पोस्ट्स

हॅट्स ऑफ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

इमेज
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मातृदिन.आज, १० मे रोजी भारतासह जगभरात 'मातृदिन' उत्साहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मातृदिना निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार... आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी औषधावर दिलेली लिमलेटची गोळी आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात मेतकूट कालवलेला मऊ तूपभात आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही...

मराठी पाऊल पडते पुढे...

इमेज
    टीव्हीला छोटा पडदा म्हणण्याचे दिवस आता गेले. आता हाच छोटा पडदा मोठा झाला आहे आणि बॉलिवूडलाही टक्करही देत आहे. टीव्ही कलाकार आता बॉलिवूडकरांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अनेक शिफ्ट्समध्ये त्यांना काम करावं लागतं. मालिकेमधील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक महिने, वर्षे लागतात. टीव्हीवरील असाच एक नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम.       सोनी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'सीआयडी'मध्ये अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली. साटम सीआयडीच्या भागांसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करत. सीआयडीच्या टीमचे ते फार जुने सहकारी आहेत. साटम यांनी अभिनयाच्या जोरावर एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे.‘कुछ तो गडबड है’ हा संवाद ऐकला की आजही डोळ्यासमोर शिवाजी साटम यांचाच चेहरा येतो.पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शिवाजी साटम किती मानधन घ्यायचे? ‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवाजी साटम एका एपिसोडसाठी साधारणपणे १...

'अलबेला' ची जादू...

इमेज
काही चित्रपट व त्यातील गाणी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले. दहा, विस नव्हे तर चक्क साठ वर्षे उलटून गेली असली तरी तो चित्रपट, त्यातील गाणी आणि त्या चित्रपटाचा 'नायक' हा प्रेक्षकांच्या नेहमी स्मरणात राहतो. तो ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'अलबेला' या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलेली 'शाम ढले खिडकीतले' आणि 'भोली सुरत दिलके खोटे' ही गाणी तुफानच गाजली इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. चित्रपटात मा. भगवान दादा आणि गीता बाली हे मुख्य कलाकार होते. शरीराला वेडेवाकडे झटके न देता जागच्या जागी पावले थिरकवत नाचण्याची स्वतंत्र शैली मा. भगवान दादा यांनी निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत बंगाली आणि पंजाबी मंडळींचा वर्चस्व असतांना मराठमोळ्या मा. भगवान पालव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर काही काळ अधिराज्य गाजवले. खास नृत्यशैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे मा.भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित 'एक अलबेला' चित्रपट येत्या 24 ...

पक्ष्यांचा वेध आता अॅप वरून

इमेज
मुंबईसारखे शहरात आणि परिसरात पक्ष्यांच्या तब्बल 250 प्रजाती आढळतात. यामध्ये नेहमी दिसणा-या पक्ष्यांसह काही दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे. मात्र मुंबईतील या निसर्गाची आपल्याला नसते. ती माहिती देण्यासाठी काही पक्षी निरिक्षकांनी सात वर्षांच्या अभ्यासानंतर 'वसई बर्डस्' अॅपची निर्मिती केली आहे. सात वर्षांपूर्वी वसईतील कुलदीप चौधरी, अमोल लोपेझ, सचिन मार्टी, लिओनार्ड रिबेलो, प्रज्ञावंत माने, फ्रँकलीन गोन्साल्विस आणि एम.व्ही.भक्त यांनी हौस म्हणून पक्षी निरीक्षणाला सुरूवात केली. छंदातून मिळालेल्या माहितीचे दस्तावेजीकरण सुरू झाले. त्यातूनच या अॅपची कल्पना प्रत्यक्षात आली. मुंबई परिसरातील 250 पक्ष्यांची देणारे हे पहिले अॅप असावे असा पक्षीनिरीक्षकांचा अंदाज आहे. अॅप कशासाठी विद्यार्थांना या जैवविविधतेची माहिती व्हावी, त्यायोगे निसर्गाचे संवर्धन व्हावे, स्थानिक पातळीवरील धोक्यांची माहिती व्हावी हा अॅपचा मुख्य उद्देश आहे. पक्ष्यांचे फोटो, त्यांची इंग्रजी नावे, शास्त्रीय नावे, अधिवासाचे ठिकाण, खाद्य आणि आवाज यांचा या अॅपमध्ये समावेश आहे. लवकरच पक्ष्यांची मराठी नावेही समाविष्ट करण्यात य...

यालाच म्हणतात हिरो...

इमेज
हा मुलगा अक्षय कुमारची शुटींग चालू असताना त्याची कार न सांगता साफ करत होता.अक्षय ने ते पाहिले व जवळ गेला.त्यावर तो मुलगा म्हणाला साहेब पैसे देऊ नका पण मारु नका दोन दिवस ऊपाशी आहे.त्यावर अक्षय ने त्याला हाताला धरून हॉटेलात पोटभर खाऊ घातले व त्याला त्याच्या घरच्यांबद्दल विचारले तर त्याने सांगितले कि मला कोणीही नाही.हे कळल्यावर अक्षय ने त्या मुलाच्या शिक्षणाची पुर्ण जबाबदारी घेऊन.त्याला हॉस्टेल मध्ये भर्ती केले

अभिनंदन केले पाहिजे

इमेज
   प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अत्यंत चांगले प्रकारे दाखवून दिले त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. पूर्वीच्या काळी गुंडांकडून शासकीय अधिका-यांना त्रास होत होता पण आता हे चित्र उलटे पहावयास मिळते ज्या लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांच्याकडून आता त्रास व्हायला लागला आहे असे नेतृत्व काय कामाचे.डॉ. अश्विनी जोशी यांनी कणखर कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वाने जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कारभाराला काॅर्पोरेट शिस्त लावली. वन बंधा-यापासून टाऊन हाॅलपर्यंत विविध कामे मार्गी लावली.मात्र ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले त्यांनी लगेचच राजकीय दडपण आणून त्यांना हटविले.     पुर्ण ठाणे जिल्ह्यातील भुमाफीया,अनधिकृत कामं करणारे लोक,खाड्या बुजवून चाळी-गोडाऊन उभारणारे,पर्यावरणाचा सत्यानाश करणारे,अवैध रेती उत्खनन करुन शासनाचा करोंडोंचा महसूल बुडवणारे,अनधिकृत केबल व्यावसायिक आदी सर्व घटकांना कायद्याचा चाप लावून त्यांचे सर्व गैर धंदे बंद पाडून सर्व सामान्यांना दिलासा देणा-या ...

शिफारस

इमेज
    भारताचा कसोटी कर्णधार आणि धावांची मशीन अशी बिरुदावली मिरवणा-या विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्न आणि तंत्रशुद्ध फंलदाज अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिफारस केली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये खेलरत्न पुरस्कारासाठी पहिल्यांदा शिफारस केली आहे हे नवलच आहे देर आये दुरुस्त आये असेच आता म्हणावे लागेल.     विराट कोहली तुफानच खेळतो यात काहीच शंका नाही. गेली अनेक वर्षे त्याच्या कामगिरीत सातत्य दिसते आहे कसोटी, वनडे असो किंवा टी - 20 त्याच्या धावांची चक्की सुरूच आहे. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा विराट कोहली हा 11 भारतीय आहे तसेच शतक करणारा चौथा कर्णधार ठरला आहे. वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय या भारतीयांच्या नावावर दोन शतके आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सात शतकी भागीदारी झाल्या असून त्यातील चार भागीदारींमध्ये विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. फलंदाजी करताना डावाला 'फिनिशिंग टच' देणे विराटला उत्तम जमते.आयपीएल मधे 3504 धावा केल्या आहेत तसेच टी - 20 मध्ये आतापर्यंत 992 धावा फटकावल्या आहेत. 2013 च्या आयपीएल मोसमात दोनवेळा शतकाने हुलकावणी दिली...

सहा षटकारांचे गुपित

इमेज
     अशक्य असे जगात काहीच नसते कोणाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की स्टुअर्ट सारख्या वेगवान गोलंदाजी करणा-याला सहा चेंडूत सहा षटकार मारणे युवराजला पण ती मॅच होण्याअगोदर जर कोणी मुलाखतीत जर हा प्रश्न विचारला असता वेगवान गोलंदाजी करणा-याला तु सहा चेंडूत सहा षटकार मारशील का तर तोही  विचारात पडला असता.   प्रत्येक नावजलेल्या क्रिकेटपटूच्या जीवनाशी अशी एक खेळी जोडलेली असते की त्याचं नाव उच्चारलं की ती खेळी सहज आठवते. युवराज सिंग नाव घेताच त्यानं एकाच षटकात ठोकलेल्या सहा षटकारांचे गुपित अखेर युवराजने एका मुलाखत मध्ये सांगितले       युवाराजनं २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचत इतिहास रचला. जणू एखाद्याचा बदला घ्यावा अशाच भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्याचा चेहरा गंभीर आणि नजर चेंडूवर पक्की बसली होती. आलेला प्रत्येक चेंडू विना अडथळा सीमापार करायचा अशाच पद्धतीने तो फटके लगावत होता. युवराजच्या या तडाखेबंद खेळीला कारणीभूत होती फ्लिंटॉफनं केलेली शेरेबाजी.   ...

नक्की वाचा नाना पाटेकरांचा ब्लॉग

इमेज
नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा असा......         शिर्डी साईबाबा  : प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड  + सोने  ३२  करोड, + गुंतवणूक ४२७ करोड  ----------------------------------------------------------------- सिद्धीविनायक , मुंबई पैसे - २००  करोड , FD : १२५ करोड. ----------------------------------------------------------------- लालबागचा राजा : १८  करोड कमाई फक्त  गणपतीच्या  १०  दिवसातली. ----------------------------------------------------------------- गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी/मजूर मी स्वतः पाहिलेत अन - त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने  5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय. फक्त 3 देवांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन . एका बाजूला . स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी -चोळी-पोशाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे...

डॉक्टर तुम्ही सुद्धा

इमेज
"भ्रूणहत्या" डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं. "डॉक्टर, आम्हाला मुलगी नकोय !" होणार्या बाळाचे बाबा बोलले. "तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून?" डॉक्टरांनी विचारलं. "तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात. मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो." बाळाचे बाबा बोलले. "मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन?" डॉक्टर म्हणाले. "तिथं सोय नव्हती. त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा. पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात. लाखाऐवजी हजारात काम होईल." बाळाचे बाबा निर्विकारपणं बोलले. "मी काय कसाई वाटलो काय तुम्हाला?" डॉक्टर संयम ठेवत पुढं म्हणाले, "अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे" ईतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई म्हणाली, "म्हणून तर दुसरी मुलगी नकोय आम्हाला. दुसरा मुलगाच हवा. दोन मुली नकोत!" डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेल्या त्या पहिल्या मुलीकडं पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे. हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जि...

प्रेम केलंय ना...

एक सुंदर स्टोरी तो पुण्यात होता..... काही कामानिमित्त गेला होता.. त्या दिवशी तिने news मध्ये ऐकला कि स्वारगेट जवळ एका bus driver ने ... गाडीखाली लोकांना चिरडले.. तिने लगेच त्याला call केला, ती :"हेल्लो, कुठे आहेस तू??" तो :"आणखी कुठे असणार आहे?? मी काही इथे पिकनिक साठी नाही आलोय." ती :"अरे मला अस म्हणायचं होता कि..." तो :"हे बघ, मला काम आहेत, आपण मी परत आल्यावर बोलू, कळल ना??" ती :"अरे स्वारगेट ला accident झालाय बस मुळे.. म्हणून मी..." तो : (चिडून)"त्यात काय ऐवढ, रोजच होतात, तुम्हा बायकांना ना विनाकारण काळजी करण्याची सवय असते.. आता म्हणशील कि रस्ता नीट बघून क्रॉस करत जा, गाडी हळू चालव, अस तसं.... ठेव फोन आता, मला वेळ नाही आहे.. आणि प्लीज मला call करू नको, मी तुला बोलतो रात्री, बाय" अस म्हणून त्याने फोन ठेवून दिला.. संध्याकाळी, घरी येताना तो फोन वर बोलत बोलत रोड क्रॉस करत होता, तेवढ्यात समोरून एक गाडी त्याच्या अगदी जवळ येऊन थांबली.. त्याला काहीही लागलं नाही... पण त्याची छाती धडधडू लागली.....

सलाम तुम्हाला...

इमेज
विभागीय प्रशासन - गडचिरोलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील.गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दोन वर्षे, सहा महिन्यांपूर्वी पदाची सूत्र स्वीकारलेल्या संदीप पाटील यांनी आपल्या कार्यकाळात नक्षली कारवायांवर प्रचंड प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आहे.यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेत आतार्पयत 59 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.सलाम तुम्हांला आणि तुमच्या कामाला.

छत्रपती शिवाजी महाराज की जय

इमेज
रेल्वेला छत्रपतींची आठवण करून दिली !!! डोंबिवली येथे प्लॅर्टफाँर्म डिजीटल इंडीकेटरवर लक्ष गेले असता लक्षात आले की, "छत्रपती शिवाजी टर्मिनल" असे न दाखवता फक्त शिवाजी टर्मिनल असे दाखविले जात होते, त्वरीत रेल्वे प्रवाशी संघटनेचे आदरनिय मधुजी कोटियन  त्यांनी व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारयानीं योग्य ती कार्यवाही केली आणि रेल्वे इंडीकेटरवर शिवाजी महाराजांची "छत्रपती " हि पदवी झळकु लागली !!!!!!

कोणालाही कमी समजू नये ....

विंडीजचा विजय ऐतिहासिक तर आहेच, पण एखाद्याला डिवचले तर तो जिद्दीने सर्वोच्च यश मिळवते याची प्रचीतीही यातून मिळले. एरवी आपण असे फक्त पुस्तकांमध्ये वाचतो, किंवा चित्रपटात पाहतो; पण वेस्ट इंडिजने हे प्रत्यक्षात करून दाखविले आहे. एकेकाळी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले दोनही विश्वकरंडक त्यांनीच जिंकले होते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर आपण खूप जोक केले. त्यांच्या रंगावरून मस्करीही केली. पण मन मोठ्ठ असावं तर वेस्टइंडीज सारखं. ज्या संघाला जर्सी घ्यायला त्यांच्याच बोर्डाने फंड दिला नाही, ज्या संघाने स्वताच्या खर्चातून भारतापर्यंत प्रवास केला, ज्या संघाच्या जर्सी आणि भारतातील प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च BCCI (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) ने केला त्याच संघाने काल टी20 विश्वचषक जिंकला आणि त्यातून मिळालेली काही रक्कम त्यांनी कोलकत्ता मधील सामजिक संस्था मदर टेरेसा ट्रस्टला दिली. वेस्टइंडीजने उपकाराची नुसती परतफेड केली नाही तर मन ही जिंकली..... सलाम यारो!!!!

विनोद करणे थांबवा

इमेज
मन मोठ्ठ असावं तर वेस्टइंडीज क्रिकेट संघासारखं सारखं. ज्या संघाला जर्सी घ्यायला त्यांच्याच बोर्डाने फंड दिला नाही, ज्या संघाने स्वतःच्या खर्चातून भारतापर्यंत प्रवास केला, ज्या संघाच्या जर्सी आणि भारतातील प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च BCCI (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) ने केला त्याच संघाने काल टी20 विश्वचषक जिंकला आणि त्यातून मिळालेली काही रक्कम त्यांनी कोलकाता मधील सामजिक संस्था मदर तेरेसा ट्रस्ट ला दिली. वेस्टइंडीजने उपकारची परतफेड केली नाही तर मन ही जिंकली. (छायाचित्र: वेस्टइंडीज संघाचे मैनेजर रॉल लेवुइस धनादेश सपुर्द करताना) वर्णावरुन वेस्ट इंडिज खेळाडूंवर विनोद करणा-यांनी व तो पसरवणा-यांनी कृपया असे करणे थांबवा

सलाम तुमच्या कार्यक्रमाला

इमेज
मराठवाड्यात 365 कि. मी. नदीचा गाळ काढणे, पात्र रुंदी करण अवघ्या सहा महिन्यात केले. खर्च 2 कोटी 50 लाख लोकसहभागातून . हेच काम सरकारने केले असते तर कालावधी 2 वर्षे , खर्च - 25 कोटी आला असता.

फक्त 12 रूपये किलो कांदा ...

फक्त 12 रु किलो कांदा... तो ही  घरपोच!!!!!! शेतकऱ्यांकडून ते बाजार समितीत विकतात त्यापेक्षा 10% जास्त भाव प्रत्यक्ष त्यांच्या शेतातच देऊन त्यांच्या कडून विकत घेतलेला शेतीमाल थेट तुमच्या दारात पोहोचविण्याची व शेतकऱ्याला समाधान मिळेल व काही अंशी कर्जातून तो मुक्त होईल यासाठी आम्ही शेतकऱ्यांचा शेती माल त्यांच्या शेतातून डायरेक्ट शेवटच्या ग्राहकाच्या घरात  पोहोचवण्याचा घरगुती पण व्यापक उद्योग चौघे मित्रांनी मिळुन सुरु केलाय. ना नफा ना तोटा अश्याप्रकारे शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, उडीद, मुग, चवळी, तुर, तुरडाळ, मुगडाळ, उडीदडाळ हरबरा , हरबरा डाळ असे धान्य व कांदा बटाटा लसूण विक्री करून द्यायचा व शेतकरी जिवंत ठेवायचा आमचा छोटासा प्रयत्न. त्याचाच एक भाग म्हणून ... शेतकऱ्यांच्या शेतातील निवडलेला चांगल्या प्रतीचा (TOP Quality ) कांदा 5 किलोच्या पॅकिंग मध्ये ठाणे , मुंबई, पुण्यात उपलब्ध. म्हणाल तर तुमच्या घरपोच !! भाव - 60 ₹. प्रती 5 किलो बॅग . बुकिंग साठी कॉल करा - अभय पाटील - 9552593787 केशव मगर - 9075052353 अमोल तांबे - 9595882084 सयाजी शिंदे - 9422466636.

मराठी मुलाच्या विश्वविक्रमाने कॉलर का वर करू नये?

प्रणव धनावडेचं सहस्रदर्शन! एक क्षण, एक दिवस. माणसाचं आयुष्य बदलू शकतं. प्रणव धनावडे हा कालपर्यंत कुणीही नव्हता. असलाच तर तो एक रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्य ा मेहनती माणसाचा क्रिकेट खेळणारा मुलगा होता. एका अधिकृत शालेय स्पर्धेत त्याने एका डावात १००९ धावा केल्या. तो अचानक सर्व प्रसारमाध्यमांच्या मथळ्याचा विषय बनला. उद्यापासून त्याचं आयुष्य बदलू शकतं. या विश्वविक्रमी मुलाचे वडील रिक्षा चालवतात असं आता म्हटलं जाईल. प्रथम त्याच्या विश्वविक्रमाचं कौतुक करू या. कालपर्यंत एका खेळीत एक हजार धावांचं पहाटेला स्वप्न पडणं, हासुद्धा वेडेपणा ठरवला गेला असता. त्याने त्या प्रत्यक्षात केल्या. मीही ती बातमी ऐकल्यावर प्रथम स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. आणि मी जागा असल्याची खात्री करून घेतली. मग कुणीतरी मला म्हणालं, 'मैदानाच्या स्क्वेअर सीमारेषा लहान होत्या.' असतील! माझं म्हणणं आहे की, गल्लीतच काय, घराच्या व्हरांड्यात, 'बाजूच्या भिंतीला चेंडू लागला की दोन धावा आणि समोरच्या भिंतीला लागला की चार धावा' अशा नियमात खेळूनही हजार धावा करणं सोपं नाही. आईने गोलंदाजी टाकली तरी कठीण आहे. आज...