समज गैरसमज …
सर्पदंशाच्या उपचारपद्धती आणि सापांविषयी समाजात अनेक शंका व अंधश्रद्धा आहेत. या लेखात आपण त्या विषयी माहिती घेऊ. साप डूख धरतो, असा अनेकांचा समज आहे. पण सापांची स्मरणशक्ती विकसित झालेली नसते. त्यामुळे साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे तो डूख धरत नाही. नागाला नागपंचमीच्या दिवशी दूध पाजण्याचा प्रयत्न अनेक करतात. पण दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. साप हा सस्तन प्राणी नाही. मग तो दूध कसा पिणार? हरणटोळ या जातीचा साप माणसाचा टाळू फोडतो, असा ग्रामीण भागात अनेकांचा समज आहे. पण माणसाच्या कवटीचे हाड कमालीचे कठीण असते. डोक्याची शस्त्रक्रिया करायची असेल तर डॉक्टरांना अनेक धारदार, कठीण साधने वापरावी लागतात. हरणटोळ हा साप तर अतिशय नाजूक असतो. मग तो टाळू कसा काय फोडणार? साधारणपणे या जातीचे साप झाडावर असतात आणि झाडावरून ते दंश मारतात तेव्हा माणसाचे डोके या सापाच्या तोंडाजवळ असते. त्यामुळे हा गैरसमज पसरला असावा. सापांना केवडा तसेच रातराणीचा सुगंध आवडतो, असाही समाज असतो पण केवड्याचे बन काटेरी असते. केवड्याचे कणीस खाण्यासाठी उंदीर येत असतात. त्या जागा सापाच्या वास्तव्यास अ