न संपणारा टिवटिवाट....

करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने करून पुन्हा टिवटिव करण्यास सुरवात केली असून त्याला पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंनी पाठिंबाही दिला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं द्वंद्व प्रत्येकाने अनुभवलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. मात्र प्रत्येक भारत-पाक सामन्याआधी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. जो संघ सामना जिंकतो त्यानंतर पुढचे काही दिवस सोशल मीडियावर चाहतावर्ग धुमाकूळ घालतो. भारताने पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करावेत, तसेच करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशा मागण्या जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केल्या होत्या. त...