द टेस्ट ऑफ इंडिया...

मुंबई म्हणजे न झोपणारं शहर.अगदी सुरूवातीसूनच ते तसं होतं.आताची 'नाइट लाइफ',तेव्हा नव्हती.डिस्को,पबमधील दणदणाटा ऐवजी रात्री कारखाने आणि कापड गिरण्यातील यंत्रांची रात्रपाळीतील धडपड सुरू असायची. सकाळचा भोंगा वाजला की सगळ्याच मुंबईला जाग येऊ लागे.शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलांच्या जोडीला लगबग असे कामावर जाण्यार् या मोठया मंडळींचीही. त्यासाठी पहिली धाव घेतली जाई नाक्यावरच्या दूधकेंद्राकडे. सन १९५० पासून जुन्या आठवणीच्या कप्यात आजही एक आठवण घर करून आहे.ती म्हणजे दूध केंद्र. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या अनेक ब्रँड चं दूध सर्रास उपलब्ध आहे. अमूल,गोकूळ,वारणा ही आवडते ब्रँड आहेतच. हायफाय मॉल मध्ये गेलात तर अगदी 'इम्पोर्टेड' दूध सहज मिळतात.आजच्या पिढीला काहीही अप्रूप नाही. दुधाची गाडी आली की मुंबई खऱ्या अर्थानं जागी व्हायची. सकाळच्या शांत प्रहरी काचेच्या बाटल्यांचा नाद कानावर पडायचा घाई गबडीत एखादी बाटली फुटली की रस्ता दुधी रंगाचा होऊन जायचा.सूर्य उगवतो येईपर्यंत दूध केंद्रावरील रांगा कमी व्हायच्या.घरी नेलेल्या बाटलीच्या बुचाला आतून असलेला स्निग्धपणा लहा...