"नो निगेटिव्ह टॉक "
NNT चा उपाय लय भारी! सध्या परिस्थिती खूपच कंटाळवाणी आहे, बातम्या, सोशल मीडिया आणि सत्य परिस्थिती सुद्धा खूप भयंकर आणि अस्वस्थ करणारी आहे .भविष्य काळातले नियोजन, पुढची अनिश्चितता याबाबतीत प्रत्येकाच्या मनात काहूर उठलेलं आहे त्यातच नकारात्मक विचारांचे ,नकारात्मक बातम्यांचं वादळ सगळीकडे घोंगावत आहे, आपण सारे समाजशील प्राणी असल्यामुळे खरोखरच सगळीकडची ही शांतता मनाला नकारात्मक ते कडे झुकवते आहे ,पण मित्रांनो आपण हरायचं नाही आपण खचायचं नाही. आजपासून आपण *NNT* हा फॉर्मुला फॉलो करायचा !जे काय दिसतय त्याच्याकडे तटस्थपणे पाहायचं, दुसऱ्याला सांगताना तटस्थपणे सांगायचं !तटस्थपणे ऐकायचं !कोणी नकारात्मक बोलत असेल तर भावनिक व्हायचं नाही तटस्थपणे ऐकायचं! कोणती नकारात्मक बातमी असेल तर आपण तटस्थपणे सांगायची म्हणजे काय तर आपण *NNT* फॉलो करायचं.NNT म्हणजे "नो निगेटिव्ह टॉक "(no negative talk). हे फॉलो करायचं म्हणजे काय तर आपण शक्यतो बोलताना सकारात्मकच बोलायचा प्रयत्न करायचा. हेही दिवस जातील पुन्हा एकदा छान आपल्या आनंदाचे, आरोग्यपूर्ण दिवस येतील ,काहीतरी छान शिकवून आणि अनुभव देऊन हा काळ नक्की सर