पोस्ट्स

एक छोटासा प्रयत्न

खूप छान जुगलबंदी आहे इथे रंगली कविता आणि चारोळींची होतात इथे जबरदस्त दंगली काहीजण अप्रतीम शब्दांनी एकमेकांनासोबत नडली काहींना रविवारी देखील कामाची आहे पडली कविता आणि चारोळींच्या शब्दांवर प्रीत आमची जडली

मनातलं मन...

इमेज
  खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती...   आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत... प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्यांचा अट्टा

काळ

जीव कासावीस होतो माझा आठवणींच्या काळात... का जगायचं घडून गेलेल्या आपल्या भूतकाळात... आपण पण मस्त जगायचं फक्त आणि फक्त वर्तमान काळात... तरच आपले आयुष्य चांगले जगता येईल भविष्य काळात... - विनायक पवार

शुभ दिपावली

एक करंजी.. आनंदाने भरलेली..  एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..  एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी..शुभेच्छा देणार...    " तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा" शुभ दिपावली........

माझी कविता

आठवणी राज्य करतात  माझ्या मनावर... तुला पाहताच अश्रूही येतात पटकन डोळ्यांवर...  झोपही उडून जाते  माझी तुझ्या आठवणींवर...  अन लिहीत बसतो  मी फक्त आणि फक्त तुझ्यावर...  मग ताबा ही राहत नाही माझ्या स्वप्नांवर... - विनायक पवार

मोठे रॅकेट...

इमेज
कोरोना - जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट. जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही. जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार.  या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला  आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे. व्यक्तीचे नाव. डॉ-बिस्वरूप राय चौधरी. यांचे काय म्हणणे आहे. 1.टेस्ट किट. तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही. त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या  कोरोना टेस्ट किट मध्ये आहे. तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही. तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते. कारण या टेस्ट किट  सदोष आहेत. 2. मास्क. मास्क वापरणे हे  आरोग्यास सर्वांत अहितकारक आहे. उलट तुम

पछाडलेला...

इमेज
मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान, ढोंगी आणि मजेशीर प्राणी आहे. आनंदाच्या क्षणांसाठी किंवा दुःख विसरण्यासाठी म्हणा हवं तर, त्याने दारुचा शोध लावला म्हणून तो बुद्धिमान आहे.आता मद्यपी नशा करतात असा आरोप आहे. पण पछाडलेल कोण नसतं? कुणाला पैशाची पछाडलेल असते, कुणाला गरिबीनी! कुणाला सत्तेने पछाडलेल असते तर कुणाला विरोधाने! किंबहुना ज्यांना कोणत्याही गोष्टीने पछाडलेल नाही, त्यांचं जीवन व्यर्थच! काळ बदलला, नी नशेत असताना काही चांगला विचार होऊ शकतो ही शक्यताच बहिष्कृत झाली. इतकी की, मद्याला स्पर्श देखील न करणाऱ्या माणसानं काही उलट सुलट वक्तव्य केलं तर त्याला काय दारू पिऊन आलाय का असं हेटाळलं जातं.संचारबंदीच्या काळातच ‘होममेड अल्कोहोल’ म्हणजे घरातल्या घरात दारु कशी बनवता येईल हे ऑनलाइन सर्च करणा-यांचं प्रमाण वाढलं. बाजारात दारु उपलब्ध नाही म्हणून ती घरी कशी बनवता येईल, दारु बनवण्याची ‘रेसिपी’ कुठे मिळेल, याचा विचाराने "पछाडलेला" हा बुद्धिमान प्राणी करु लागला. आहे की नाही गंमत! गुगल ट्रेंड्सनुसार, २२ मार्च ते २८ मार्च या आठवड्यात “घरी अल्कोहोल कसं बनवावं” (how to make alcohol at ho

तीन पायऱ्यांची कहाणी...

इमेज
साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले.         राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायऱ्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.         राजांनी 2 पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे दे

आमची बोली भाषा - अहिराणी

इमेज
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी... अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं