पोस्ट्स

प्लॅटफॉम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अल्बम

इमेज
तणावमुक्त जगण्यासाठी रोज किमान दोन तास स्मार्टफोन, संगणक, दूरचित्रवाणी यांसारख्या पडद्यांपासून लांब राहा; थोडक्यात कायतर  ‘डिजिटल पथ्या’चे पालन करा. त्याऐवजी वाचन, छंद, संगीत,लेखन यांपैकी एखाद्या गोष्टीत मन गुंतवा तेवढाच बदल असे म्हणतात बदल हा सृष्टीचा,निसर्गाचा नियम आहे. व. पु. काळे यांनी देखील म्हटले आहे आपल्या वयाला हरवायचे असेल तर आपल्यातील छंद जिवंत ठेवायला पाहिजे. असाच माझा एक छंद म्हणजे पुस्तक वाचन जुनी पुस्तक चाळता चाळता मला लोकसत्ता वृत्तपत्राने प्रकाशीत केलेले " लोकसत्ता अर्थब्रह्म" दिसले. पुर्वी डिग्रीला असताना वाचलेली. पण अनुभव सारखे नव्हते. पहिल्यावेळी वाचतानाचा अनुभव आणि यावेळी वाचतानाचा अनुभव काही वेगळाच होता. पहिल्या वेळी वाचताना आपण कुठलं रटाळ पुस्तक वाचतोय असं वाटतं होतं... तेंव्हा येवढी समज नव्हती किंबहूना आयुष्यातली पहिले पुस्तक असल्यामुळं असेलही कदाचित म्हणजे पुस्तक तेचं पण अनुभव मात्र वेगळा. मुखपृष्ठावरील चित्रे पाहूनच मी पुस्तक विकत घेतले होते.त्यांचा याआधीही 'लोकप्रभा' हा विशेषांक प्रसिद्ध झालेला आहे.आणि त्यास वाचक प्रतिसाद...

शिबिराला भेट द्या

ग्रामीण किंवा शहरी भागातील पालक बऱ्याचदा आपल्या आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात. आज त्या मुलांना शिकण्याचा सर्वस्वी अधिकार आहे आणि तो शासनानेसुद्धा त्यांना देऊ केलेला आहे, परंतु ते माहितीच नसल्या कारणाने अनेक मुलं - मुली आज शिक्षणापासून आज वंचित राहिलेली आहेत आणि हे अत्यंत वेदनादायी आहे. हि परिस्थिती लक्षात घेऊन भावी पिढीला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये व त्यांच्या पालकांना " मोफत शिक्षणाचा कायदा ( RTE ) " या कायद्याची माहिती व्हावी तसेच या कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची माहितीसुद्धा सर्वसामान्य पालकांना मिळण्याकरिता दिनांक १० एप्रिल २०१६ रोजी ठाणे येथील ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे दुपारी ३ वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरीही सर्व पालकांनी या शिबिरास उपस्थित राहून मोफत शिक्षणाचा कायद्याची व त्याच्या प्रवेश प्रक्रियेसंबधित संपूर्ण माहितीचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती...