पोस्ट्स

जानेवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झिका विषाणूबाबत भारतातही सतर्कता

नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या झिका या विषाणूचा प्रसार दक्षिण अमेरिका खंडामध्ये सध्या फार वेगाने होत आहे. या विषाणूला वेळीच आवर नाही घातला, तर वर्षअखेरीपर्यंत तब्बल चाळीस लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठकही बोलाविली आहे.   जन्मजात होणाऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः मातेच्या गर्भातच होतो. या रोगाला मायक्रोसेफॅली म्हणतात. इतर व्यक्तींनाही हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्‍याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. 2014 ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्‍चचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडूनच हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्राझीलमध्येच या विषाणूचा प्रसार अधिक असल्याने जन्माला येणाऱ्या पिढीतील बहुतांश जणांना हा रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे.   काय आहे झिका विषाणू

" जुगार. "

दोन मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा " " जुगार. ". ----------------- पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचेआगमन झाले. ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले. तुमचे नाव काय.....? तुमचे गाव काय....? असे प्रश्न विचारण्यात आले.... कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचे इंजिनीअर..... माझा नंबर येताच... मी पटकन उभा राहिलो व चटकन सांगितले “सर, माझे बाबा शेतकरी आहेत.” मी असं म्हणताच सगळा वर्ग हसायला लागला..... मला याचा फार राग आला..... मी म्हटले “सर मी नाही म्हणत, या साऱ्यांचा धंदा छोटा हाय, पण,....या काळ्या आईची शपथ सर...या साऱ्याहून माझा बाप मोठा हाय.... हाडाची काडं करून रात दिन राबत असतो, तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो... काड्याकुड्याचं जिनं त्याचं पण, साऱ्या जगाला भाकर देतो.. अन् साऱ्या जगाला भाकर देणारा, कधी कधी उपाशीच झोपतो माहित नसताना पाऊस येईल-नाही येईल, हजारो रुपये मातीत गाळतो, खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो. सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतात पण, माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो. अन्, या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच हरतो. माणुसकीच्या गावामध्ये अजून त्याची वस्ती हाय, खरंच सर माझ्

मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे 'नटसम्राट'

                                   मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे                    नटसम्राट' हा चित्रपट. ह्या चित्रपटाच आताच मोठ्या जोश्यात आगमन झाले. चित्रपट सुपर हिट झाला. त्याबद्द्ल सर्व मराठीबांधवांना धन्यवाद. परंतु ह्या चित्रपटाची copy लिक झाली. परंतु मी सर्व ज्यानी हा चित्रपट पाहीला नाही व पहायचा आहे त्याना विनंती आहे की हा कृपया चित्रपट थिएटर मधेच जाउन पहावा कारण ह्या चित्रपटातील profit मधून काहीभाग गरीब शेतकऱ्यांना जानार आहे. त्या गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून. सर्वानी हा चित्रपट नक्की थिएटर मधेच पहा .

२५५ वर्षांपूर्वीची संक्रांत

                 🚩 २५५ वर्षांपूर्वीची संक्रांत 🚩          "पानिपत" ! मराठ्यांना पडलेले एक दुःखद स्वप्न !          १७६१ साली आजच्याच दिवशी म्हणजेच 'मकरसंक्रांतिला' सव्वा लाख मराठे धारातीर्थी पडले. संपूर्ण देशावर चालून आलेले, "अहमदशहा अब्दाली" नावाचे संकट ! व त्याला प्रतिकार करण्यासाठी हजारो मैल "पानिपतावर" सामोरे गेले ते फक्त "मराठे" !!! पण तोपर्यंत 'पेशव्यांनी' गनिमी कावा सोडला होता, कुटुंब-कबिल्याला फौजेबरोबर न्यायचे नाही हा "शिवरायांनी घालून दिलेला संकेतही मोडीत काढला होता ! १लाख अठरापगड जातीच ्या मराठा सैन्याला, लढण्याबरोबरच काळजी घ्यायची होती ती लाखाहून जास्त 'पेशव्यांच्या' नातेवाईकांची, यात्रेसाठी सैन्याच्या बरोबर आलेल्यांची, बाजारबूनग्यांची !! १४ जानेवारी १७६१ ! मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मध्यान्हीचा सूर्य तळपत होता, उपाशीपोटी आणि अपुऱ्या वस्त्रांनिशी "मराठे" रणांगणावर थैमान घालत होते. शिंदे, होळकर, गायकवाड, माने, पायगुडे, शिळमकर आदी सरदारांच्या मावळ्यांचा "शिवाजी महाराजकि जय" अ

‘सारस न्याहळा अन्‌ घटस्फोट टाळा‘..!

सामाजिक प्रतिष्ठा व व्यक्तिगत अहंकाराने जगभरात शेकडो जोडीदारांचे संसार उद्‌ध्वस्त होत असताना, वैवाहिक निष्ठा हेच ‘जीवन‘ मानून जगणारा ‘सारस‘ हा एकमेव सजीव..! जोडीनेच राहणार, एक खाली मान घालून अन्न खात असेल तर दुसरा वर मान करून टेहाळणी करणार..! अंडी उबवण्याचा अधिकार फक्‍त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी ‘सारस‘ हा एक चमत्कारच..!   आयुष्यभर प्रत्येक क्षण जोडीदारासोबच जगताना एकाचा प्राण गेला तर दुसरा अन्नत्याग करून आत्महत्या करणारा ‘सारस‘..! या देखण्या व रुबाबदार पक्षाची जोडीदारासोबतची वैवाहिक निष्ठा व प्रेम म्हणजे आजच्या ‘लिव्ह अँड रिलेशन‘च्या युगात डोळ्यात अंजन घालणारीच मानावी लागेल. ‘सारस‘च्या या वैशिष्ट्यामुळेच राजस्थान व दक्षिण भारतात वैवाहिक वाद होणाऱ्या मानवी जोडप्यांना सारस पाहायला पाठवण्याची पद्धत रूढ आहे. गोंदीयापासून दहा किलोमीटरवर परसवाडा या पारंपरिक खेड्याच्या परिसरात हा ‘सारस‘ सध्या जगण्याचा संघर्ष करत आहे. स्वार्थी मानवी स्वभावाचा बळी ठरत असलेला व जगभरात नामशेष होत असलेला ‘सारस‘ जगावा, यासाठी गोंदीया जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेवाभावी संस्थांनी पराका

मराठी मुलाच्या विश्वविक्रमाने कॉलर का वर करू नये?

प्रणव धनावडेचं सहस्रदर्शन! एक क्षण, एक दिवस. माणसाचं आयुष्य बदलू शकतं. प्रणव धनावडे हा कालपर्यंत कुणीही नव्हता. असलाच तर तो एक रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्य ा मेहनती माणसाचा क्रिकेट खेळणारा मुलगा होता. एका अधिकृत शालेय स्पर्धेत त्याने एका डावात १००९ धावा केल्या. तो अचानक सर्व प्रसारमाध्यमांच्या मथळ्याचा विषय बनला. उद्यापासून त्याचं आयुष्य बदलू शकतं. या विश्वविक्रमी मुलाचे वडील रिक्षा चालवतात असं आता म्हटलं जाईल. प्रथम त्याच्या विश्वविक्रमाचं कौतुक करू या. कालपर्यंत एका खेळीत एक हजार धावांचं पहाटेला स्वप्न पडणं, हासुद्धा वेडेपणा ठरवला गेला असता. त्याने त्या प्रत्यक्षात केल्या. मीही ती बातमी ऐकल्यावर प्रथम स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. आणि मी जागा असल्याची खात्री करून घेतली. मग कुणीतरी मला म्हणालं, 'मैदानाच्या स्क्वेअर सीमारेषा लहान होत्या.' असतील! माझं म्हणणं आहे की, गल्लीतच काय, घराच्या व्हरांड्यात, 'बाजूच्या भिंतीला चेंडू लागला की दोन धावा आणि समोरच्या भिंतीला लागला की चार धावा' अशा नियमात खेळूनही हजार धावा करणं सोपं नाही. आईने गोलंदाजी टाकली तरी कठीण आहे. आज

मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल

मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच 10 जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासननं एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासा ठी मध्य रेल्वेवर 18 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेची भायखळा ते सीएसटीपर्यंतची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळं 100 हून अधिक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात बेस्टच्या ज्यादा बसेस भायखळा आणि सीएसटी दरम्यान सोडण्यात येणार आहेत. तसेच 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या 42 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रिटीशांनी 1879 साली हँकॉक ब्रिज बांधला. या ब्रिजचा अडथळा येत असल्यानं लोकलच्या वेगावर मर्यादा येत होती. तसेच ब्रिजची उंचीही कमी असल्यानं ट्रॅकची ऊंचीही वाढवता येत नव्हती. त्यामुळं या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते. 9 जानेवारीला या गाड्या रद्द : पंढरपूर – सीएसटी मुंबई पॅसेंजरसाईनगर शिर्डी – सीएसटी मुंबई पॅसेंजरसोलापूर – सीएसटी मुंबई एक्स

बोनस म्हणजे काय ?

बोनस म्हणजे काय ? काळजीपूर्वक वाचा कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.  जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता. 4 आठवड्यांचा एक महीना धरला असता वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात. ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला. अात्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे. 30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो

HOPE SPECIALITY PHARMA

किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचारखर्च परवडत नाही.मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. DADAR येथे स्टेशन पासुन फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर " HOPE SPECIALITY PHARMA " सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. उदा. एखाद्या इंजक्शन ची किंमत ६ हजार असेल ते आपणास येथे केवळ 1400 रू पर्यंत मिळेल. पत्ता -  होप speciality फार्मा Old BDD 2A/2,S.S.Wagh mg, Gandhi chowk,Naigaon, Dadar east. मुंबई :400014. संपर्क करा : hspmumbai@gmail.com फोन क्रमांक : 9224247365\9022247365/ 02224147365