मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं हे हमाल दे धमाल या चित्रपटातील हे अप्रतीम गाणे आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रीत झाले होते.विनोदाची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध नट होते आणि खरंच हे गाणे म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवासपट म्हणावे लागेल.ते आले, त्यांनी पहिले,ते लढले आणि जिंकून घेतलं सारं.अशा या लोकप्रिय नटाला लोकांनी डोक्यावर घेतले.तुम्ही ही घराबाहेर या लॉकडाऊनचा कालावधी संपल्यावर तुमचे स्वागत आहे.तुम्ही ही पहा पण टीव्हीतून न्यूज,मालिका,गाणे,चित्रपट बघा चांगली पुस्तके वाचा.तुम्ही ही लढा बाहेर पडतांना काळजी घ्या अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडा.रोज रोज शतपावली,औषधे,भाजीपाला,दुध,किराणा आणण्यासाठी अशी कारणे देऊन लढायला जाऊ नका.अशी लढाई जिंकून तुम्ही काहीही साध्य करणार नाही अशी हिरोपंती करून लोक तुम्हांला डोक्यावर नाही तर कुठे ठेवतील याचा विचार तुम्ही नक्कीच करा. आजच्या काळातंल,आजच्या प्रेक्षकवर्गाला आजचं मनोरंजन पुरवणारं आजचं माध्यम म्हणजे टीव्ही (मालिका)आणि मोबाईल (वेब सीरिज). दूरदर्शनने छोटया पडद्यावरील मालिका...