पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अरे वा! काय ऑफर आहे!!

इमेज
अरे वा! काय ऑफर आहे!! अरे सरकार शिक्षा सुनवतेय की ऑफर देतेय?? १२ वर्षा पॆक्षा कमी वयाच्या मुलीचा बलात्कार केला तर *फाशी* १६ पेक्षा कमी वयाच्या मुलीचा बलात्कार केला तर *जन्मठेप* आणि १६ पेक्षा जास्त वयाच्या मुलींचा बलात्कार झाला तर २० वर्षाची शिक्षा... आता बलात्कार करणार्यांनी त्यांना कुठली शिक्षा पाहिजे यावरून ठरवायचं की कोणाचा आणि कोणत्या वयाच्या मुलीचा बलात्कार करायचा! वा रे वा!! बलात्कार करणारा कोणीही असो त्याला फक्त आणि फक्त एकच शिक्षा झाली पाहिजे *मृत्यूदंड*  यात कसले वयाचे भेद करता ? कोणत्याही वयाच्या मुलीवर किंवा स्त्रीवर झालेला बलात्कार हा सारखाच वेदनादायी असतो, आणि जर वेदना सारख्याच असतील तर शिक्षा वेगळ्या का ?

खरंच गरज आहे का ...

इमेज
मुलांचे संगोपन, करिअर निवडण्यासारखा मोठ्ठा प्रश्न,आपले नातेसंबंध,व्यवसाय करताना, आपला जोडीदार निवडताना , अश्या प्रत्येक बाबतीत आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते, आणि हे मार्गदर्शन आपल्याला एक योग्य कॉउंसेलरच देऊ शकतो.सध्य परिस्थीती पाहता समाजातील प्रत्येकाला कॉउंसेलिंगची गरज आहे. पण तेवढ्या प्रमाणात कॉउंसेलर उपलब्ध नाही.एक उत्तम  कॉउंसेलर बणण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीच्या समस्येवर योग्य आणि चटकन सोल्यूशन देण्यासाठी गरज असते ती कॉउंसेलिंग शास्त्र समजून घेण्याची.

चला Cold Drinks बंद करूया.

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो. ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते. ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . . १) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पा