व्यवसाय का करावा
एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकान ात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते. एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.” या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर