पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बॅड पॅच

इमेज
बॅड पॅच एक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.शांत सुरळीत सुरु असलेल्या सन आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट  वाट लागते...नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नको करुन सोडतो...आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...   संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!! यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे: १. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं! २. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

यश की अपयश

इमेज
  बेरोजगारांना रोजगार सहाय्य देण्यासह विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करण्याच्या उदेशाने राज्य सरकारने एम्लाॅयमेंट एक्स्चेजची स्थापना केली. शेकडो तरुण आणि तरुणी नोकरी मिळविण्यासाठी या केंद्रात नाव नोंदवतात. सन 2010  मध्ये ठाण्यात याच केंद्रातून 41 हजार 82 बेरोजगारांना नोकरी मिळाली होती. सन 2011 मध्ये तो आकडा 11 हजार 975 इतका घसरला आणि 2012 मध्ये हे प्रमाण केवळ साडेआठ टक्के आहे. ठाणे एम्लाॅयमेंट एक्स्चेजच्या नोंदणीपटावर 1 लाख 4 हजार 793 मधुन फक्त 13 हजार 277 उमेदवारांनाच नोकरी मिळाली. त्यातील 13 हजार 119 नोकऱ्या खाजगी क्षेत्रातील आहेत केंद्र सरकारच्या सेवेत 28 राज्य शासनात 83 जणांना नोकरी मिळाली आहे. तसेच 513 अपंग 795 मूक बधिर मधुन एक अंध उमेदवाराला नोकरी मिळाली.     सन 2014 मध्ये या विभागाच्या नोंदणीपटावर 2 लाख 32 हजार बेरोजगार नोकरी च्या प्रतीक्षेत होते त्यापैकी फक्त 21 हजार जणांना नोकरी मिळाली तर 2015 मध्ये हा आकडा आणखी घसरला असून 2 लाख 22 हजार मधून फक्त 7 हजार 382 जणांना नोकरी मिळाली.

टिव्ही वाले दादा

इमेज
टिव्ही वाले दादा तुम्ही काही बी दाखवा.. कुबेर यंत्र हनुमान यंत्र महालक्ष्मी यंञ दाखवा... पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्या साठी एखाद यंत्र दाखवा टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा भवानी ची खोटी तलवार दाखवा खोटा इतिहास दाखवा पण .... छञपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी एकदा तरी दाखवा.. टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा ...... जोतिष्य भविष्य राशी चक्र सगळं थोतांड दाखवा... पण..... महामानव डाँ बाबासाहेब  आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा एकदा तरी दाखवा.... टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा....... रामदेव बाबा दाखवा कामदेव दाखवा ट्रीपल  श्री दाखवा आसाराम दाखवा  राजकारणात घुसलेले सगळे जंत दाखवा..... पण एकदा तरी अंगावर चिंध्या पांघरुन जनतेची निस्वार्थ पणे सेवा करणारे खरे संत गाडगेबाबा एकदा तरी दाखवा...

सहा षटकारांचे गुपित

इमेज
     अशक्य असे जगात काहीच नसते कोणाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की स्टुअर्ट सारख्या वेगवान गोलंदाजी करणा-याला सहा चेंडूत सहा षटकार मारणे युवराजला पण ती मॅच होण्याअगोदर जर कोणी मुलाखतीत जर हा प्रश्न विचारला असता वेगवान गोलंदाजी करणा-याला तु सहा चेंडूत सहा षटकार मारशील का तर तोही  विचारात पडला असता.   प्रत्येक नावजलेल्या क्रिकेटपटूच्या जीवनाशी अशी एक खेळी जोडलेली असते की त्याचं नाव उच्चारलं की ती खेळी सहज आठवते. युवराज सिंग नाव घेताच त्यानं एकाच षटकात ठोकलेल्या सहा षटकारांचे गुपित अखेर युवराजने एका मुलाखत मध्ये सांगितले       युवाराजनं २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचत इतिहास रचला. जणू एखाद्याचा बदला घ्यावा अशाच भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्याचा चेहरा गंभीर आणि नजर चेंडूवर पक्की बसली होती. आलेला प्रत्येक चेंडू विना अडथळा सीमापार करायचा अशाच पद्धतीने तो फटके लगावत होता. युवराजच्या या तडाखेबंद खेळीला कारणीभूत होती फ्लिंटॉफनं केलेली शेरेबाजी.      तुला चांगले फटके खेळताच येत नाही, तू अत्यंत वाईट खेळतो

सैराट बघा

इमेज
‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिला आहे. त्यातूनचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर आणि प्रोमो गाणे प्रदर्शित करून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. सैराट बघण्याची 17 कारणे --------------------------------- 1) जगभर गाजलेला फँड्री बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट 2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत 3) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात 2016 मधील एकमेव मराठी चित्रपट 4) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट 5) हॉलीवुड मधे संगीत रिकॉर्डिंग झालेला सैराट हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट 6) रिंकू राजगुरु ह्या नाववीत शिकणाऱ्या अकलूजच्या ( सोलपुर ) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रिय पुरस्कार पटकावला 7) 'पिस्तुल्या' , 'फँड्री' आणि आता 'सैराट' या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रिय पुरस्कार मिळवून देऊन हैट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक- नागराज पोपटराव मंजुळे 8) नवख्या नॉन-एक्टर प

ऐकावे ते नवल

इमेज
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान व आयसिसचे झेंडे फडकवणाऱ्या फुटिरतावाद्यांनी आता थेट दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा भरविण्यापर्यंत मजल मारली आहे. दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे नुकतीच ही स्पर्धा भरवण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेतील काही संघांना दहशतवाद्यांची नावं देण्यात आली होती. 

आता पोलिओ इंजेक्शन

इमेज
देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले. त्यानंतर पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्णांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने पोलिओ लसीकरणात बदल केले आहेत. आता पी १ आणि पी ३ च्या विषाणूंसाठी बालकांना पोलिओ इंजेक्शन (आय.पी.व्ही) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून देशभरात ही लसीकरण पद्धत सुरु करण्यात आली आहे. बालकांना मुखावाटे देणाऱ्या पोलिओ लसीच्या पहिल्या व तिसऱ्या डोसाबरोबर पोलिओ इंजेक्शन ही लस देण्यात येणार आहे. ही लस ०.१ मी.ली उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे  त्यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे. या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा पुर्न:उद्भव आणि पुर्न: संसर्ग रोखता येतील. पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण आढळून न आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त घोषित’ केले.

कळवा ईस्ट आणि वेस्ट

इमेज
जुन्या पीसीचा उपयोग गरीब, गरजू विद्यार्थ्यांना झाला तर? हीच कल्पना उचलून कळव्यामध्ये राहणारा तुषार जाधव हा ग्राफिक डिझायनर काम करतोय. donateyourpc.in नावाची साइट त्यानं सुरू केली असून, विद्यार्थ्यांना जुने कम्प्युटर मोफत दुरुस्त करून देण्याचं कामही तो करतोय. तुम्ही सुद्धा डोनेट करू शकता तुमचा जुना कंप्युटर गरजू विद्यार्थ्यांसाठी...

तहान लागल्यावर

इमेज
"तहान लागल्यावर विहीर खणायची" हे  जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे "पाणी वाचवा" ओरडतो, त्यात ही आहे. पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? "पाणी जपून वापरा" ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ?कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल" ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय.केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल अशी परिस्थिती खरंच येऊ शकते.पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं.     आज इजराइल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फ

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलास

इमेज

लोक म्हणतात

इमेज
लोक म्हणतात........    मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रमामध्ये गेलं नसतं , पण प्रत्येक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत... वृद्धाश्रमात आईवडिलांना बघून सर्व लोक मुलाना दोष देतात, परन्तु, लोक हे कसे  विसरतात की, तिथे पाठविण्यामध्ये कुणाच्या मुलीची पण मुख्य भूमिका असते, नाहीतर मुलानी लग्ना आधीच आईवडिलाना वृधाश्रमात नसत का पाठवल,संस्कार मुलीना पण दया म्हणजे कुणी फ़क्त मुलाना दोष लावणार नाही. कटु आहे पण सत्य आहे.

सेवेचा अवश्य लाभ घ्या

इमेज
मुंबई सेंट्रल – पणजी ( गोवा ) मार्गावर आजपासून एस. टी.ची वातानुकुलीत शिवनेरी सेवा... उन्हाळ्यात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा आणि कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा विचार करून रा. प. महामंडळातर्फे आजपासून मुंबई सेंट्रल ते पणजी मार्गावर शिवनेरी वातानुकुलीत सेवा सुरु करण्यात आली आहे. सदर बस मुंबई सेंट्रलहून रात्रौ ८ वाजता सुटून ५७४ किमीचा प्रवास दादर – कुर्ला नेहरू नगर – मैत्री पार्क – वाशी हायवे – नेरूळ – बेलापूर – पनवेल – महाड – चिपळूण – हातखंबा - लांजा – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा मार्गे पार पाडून पणजीत दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. मुंबई सेंट्रल ते पणजी प्रवास भाडे रु. १४६० आकारण्यात येईल. तर पणजीहून मुंबई सेंट्रलला परतणारी बस पणजीहून संध्याकाळी ५:३० वाजता सुटेल आणि चिपळूण मार्गेच मुंबईला सकाळी ५ वाजता पोहोचेल. उपरोक्त बसचे संगणकीय आरक्षण महामंडळाच्या https://public.msrtcors.com/ticket_booking/ ह्या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असून प्रवाशांनी ह्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. तिकीट दर: मुंबई ते पणजी: १४६० रु. मुंबई ते सावंतवाडी: १३५

योग्य प्रस्ताव ठेवा

इमेज
  केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारवर दोन महिन्यांत एकाच विषयावरचे प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की एकदा नाही तर दोनदा आेढवली आहे. कर्मचा-याना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी सरकारने घातलेल्या 58 वर्षे वयाच्या अटीच्या विरोधात देशभरात कामगार संघटनांनी आंदोलन करून हा प्रस्ताव मागे घ्यायला भाग पाडले आणि दुसरे कर्मचारी काढणार असलेल्या 60 टक्के रकमेवर कर आकारण्याचा अर्थमंत्री अरूण जेटली यांचा प्रस्ताव पचनी न पडल्याने तोही मागे घेण्यात आला. स्वतःचे पैसे काढण्यासाठी 58 वर्ष कोण वाट पाहणार? दोन्ही दुरूस्त्या आणि प्रस्ताव चुकीचे होते सरकारचा प्रस्ताव मागे घेण्याची आेढावलेली नामुष्की एकीकडे सरकारचा कमकुवतपणा जाहीर करते तर दुसरीकडे सरकारचे वास्तवापासून सुटलेले भान दर्शवते चांगले दिवस दाखवण्याचे स्वप्न दाखवले होते हेच का ते चांगले दिवस तुम्ही तुमचे प्रस्ताव असे मांडा की जेणेकरून ते देशासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरतील.

हे कसे शक्य

इमेज
   स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पै आणि पै साठवण्यापासून स्वस्त घरासाठी दूरवर जाण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत असतो.  त्याचा हा गुण लक्षात घेऊन बांधकाम व्यवसायिक भुलविणा-या योजना अधूनमधून आणतात पुण्यात सध्या वादाच्या भोव-यात अडकलेल्या स्वस्त घराच्या योजनेतून याचीच प्रचीती येत आहे. मेपल समूहाने पाच लाखात 3 खोल्याचे वन बीएचके घर देण्याची ही योजना जाहीर केली आहे.आणि  अनेकांच्या भुवया उंचावल्या.  महानगरामध्ये घरांचे दर गगनाला भिडले असतांना पुण्यात पाच लाखांत घर कसे शक्य आहे.

एक नविन पत्रकारिता

इमेज
    'कन्हैय्याला मनसेचे कवच' अशी निराधार बातमी देणाऱ्या जय महाराष्ट्र वाहिनीचा खोटेपणा उघड झाला. वृत्तवाहिनीने आज बेधडक पणे आणि वस्तुस्थितीचा कोणताही आधार नसताना'महाराष्ट्रात कन्हैय्याला राज ठाकरे समर्थन देणार, अशी बातमी चालवली आणि एकूणच राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला.जय महाराष्ट्र' हा शब्द उच्चारला किंवा ऐकला तरी मराठी माणूस काही क्षण का होईना रोमांचित होतो. अशी ताकद या शब्दात आहे.पण 'जय महाराष्ट्र' याच नावाने चालणाऱ्या वाहिनीने या शब्दाला आज बट्टा लावला.राजसाहेबांवर टीका केली की टीआरपी मिळतो हे गणित माहित असल्यामुळे टीआरपी कमी झाला की कर राजसाहेबांवर टीका हा माध्यमांचा खाक्या आहे. पण आज जय महाराष्ट्रने तर यांवर कडी केली.साहेबांनी न केलेलं विधान आणि न मांडलेली भूमिका चॅनेलवर मांडून टाकली.कोण कुठला कन्हैय्या त्याला मनसेचं कवच म्हणे.अहो जिथे आमचा नेता एका बाजूला मराठवाड्यातल्या उन्हात मराठी तरुणांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळच्या केसेसकरता न्यायालयात हजर राहतोय आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्तांकरता जलसंधारणाचे प्रकल्प रा

सुट्टयांमध्ये काय कराल

इमेज
   सुट्टयांमध्ये टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळ घालवणे. याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करु शकतो,ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरला त्याचा फायदा होऊ शकतो.यासाठी तुम्हाला कुठल्याही वक॑शाॅपला जाण्याची गरज नाही. ब्लॉगर.कॉम -आपल्या मनातील भावना,वाचनात येणा-या चांगल्या गोष्टी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशा वाटतात.तर तुम्ही या वेबसाईटवर ब्लॉग तयार करू शकता. त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आटि॑कलही सेट करू शकता.ही फ्री वेबसाईट आहे आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना पोहोचवयाचा असेल, तर गुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम गुगला देऊन तुमच्या ब्लॉगला जास्तीत जास्त पोहचवू शकता. फेसबुकवर पेज - फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असतांना आपण आपल्या आवडीच्या विषयावर ऐखादं फेसबुकवर पेज तयार करून त्यावर जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता एखाद्या विषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो. टि्वटर - आपले विचार थोडक्या शब्दात लोकांना पोहोचवयाचे असल्यास याचा वापर करू शकतो फाॅलोअस॑ मिळवू शकतो तसेच त्यांच्याशी  संवाद साधू शकता  फेसबुक

आठवले का ते क्षण

इमेज

आणि तेव्हा पुरुषाचा बाप होतो

इमेज
मन तुझे झालेबापमाणुसबायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येतेतेव्हा पुरुषाचा बाप होतो... नर्स ने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो.... बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळीपावलांना घराची ओढ लागते,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... "लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... खऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्याखोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... स्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला

लक्ष असू द्या

इमेज
कोकणाची मुंबई होऊ देऊ नका,... जास्त पैशासाठी आपल्या जमिनी परप्रांतीयाना विकु नका..   आपल्या गावी कोणत्याही भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक आली, तर त्यांची उठाबस करायची, त्यांना काय हवे नको ते पाहायचे, पण त्यांच्या गोड स्वभावाला किंवा पैशाला बळी पडून त्यांना आपल्या गावातील भूमी विकाची नाही. त्याबद्दल जागरूक रहा, " येवा कोकण आपलाच असा " बोलत बसू नका. आपलं गांव तरी आपल्या ताब्यात ठेवा, गाव म्हणजे फक्त आपल्या घरची मंडळी आणि घरापुढचे अंगण आणि गाडी पार्किंग ची जागा नाही, गांव म्हणजे गावांत राहणारी आपली सर्व माणसे, आपली भाषा आपले राज्य आपले देव आपली देवळं,आपल्या शेती. कोकण मध्ये दुहेरी रेल्वे मार्गासाठी परवानगी मिळाली आहे, त्यामुळे अजून परप्रांतीय लोंढे आपल्या गावी येऊन भूमी विकत घेणाच्या विचारात असतील, आपल्या भूमी आपल्याच मराठी माणसाला विका. नाही तर उद्या तुमच्या नातवाला तुमचं गांव म्हणजे मुंबईच वाटायची. लक्ष असू दया...

उष्माघात

उष्माघात... उन्हामुळे मृत्यू का होतो? दिल्लीपासून आंध्रापर्यंत... शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत. आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? 👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात 👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. 👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं 👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. 👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) 👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात. 👉 रक्तातलं पाणी कमी झा

आधुनिक मामाचे गाव

आधुनिक मामाचा गाव  झुक झुक झुक आगीनगाडी  धुरांची रेषा विसरून गेली एसीचे डबे बुक करूया मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव हाय मोठा मॉल बझारला नाही तोटा ऑन लाईन शॉपिंगही करूया मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा पगारदार घेऊन येई ऑडी कार लाँग ड्राईवला जाऊया फोर व्हिलर शिकूया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको शिकलेली व्हाट्सअप मध्ये गुंतलेली तिला जोक पाठवूया रूसलेली मामी हसवूया  मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको चटपट  रोज रोज मॅगी झटपट पिझ्झा बर्गर खाऊया  मामाच्या गावाला जाऊया

मैत्रीण पाहिजे

मैत्रीण पाहिजे अशी कधी कधी तिढ्यात कधी कधी कोड्यात कधी गोडीत बोलणारी... मैत्रीण पाहिजे अशी कधी सुख वाटणारी कधी दु:ख वाटणारी कधी समजून घेणारी... मैत्रीण पाहिजे अशी कधी आपलंस करणारी कधी अश्रु पुसणारी कधी कधी झापणारी.. मैत्रीण पाहिजे अशी नेहमी मन जाणनारी ह्रदयात बसणारी गालात हसणारी.. मैत्रीण पाहिजे अशी वाट दाखवणारी कौतुकाने पाहणारी संकटात हात देणारी... मैत्रीण पाहिजे अशी ओठावर हसु आणनारी कधी डोळे वटारणारी चुकलं तर कान धरणारी... मैत्रीण पाहिजे अशी जीवाला जीव देणारी कधी भाव खाणारी कधी भाव देणारी... मैत्रीण पाहिजे अशी कधी तिखट बोलणारी कधी तिखट वागणारी कधी गोडी लावणारी... मैत्रीण पाहिजे अशी मंजुळ पाव्यासारखी दुधाच्या खव्यासारखी...

क्षणभर विश्रांती..........

इमेज
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो.तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून,पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.पाहता पाहता झोपीही गेला.मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो. तासाभराने तो उठून दाराकडे निघाला.मी ही उठून दार उघडले.तो सरळ कंपाउंड बाहेर गेला.बहुधा, त्याच्या घरी गेला असावा! दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला.तासाभराने उठून निघून गेला.      मग हे रोजचेच झाले.तो यायचा, झोप काढायचा आणि निघून जायचा.असे कित्येक आठवडे झाले.मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज येऊन झोप काढतो

आणि पहिली रेल्वे धावू लागली...

इमेज
पहिली रेल्वे मुबई ते ठाणे धावू लागली !! १६ एप्रिल १८५३ जगातील पहिली रेल्वे इंग्लंडमध्ये १८२५ च्या सुमारास धावल्यानंतर इ.स. १८४४ मध्ये हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव जगन्नाथ शंकरशेठ यांनी ब्रिटीशांकडे मांडला. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे पहिली कुदळ मारून रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. जवजवळ४५ लाख रुपये खर्च करून मुंबई-कल्यामपर् यंतचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे पूर्ण श्रेय लॉर्ड डलहौसीला दिले जाते ते चुकीचे आहे , कारण त्यासाठी फार मोठे कष्ट नानांनीच घेतले आहेत. वाद हे त्या काळीही होते. मीटर गेज रेल्वे असावी की ब्रॉड गेज यावर तेव्हा वाद झाला. १५ ऑगस्ट १८५४ रोजी कलकत्त्याला, ३ फेब्रुवारी १८५५ रोजी राणीगंज असा रेल्वे प्रवास सुरूझाला. तथापि १६ एप्रिल १८५३ रोजी हिंदुस्थानातील पहिली रेल्वे मुंबईत धावली. लोकांनी या पहिल्या रेल्वेचे स्वागत कसे केले हे ऐकल्यावर आजच्या पिढीलानक्कीच आश्चर्य वाटते. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , नेटिव्ह उपस्थित होते. १८ डबे आणि

काय चुकलं

इमेज
क्रिकेट समालोचनाबद्दल बोलायचं झाल्यास सवा॑त प्रसिद्ध आणि लोकप्रिय समालोचक कोण असा प्रश्न जर कोणाला विचारला तर सर्व लोकांच्या समोर येतो तो म्हणजे हष॑ भोगले आणि खरंच हर्ष भोगले यांच्यातही हा ‘प्रोफेशनॅलिझम’ आपणास पाहायला मिळतो. क्रिकेटवरचं प्रेम,भाषेवरचं प्रभुत्व, कामावरची श्रद्धा, जबाबदारीचं भान आणि क्रीडाक्षेत्राची जाण,या गुणांवर त्यांनी जगभरातील क्रिकेटचाहत्यांच्या मनात प्रेमाचं – आदराचं स्थान निर्माण केलंय.      एखादा भाविक प्रवचनात जसा तल्लीन होतो रमतो,तितक्याच तन्मयतेनं त्यांची ‘कॉमेन्ट्री’ ऐकणारे एक नाही तर अनेक क्रिकेटप्रेमी आपणास पहायला मिळतील.असं असतानाही देखील,कुठलंही कारण न देता बीसीसीआयनं त्यांना आयपीएल स्पर्धेपासून दूर ठेवल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नांप्रमाणेच हर्ष भोगलेंचं काय चुकलं? हा प्रश्न आज अखिल क्रिकेटविश्वाला पडलाय. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी,तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…! कटप्पाने बाहुबली का मारले याचे उत्तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात क

नक्की वाचा नाना पाटेकरांचा ब्लॉग

इमेज
नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा असा......         शिर्डी साईबाबा  : प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड  + सोने  ३२  करोड, + गुंतवणूक ४२७ करोड  ----------------------------------------------------------------- सिद्धीविनायक , मुंबई पैसे - २००  करोड , FD : १२५ करोड. ----------------------------------------------------------------- लालबागचा राजा : १८  करोड कमाई फक्त  गणपतीच्या  १०  दिवसातली. ----------------------------------------------------------------- गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी/मजूर मी स्वतः पाहिलेत अन - त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने  5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय. फक्त 3 देवांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन . एका बाजूला . स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी -चोळी-पोशाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी --स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने

प्रसंगच तसा होता

राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती. प्रसंगच तसा होता. त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल. भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.पण, वचन देण्याआधी विचार कर.जमेल का?भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,अरे याचका,माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही. भिक्षुक म्हणाला, अरे

निदान आता तरी

इमेज
मंदिर प्रवेश नव्हता तरी माॅसाहेब जिजाऊ 'राजमाता' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सावित्रीबाई 'क्रांतीज्योती' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लक्ष्मीबाई झाशीच्या 'राणी' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लतादीदी हिंदुस्थानच्या 'गानकोकिळा' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डाॅक्टर झाल्या. मंदिर प्रवेश नव्हता तरीही कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.आणि मंदिर प्रवेश नव्हता तरीही प्रतिभाताई देशाच्या पहिल्या महिला 'राष्ट्रपती' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सिंधुताई अनाथांच्या माय झाल्या. .. .. .. तृप्ती देसाई, तुम्हाला मंदिर प्रवेश मिळालायं. निदान आता तरी आपल्या देशात अनेक समस्या आहेत दुष्काळ, शेतकरी बांधवाचे आत्महत्या,दारूबंदी व डान्सबार बंदी त्या विषयी आवाज उठवा आणि लढा आम्ही तुमच्या सोबत असू.   आज राम नवमी...राम नवमीच्या शुभेच्छा... देवा कडे पाणी मागितले तर समुद्र दिला !!! फुल मागितले तर बागच दिली !!! घर मागितले तर राजवाडाच दिला !!! आणी मग..... देवापाशी देवच मागितला तर..... त्यांनी तुमच्यासारखे गोड माणसे दिल

महाराष्ट्राचा नंबर कधी येणार

इमेज
     चार हजार कोटी महसुलावर पाणी घालीत बिहारमध्ये संपूर्ण दारू बंदी लागू करण्याच्या धाडसी निर्णय घेतला आहे.तर महाराष्ट्रात डान्स बार बंदी उठली.दारू मुळे कुटुंब उध्दवस्त होत असल्याने विदेशी दारू पिण्याची,विक्रीची आणि व्यवसायाची बंदी घालण्यात आली आहे. गुजरात,केरळ आणि नागालँडसह दारूबंदी करणारे बिहार हे देशात चौथे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रचा निदान पाचवा नंबर लागेल का किंवा पहिल्या दहामध्ये तरी महाराष्ट्राचा नंबर लागेल अशी आम्ही अपेक्षा करतो बिहार मध्ये दारूबंदी होते तर महाराष्ट्रात का नाही.महाराष्ट्रात दारू पिणा-यांचे आरोग्य जपले जाते का?     महसुलासाठी आणखी किती जणांचा बळी तुम्ही घेणार आहोत? महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दारूबंदी आहे तेंव्हा संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे गरजेचे आहे. तशी हिंमत दाखवावी. दारूपासून मिळणा-या उत्पन्नाकडे निधीचा स्तोञ म्हणून बघणे चुकीचे आहे.त्या निमीत्ताने पाण्याची बचत होईल.

तूच तुझी वैरी

बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष समानता विचार मले पटते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते माणसानं म्हणतात मागं ठेवल्या बाया पण एका हातानं सांगा वाजतात का टाया बाईचं सुख पाहुन बाईच आतून पेटते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो कसा काय बाईले तो कमी लेखत असतो जागो जागी आपल्याले हेच दिसत असते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते एस. टी.त बाईले माणूस जागा देईन पण बाई मात्र बाईले तशीच ऊभी ठेईन आणखीनच ते आपलं फतकल मांडून बसते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते पोराची माय सारं घरूनच सांगते सून घरी आली की सासूलेच खूपते खरं सांगतो बाईच बाईच्या जिवावर उठते एक दिवस माह्या घरी सायी माही आली काय सांगू राज्या मले लय खुषी झाली बायकोले बापा माह्या हे बी खटकते खरं सांगतो बाईचं बाईच्या जिवावर उठते मले वाटलं सायीले सिनेमाले नेवाव बायकोची बहीण म्हणून मागीन ते देवाव बायकोले वाटे आता म

एक किस्सा

माझे मित्र रविंद् सरांनी सांगितलेला एक किस्सा काल एका मित्राने घरी बोलावले होते.सत्यनारायणाची महापुजा होती त्याच्याकडे.म्हटलं..ठीक आहे..तुझी इच्छाच आहे तर तो शिरा खायला येतो.मला खुप आवडतो..गेलो..! तो मित्र आणि त्याची बायको पुजेला बसले होते.भटजी साधू वाण्याची कथा सांगत होते.तो मित्र पुजा सुरु असतानाच मंडप-लाईट-डेकोरेटर्सना आवश्यक सुचना करत होता..! आल्या-गेल्या पाहुण्यांची विचारपुस करत होता..! अधेमधे भटजींनी सांगितलेल्या सुचना ऐकत होता..! अशीच पुजा संपली..आरती झाली.! मी मित्राला विचारलं,“तु पुजा ऐकत नव्हतास.. आजूबाजूचे कोणीही लक्ष देवून ऐकत नव्हते..मग हे थोतांड कशासाठी..? तो म्हटला,अरे वेड्या..सत्यनारायण निव्वळ बहाणा असतो रे..लोकांना घरी बोलावण्याचा..केवळ एक निमित्त..हे आमंत्रण सहसा लोक टाळत नाहीत.. म्हणुन..! म्हटलं,अरे कोपेल ना तुझ्यावर तो अशाने..! म्हटला,अरे सतरा वर्ष झाली..हे करतोय..पुजा एकदाही ऐकली नाही..आणि कोपही झाला नाही..! सत्यनारायणापुढे मी हात जोडले नव्हते..पण या मित्राला मात्र साष्टांग लोटांगण घातले..!!

चचे॑त कसे राहावे

इमेज
    शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा आणि साई भक्तांना लक्ष्य केले असून. पूजेस 'अपात्र' असलेल्या साईबाबांची पूजा केल्यानेच महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करुन आपले हसू करुन घेतले आहे.  शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा चर्चेत आले आहेत. यांना कोण समजून सांगणार की पूजा आरत्या मिरवणुका काढून काही होत नाही. जे वाईट कृत्य कराल ते याच जन्मात फ़ेडावे लागते. यात देव सुद्धा काही करू शकत नाही. आमच्या स्वार्थी वृत्तीने निसर्ग लुटून खाल्ला आता निसर्ग आम्हाला आमची जागा दाखवेल. हा दुष्काळ कुंभमेळ्या मुळे पडला.कुंभमेळ्यात करोडो रुपये खर्च झाले.ते जर दुष्काळ रुपये त्या शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या.आणि लाखो लीटर पाणी हे त्या कुंभमेळ्यात वाया गेल ते पाणी मराठवाड्यातील जनता पिली असती....   आत्ता खरी गरज आहे ती सर्व बाबा महात्मा साधु संत यांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याची कारण आश्रमात /मठात बसुन गप्पा करून काही साध्य होणार नाही सर्व बाबांनी व त्यांच्या लाडक्या भक्तानी दुष्काळाची व्याप्ती कमी करण

एक विनंती आहे

इमेज
  हा सर्व फळांचा ऋतू आहे. म्हणजेच आंबा ,जांबुळ , सिताफळ इत्यादि . माझी सर्वांना विनंती आहे की या फळांचा जेंव्हा तुम्ही आस्वाद घ्याल व उरलेले  बी कुठेही इतरत्र न टाकता, या बिया स्वच्छ करुन आणि एका प्लास्टिक बॅग मध्ये ठेवा व ती तुमच्या कार (Car) किंवा गाडीमध्ये ठेवा . बरेच लोक या उन्हाळी सुट्टी मध्ये पर्यटनाला जातात. तुम्ही ही गेलाच आणि प्रवासा दरम्यान  जर तुम्हाला ओसाड जागा पहावयास मिळाली तर या बिया तुम्ही त्या ठिकाणी टाकून दया.असे केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या बिया रुजल्या जातील व त्या बियाची नविन रोप तयार होईल.   अशा पद्धतीने आपल्या सर्वांकडून एका जरी रोपाच ( बियाचे) रूपांतर झाडामध्ये झाले तर आपले Mission पूर्ण होईल .असे प्रयोग खुप वर्षापासून सातारा आणि रत्नागिरी भागामध्ये सुरू  आहेत. याप्रकारे बाकी अनेक जिल्ह्यांमध्ये अशा  कल्पना लोकांच्या पर्यंत पोहचवुन लोकांना जागृत केल जात आहे आणि कित्येक लोक या मिशन मध्ये सामील ही झाले आहेत.... माझी सर्वाना विनंती आहे व सांगण्यास उत्स्तुकता ही वाटते की आपणही या Mission मध्ये सामील होऊ आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एका नव्या हिरवळ जगाच

पर्यावणाला ग्रहण लागेल

इमेज
     शहराचे सांडपाणी आणि औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक पाणी पोटात घेणाऱ्या ठाणे खाडीतील वाढत्या प्रदूषणामुळे येथील ९० टक्क्यांहून अधिक मत्स्यप्रजाती नष्ट झाल्या असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याशिवाय खारफुटी, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, शंख, चिंबोरी, कीटक, कोळी, दलदलीय जीवजंतू यांच्या प्रजातीही घटल्या आहेत. एकीकडे खाडीच्या पर्यावरणाला ग्रहण लागले असताना दुसरीकडे खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे खाडी परिसरात १५५ हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.ही खूप  आंनदाची बाब असली तरी त्यांपैकी सात प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व धोकादायक बनले आहे.त्यामुळे आता प्रदुषण थांबविणे खुपच महत्वाचे ठरणार आहे.          प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय

शोभेल असे काम करा

वेस्टइंडिज च्या महिला संघाने विश्वचषक जिंकला,भारतातल्या महिला मंदीरात प्रवेशासाठी भांडतात शनी महाराजांच्या चौथऱ्यावर चढण्याचा हट्ट धरण्यापेक्षा....... इतर  अनेक विषय आहेत त्या बद्दल लढा आंदोलने करा  स्त्रीभृण हत्या' थांबवण्यासाठी आंदोलन करा...    दारु बंदी करण्यासाठी आंदोलन करा...नापीक व दुष्काळी परीस्थीती मुळे ज्या महीला शेतकरयाचे कुंकू पुसले जाते त्यांचे कुंकू वाचविण्याचा प्रयत्न करा... आज ही खेड्यातील बरयाच महीला ह्या अज्ञानी व अप्रगत आहेत. त्यांच्या साठी सावित्री बनून महीला सक्षमीकरण करण्यासाठी शासना कडे हट्ट धरा....धर्मातल्या,चांगल्या परंपरा जपण्याचा हट्ट धरा.... खरचं देव जर महीलांना दर्शन नाकारत असेल तर अशा देवांच्या नादांला लागतातच कशाला...???? हट्ट धरायचाच असेल तर'राजमाता जिजाऊच्या' व सावित्री आई च्या समाधीच दर्शन घ्या...     जिजाऊ आणि सावित्री बाई जर शनी महाराजांच्या चौथऱ्याचा हट्ट धरत बसल्या असत्या तर शिवछत्रपतींचे 'स्वराज्य' कधीच घडले नसते. व स्त्री शिक्षण पण झाले नसते. उपकार आहे त्या सावित्री माईचे तुम्हावर हे विसरू नका.....!!!! महाराष्ट्रातील पुर

हे कधी थांबणार

इमेज
  प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला.त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.     आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळविणे ही दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा आहे .देशांत वर्षभर कुठे नाकुठे कसोटी सामने ,एकदिवसीय सामने आणि T-20 सामन्यांचा उरुस भरलेलाच असतो.मग कुठलेही महत्व नसणाऱ्या या आयपीएलचा तमाशा ऐन  उन्हाळ्यात आणि तोही आपल्यासारख्या दुष्काळग्रस्त देशात अट्टाहासाने भरवण्यात कुठलं शहाणपण आहे ? पैशाला हपालेले हे आयपीएलचे आयोजक इतके संवेदनाहीन कसे? करमणुकीसाठी चालविलेली ही थेरं तात्काळ बंद व्हायलाच हवीत. त्यासाठी आता सरकारनेच कुठल्याही,कोणाच्याही दबावाला बळी न पडता यात हस्तक्षेप करुन हे श्रीमंती चाळे थांबवायला हवेत. आणि हे जर होणार नसेल तर मग आताच्या सरकारमध्ये आणि पूर्वीच्या सरकारमध्ये फरक तो काय राहिला असा सवाल जर दुष्काळग्रस्त जनतेच्या मनात उभा राहिला तर काय चूक?मग खेळपट्टी उखडण्य

आपण कोण आहोत

मित्रांनो... ते म्हणाले सतीची प्रथा चालू रहावी हे म्हणाले सतीची प्रथा बंद व्हावी हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले स्त्रीयांना शिक्षण नको हे म्हणाले स्त्रींयाना शिक्षण मिळायला हवे हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले विधवांचे केशवपनच व्हावे हे म्हणाले केशवपन बंद झाले पाहीजे हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले विधवांचा पुनर्विवाह नकोच हे म्हणाले विधवांचा पुनर्विवाह झाला पाहीजे हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार नको हे म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार हवा हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले स्त्रियांना संपत्तीत हिस्सा नको हे म्हणाले स्त्रीयांना संपत्तीत हिस्सा हवाच हरले ते आणि जिंकले हे! ते म्हणाले इथे यांना वा त्यांना प्रवेश नको हे म्हणाले इथे सर्वांनाच प्रवेश मिळालयला हवा हरले ते आणि जिंकले हे! जगाचा इतिहास सांगतो सातत्याने ते हरले सातत्याने हे जिंकले ते सतत हरतात आणि हे सतत जिंकतात ... आपण कोण आहोत? ते आहोत की हे आहोत...?

यश मिळालं.... मिळेल

         काल जे शनिशिंगनापुरच्या अभूतपूर्व लढ्याला यश मिळालं...आणि ज्या लढ्यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं...आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या न्यायालयीन लढाईतून हा संवैधानिक विजय प्राप्त झाला आहे. ही लढाई होती समान अधिकाराची...लढाई होती स्त्री-पुरुष विषमता नष्ट करण्याची...लढाई होती धर्माच्याच नावावर चालणाऱ्या अधार्मिक चुकीच्या प्रथा नष्ट करण्याची...    आता गम्मत अशी आहे की..   जे तथाकथित संस्कृतीरक्षक या लढाईला कडाडून...चवताळून...अरेरावीची भाषा वापरून...मिडियात असो...वा सोशल मिडियात असो...आक्रमकपणे विरोध करत होते...आज मात्र तेच 'पहा आमचा हिंदू धर्म कसा लवचिक आहे...सुधारनावादी आहे...सहिष्णु आहे...' या आणि अशा बाता मारताना दिसत आहेत...   ज्या-ज्या वेळी मन्दिर प्रवेशाचा मुद्दा निघायचा...त्या त्या वेळी या हिंदू संस्कृति रक्षकांना मात्र काळजी मुस्लिम स्त्रियांच्या मश्जिद प्रवेशाची असायची...'त्यांच्यासाठी आधी लढा...'असा उदार(?) हेतु त्यांचा असायचा... स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजाणाऱ्या लोकांना आपल्या धर्मातील स्त्रियांच्या समानतेची पर्वा तर न

हॅपी जनी॑

इमेज
    प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.      उन्हाळी सुट्टया लागल्या की प्रत्येक कुटुंबाला वेध लागते पय॑टनाचे त्यात एप्रिल, मे महिना खास आणि वेगवेगळ्या स्थळी फिरायला कोणाला आवडणार नाही साहजिकच अशा ठिकाणी जाण्यासाठी तिकीटे, हॉटेल, गाइड या सव॑ गोष्टीची गरज भासतेच आणि आपण तशी व्यवस्थाही करतो पण ऐनवेळी सहलीवर जायचे म्हटले तर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.                                अशा वेळी 'एअर बीएनबी' ही व्यवस्था अतिशय फायदेशीर ठरते. इंटरनेटवर अतिशय लोकप्रिय झालेली ही संकल्पना आता तुम्हाला अॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून तुम्ही कोणत्याही देशात, राज्यात, शहरात तुम्ही तुमच्या निवाराची व्यवस्था करू शकता त्यासाठी जास्त पैसे ही मोजावे लागणार नाहीत.                               औरंगाबाद पासून साधारण ३० कि.मी. असले

वाचून विचार करा

इमेज
प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.