोटासा प्रयत्न...

इमेज
राजकारण हा विषय मलाच काय? कोणालाही न समजणारा विषय आहे तरी या विषयावर नेहमी शांत बसणारे माणसे देखील भरभरून बोलायला लागतात किती प्रेम किती जिव्हाळा असतो त्यांचा या विषयावर राजकारण इतिहासात देखील होते त्यांचे ज्वलंत उदाहरणे म्हणजे रामायण आणि महाभारत.शहाणे लोकांनी कोर्टाची पायरी चढू नयेत असे म्हणतात तसेच राजकारणावर बोलू काही त्यापेक्षा शांतपणे बसणे केव्हाही योग्यच म्हणावे लागेल. न्यूज चॅनलवाले मात्र आपले काम व्यवस्थित करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.श्रीमंत लोकांनाकडून लॉक डाऊन काळात कोणाकडून किती देणगी मिळाली किंवा लॉकडाऊन असताना श्रीमंत लोक घरात काय करतात? तसेच गरीब लोक कसे जगतात त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि सरकार त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करते याबद्दल न्यूज चॅनलवाले जीव मुठीत धरून पुढाकार घेतांना दिसत असले तरी मध्यमवर्गी लोकांचे काय? त्यांच्याकडे तर सरकारचे दुर्लक्षच आहे.निदान न्यूज चॅनलवाल्यांनी तरी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लॉकडाऊन मुळे आरोग्य,उदयोगधंदे,नोकरी आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. लॉकडाऊन मुळे...

एक नाणे आणि दोन बाजू...

इमेज
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं नाही तर हा कालावधी वाढूही शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि कृपया आपल्या घरातच रहा कारण लॉकडाउन वाढविणे किंवा कमी करणे हे आपल्याच हातात आहे हे नेहमी लक्षात ठेवा.आपण स्वतः घरातच लॉक होऊन कोरोनाला डाउन करणे म्हणजेच  लॉकडाउन. एकीकडे करोनाबाधित रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे ‘सारी’ आजाराचेही (सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) सावट निर्माण झाले आहे.  विदर्भात सारीचे सुमारे साडेतीनशे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी हवालदील झाले आहे.           कोरोनाने शेअर बाजरात धुमाकूळ घातला २० जानेवारीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर ४२,२७३ चा उच्चांक मारत १३ मार्चला विक्रीचे दहा टक्क्यांचे खालचे सर्किट लागत २९,३८८ चा नीचांक नोंदविला गेला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १२,४३० च्या उच्चा...

एक कटूसत्य

इमेज
थोडे हंसून घ्या, वाचा आणि विचार करा आयुष्याची वाटणी या जगाची निर्मिती करतांना परमेश्वराने आधी गाय बैल बनवले आणि त्यांना सांगितले, “तुम्ही जन्मभर उन्हातान्हात कष्ट करून मानवांची सेवा करा. तुम्हाला मी साठ वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर ते म्हणाले, “नको, आम्हाला वीस वर्षे पुरेत. चाळीस वर्षे परत घ्या.” त्यानंतर परमेश्वराने कुत्र्याला बनवले आणि सांगितले, “तू मानवांच्या दारात बसून भुंकत रहा. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.” त्यानंतर परमेश्वराने माकडाला बनवले आणि सांगितले, “तू उड्या मारून मानवांची करमणूक कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “नको, मला दहा वर्षे पुरेत. दहा वर्षे परत घ्या.” अखेर परमेश्वराने माणसाला बनवले आणि सांगितले, “तू झोपा काढून, खेळून आणि खाऊन पिऊन मजा कर. तुला मी वीस वर्षांचे आयुष्य देतो.” त्यावर तो म्हणाला, “हे काय, मला फक्त वीस वर्षे ? या इतर प्राण्यांनी परत केलेली वर्षे पण मला द्या.” परमेश्वर म्हणाला,”तथास्तु.” म्हणूनच देवाने दिलेली पहिली वीस वर्षे माणूस मजेत घालवतो, त्यानंतर...

तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे का

इमेज
नेटसर्फिंग असो वा एखाद्या साईटवर माहिती फिलअप करणे असो, कोणतेही गाणे, गेम अथवा व्हिडिओ डाऊनलोड करताना फसव्या वेबसाईटवरून "फ्री‘ घेण्याच्या फंदात पडू नका. अधिकृत वेबसाईटवरूनच सॉफ्टवेअर, गाणी डाऊनलोड करा, तुम्ही टेक्‍नोसॅव्ही असालही; पण सायबर हॅकर्स तुमच्यापेक्षाही चतुर आहेत. तुमचा पासवर्ड, माहिती चोरण्याचे प्रयत्न ते करू शकतात.  पारंपरिक गुन्ह्यांचे स्वरूप आता बदलत असून विनयभंग, फसवणूक व छेडछाडीचे प्रकार आता सोशल साईटसवर होऊ लागले आहेत. महिला, मुलींना जॉब ऑफर देण्यापासून ते त्यांची फसगत करेपर्यंत हे भामटे सक्रिय झाले आहेत. सायबर क्राईम करणाऱ्यांसाठी अख्खे जग खुले असल्याने या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. सोशल वेबसाईटवर खाते उघडण्यापासून ते विविध वेबसाईटस्‌ सर्फिंग करून त्यात माहिती फिलअप करण्यापर्यंत आपण प्रवास करतो. अशावेळी या साईटस्‌ नियंत्रित करणारे आपली माहिती चोरण्याची शक्‍यता असते. फेसबुकचा पासवर्ड चोरून फोटो विद्रुप करून प्रसिद्धही केले जात आहेत. त्यावरील छायाचित्रांचा अश्‍लील वेबसाईटसाठी वापर केला जात आहे.

मुलभुत अधिकार कोणते

इमेज
देशातील कायदा आपल्या प्रत्येक हलचालींवर, बोलण्यावर, कृतीवर नियंत्रण ठेवणारा, संरक्षण करणारा आहे. मात्र, आपले मुलभूत अधिकार कोणते? हेच बहुतांना माहीत नसते. आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या सामान्य घटनांशी संबंधितही अनेक कायदे व मुलभूत अधिकार आहेत. आज  तुम्हाला कायदा आणि नागरी अधिकारांबद्दलची माहिती देत आहे. याची गरज तुम्हाला किंवा तुमच्या आप्त, मित्रांना केव्हाही पडू शकते.

बॅड पॅच

इमेज
बॅड पॅच एक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.शांत सुरळीत सुरु असलेल्या सन आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट  वाट लागते...नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नको करुन सोडतो...आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...   संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!! यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे: १. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं! २. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते. ...

लोक म्हणतात

इमेज
लोक म्हणतात........    मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रमामध्ये गेलं नसतं , पण प्रत्येक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत... वृद्धाश्रमात आईवडिलांना बघून सर्व लोक मुलाना दोष देतात, परन्तु, लोक हे कसे  विसरतात की, तिथे पाठविण्यामध्ये कुणाच्या मुलीची पण मुख्य भूमिका असते, नाहीतर मुलानी लग्ना आधीच आईवडिलाना वृधाश्रमात नसत का पाठवल,संस्कार मुलीना पण दया म्हणजे कुणी फ़क्त मुलाना दोष लावणार नाही. कटु आहे पण सत्य आहे.

योग्य प्रस्ताव ठेवा

इमेज
  केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारवर दोन महिन्यांत एकाच विषयावरचे प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की एकदा नाही तर दोनदा आेढवली आहे. कर्मचा-याना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी सरकारने घातलेल्या 58 वर्षे वयाच्या अटीच्या विरोधात देशभरात कामगार संघटनांनी आंदोलन करून हा प्रस्ताव मागे घ्यायला भाग पाडले आणि दुसरे कर्मचारी काढणार असलेल्या 60 टक्के रकमेवर कर आकारण्याचा अर्थमंत्री अरूण जेटली यांचा प्रस्ताव पचनी न पडल्याने तोही मागे घेण्यात आला. स्वतःचे पैसे काढण्यासाठी 58 वर्ष कोण वाट पाहणार? दोन्ही दुरूस्त्या आणि प्रस्ताव चुकीचे होते सरकारचा प्रस्ताव मागे घेण्याची आेढावलेली नामुष्की एकीकडे सरकारचा कमकुवतपणा जाहीर करते तर दुसरीकडे सरकारचे वास्तवापासून सुटलेले भान दर्शवते चांगले दिवस दाखवण्याचे स्वप्न दाखवले होते हेच का ते चांगले दिवस तुम्ही तुमचे प्रस्ताव असे मांडा की जेणेकरून ते देशासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरतील.

लक्ष असू द्या

इमेज
कोकणाची मुंबई होऊ देऊ नका,... जास्त पैशासाठी आपल्या जमिनी परप्रांतीयाना विकु नका..   आपल्या गावी कोणत्याही भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक आली, तर त्यांची उठाबस करायची, त्यांना काय हवे नको ते पाहायचे, पण त्यांच्या गोड स्वभावाला किंवा पैशाला बळी पडून त्यांना आपल्या गावातील भूमी विकाची नाही. त्याबद्दल जागरूक रहा, " येवा कोकण आपलाच असा " बोलत बसू नका. आपलं गांव तरी आपल्या ताब्यात ठेवा, गाव म्हणजे फक्त आपल्या घरची मंडळी आणि घरापुढचे अंगण आणि गाडी पार्किंग ची जागा नाही, गांव म्हणजे गावांत राहणारी आपली सर्व माणसे, आपली भाषा आपले राज्य आपले देव आपली देवळं,आपल्या शेती. कोकण मध्ये दुहेरी रेल्वे मार्गासाठी परवानगी मिळाली आहे, त्यामुळे अजून परप्रांतीय लोंढे आपल्या गावी येऊन भूमी विकत घेणाच्या विचारात असतील, आपल्या भूमी आपल्याच मराठी माणसाला विका. नाही तर उद्या तुमच्या नातवाला तुमचं गांव म्हणजे मुंबईच वाटायची. लक्ष असू दया...

निदान आता तरी

इमेज
मंदिर प्रवेश नव्हता तरी माॅसाहेब जिजाऊ 'राजमाता' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सावित्रीबाई 'क्रांतीज्योती' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लक्ष्मीबाई झाशीच्या 'राणी' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लतादीदी हिंदुस्थानच्या 'गानकोकिळा' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डाॅक्टर झाल्या. मंदिर प्रवेश नव्हता तरीही कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.आणि मंदिर प्रवेश नव्हता तरीही प्रतिभाताई देशाच्या पहिल्या महिला 'राष्ट्रपती' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सिंधुताई अनाथांच्या माय झाल्या. .. .. .. तृप्ती देसाई, तुम्हाला मंदिर प्रवेश मिळालायं. निदान आता तरी आपल्या देशात अनेक समस्या आहेत दुष्काळ, शेतकरी बांधवाचे आत्महत्या,दारूबंदी व डान्सबार बंदी त्या विषयी आवाज उठवा आणि लढा आम्ही तुमच्या सोबत असू.   आज राम नवमी...राम नवमीच्या शुभेच्छा... देवा कडे पाणी मागितले तर समुद्र दिला !!! फुल मागितले तर बागच दिली !!! घर मागितले तर राजवाडाच दिला !!! आणी मग..... देवापाशी देवच मागितला तर..... त्यांनी तुमच्यासारखे गोड माणसे दिल...

पर्यावणाला ग्रहण लागेल

इमेज
     शहराचे सांडपाणी आणि औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक पाणी पोटात घेणाऱ्या ठाणे खाडीतील वाढत्या प्रदूषणामुळे येथील ९० टक्क्यांहून अधिक मत्स्यप्रजाती नष्ट झाल्या असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याशिवाय खारफुटी, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, शंख, चिंबोरी, कीटक, कोळी, दलदलीय जीवजंतू यांच्या प्रजातीही घटल्या आहेत. एकीकडे खाडीच्या पर्यावरणाला ग्रहण लागले असताना दुसरीकडे खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे खाडी परिसरात १५५ हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.ही खूप  आंनदाची बाब असली तरी त्यांपैकी सात प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व धोकादायक बनले आहे.त्यामुळे आता प्रदुषण थांबविणे खुपच महत्वाचे ठरणार आहे.          प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्या...

हे कधी थांबणार

इमेज
  प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला.त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.     आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळविणे ही दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा आहे .देशांत वर्षभर कुठे नाकुठे कसोटी सामने ,एकदिवसीय सामने आणि T-20 सामन्यांचा उरुस भरलेलाच असतो.मग कुठलेही महत्व नसणाऱ्या या आयपीएलचा तमाशा ऐन  उन्हाळ्यात आणि तोही आपल्यासारख्या दुष्काळग्रस्त देशात अट्टाहासाने भरवण्यात कुठलं शहाणपण आहे ? पैशाला हपालेले हे आयपीएलचे आयोजक इतके संवेदनाहीन कसे? करमणुकीसाठी चालविलेली ही थेरं तात्काळ बंद व्हायलाच हवीत. त्यासाठी आता सरकारनेच कुठल्याही,कोणाच्याही दबावाला बळी न पडता यात हस्तक्षेप करुन हे श्रीमंती चाळे थांबवायला हवेत. आणि हे जर होणार नसेल तर मग आताच्या सरकारमध्ये आणि पूर्वीच्या सरकारमध्ये फरक तो काय राहिला असा सवाल जर दुष्काळग्रस्त जनतेच्या मनात उभा राहिला तर का...

काय चालु आहे

इमेज
जाती पाती च्या पलीकडे जाऊन "महाराष्ट्रधर्माची" व्याख्या सांगणाऱ्या आणि आपण सगळे मराठी आहोत असे सुतोवाच करणाऱ्या राज ठाकरेंना हिंदी मिडिया देशद्रोही, जहर उगला अशी विशेषणे लावते.. आणि दुसरीकडे भारतीय सैनिक बलात्कारी आहे, नक्षलवादी बिचारे आहेत असे बोलणाऱ्या कनैह्या कुमार ला "Freedom Of Speech" चा हक्क नाही का अशी बाजू धरते..... अशी दुतोंडी मिडीया कुठे पहावयास मिळणार एका विषयी भरभरून बोलणार आणि एका विषयी मुग गिळून बसणार हिरो करणार.

सहजच सूचले म्हणून

कांद्याचे टोमॅटोचे भाव पडल्यावर शेतकरी रस्त्यावर कांदे टोमॅटो फेकून निषेध करतो ....... दुधाचे भाव पडल्यावर दूधगवळी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करतो...... एवढंच काय कोणताही भाजीपाला, वस्तु यांचा व्यापार करणारे हेच करतात.... मग जवळ जवळ महिनाभर संप पुकारणारे सराफ यांनीही सोन रस्त्यावर टाकून निषेध करायला काय हरकत आहे. !एका देवळात असलेली प्रचंड गर्दी एक मुलगा कुतूहलाने पाहत होता; तेवढ्यात एक पंडित त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाला, "आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन होणे कठीण, इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था आहे, मला ५०१/-  रुपये दे, मी तुला थेट दर्शन करवून देतो! मुलगा म्हणाला, "५००१/- रुपये देतो, देवाला सांग, बाहेर ये, मी आलोय!" पंडितजी, "मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का? आणि तू कोण आहेस?" मुलगा पुन्हा म्हणाला, "मी ५१०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या घराजवळ येऊन भेट!" पंडितजी,"तू देवाला समजतोस तरी काय?"मुलगा,"तेच तर मी म्हणतोय... "तुम्ही सर्व जण देवाला समजता तरी काय..? ...

वातानुकूलित लोकलचा पास महागडा

इमेज
वातानुकूलित लोकलचा पास खर्चिक मध्य रेल्वेवर नव्याने दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीमुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार असला, मध्य रेल्वेवर नव्याने दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीमुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार असला, मात्र कोणतीही सवलत नाही; तिकीट दरही चढेच असण्याची शक्यता पुढील काही महिन्यांत मध्य रेल्वेवर नव्याने दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीमुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार असला, तरी हा प्रवास मुंबईकरांच्या खिशाला मात्र चांगलाच गरम पडण्याची शक्यता आहे. या लोकलचा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना नेहमीच्या उपनगरीय पासात मिळते तशी कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. त्यामुळे या प्रवाशांना पूर्ण ३० दिवसांचे पैसे भरावे लागणार आहेत. तसेच सध्या दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर या गाडीचे तिकीट असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात हे दर मुंबई मेट्रोसारखेच चढे असतील, असे समजते. मुंबईकरांसाठीची वातानुकूलित लोकल आज, मंगळवारी मुंबईत दाखल होणार आहे. ही लोकल कुर्ला कारखान्यात येणार असून तेथे विद्युत तसेच वातानुकूलित यंत्रणेची काही कामे झाल्यावर १६ एप्रिलपासून त्या...

एका तलावाची गोष्ट

इमेज
  उन्हाळ्याच्या झळांनी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सगळेच हैराण झालेले असताना संजय गांधी अभयारण्यांच्या येऊर ठाणे येथील जंगलात जनावरांच्या  पाण्यासाठी बांधलेला एक तलाव गायब झाला आहे. 2012-13 साली त्याचे नूतनीकरण झाले होते. वन खात्याच्या नियमानुसार जंगलात कोणत्याही प्रकारे भराव टाकण्याला बंदी आहे असे असतानाही 30 ते 40 फूट खोलीचा तलाव बुजवून टाकला.

काय चाललंय....

काय चाललंय शिवरायांच्या ह्या महाराष्ट्रात..?? रोज नवीन नवनवीन घोषणा, कोण म्हणत वंदे मातरमला राष्ट्रगीत करा तर कोण म्हणत भगवा राष्ट्रध्वज करा..??? महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले रोज काही ना काही ऐकायला येत आहे... दुष्काळानं, पाणीटंचाईनं माणसं-जनावरं मरायला लागलीत. नेत्यांना तोंडाच्या वाफा सोडायला काय जातेय?

निषेध का कशासाठी

....उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही आपल्या आडमुठ्या भुमिकेवर कायम असणा-या शनी-शिंगनापूर मंदिर ट्रस्ट आणि तेथिल  ग्रामस्थांचा तीव्र निषेध...!! ...राज्यापुढचे मुळ मुद्दे बाजूला सारून केवळ भावनिक मुद्द्यांना हवा देवून,भावनांचे राजकारण करून त्यावर आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यात सगळेजण आघाडीवर असतात या  लोकांना साष्टांग दंडवत...!!