पोस्ट्स

मे, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉक्टर ! तुम्हीसुद्धा.....

इमेज
गर्भलिंग चाचण्या करताना कारवाईच्या कचाट्यात अडकू नये , यासाठी सोनोग्राफी सेंटरमध्ये गणपती व लक्ष्मीचे फोटो ठेवले जातात . मुलगा असल्यास गणपतीच्या फोटोकडे आणि मुलगी असल्यास लक्ष्मीच्या फोटोकडे केवळ बोट दाखवले जाते . त्याशिवाय सांकेतिक भाषेत इंग्रजीत मंडे आणि फ्रायडे असे सांगितले जाते . मंडेच्या इंग्रजी स्पेलिंगची सुरुवात ' एम ' म्हणजे मेल आणि फ्रायडेची सुरवात ' एफ ' ने होते . ' एफ ' म्हणजे फिमेल असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते . प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाने राज्यातील ६० डॉक्टर व गर्भवती महिलांच्या पाच नातेवाईकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे . त्यापैकी बहुतांश डॉक्टर पुणे , धुळे व जळगावमधील आहेत . दरम्यान , गुप्तपणे अशा चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांवर गुप्तचरांमार्फत नजर ठेवण्यात येत आहे . गर्भलिंग चाचण्यांप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे . त्यासाठी व्हिजिलन्स व इतर गुप्तचर

देशात 'अच्छे दिन' येणार.....

इमेज
देशात ' अच्छे दिन ' येणार , असा विश्वास जनतेला देऊन पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आदल्याच दिवशी भारताला एक चांगली बातमी मिळाली आहे . पाकिस्ताननं आज भारताच्या १५१ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे . भारत - पाक मैत्रीच्या नव्या अध्यायाचा हा शुभारंभ ठरावा , अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय . दुसरीकडे , श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी दिले आहेत . पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भाजपनं नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं होतं . ते स्वीकारून शरीफ उद्या मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहेत . त्यानंतर २७ मे रोजी द्विपक्षीय संबंधांबाबत भारत - पाकमध्ये चर्चाही होणार आहे . या सर्व घडामोडींचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय . दोन्ही देशांना ' अमन की आशा ' असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत . या पार्श्वभूमीवर , पाकिस्ताननं १५१ भारतीय

अंधश्रद्धेच्या आहारी

इमेज
  अंधश्रद्धेच्या आहारी जात मुंबईतील मुलीशी जमलेले लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार् ‍ याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे . मात्र आता या व्यापार् ‍ याने तिसर् ‍ या मुलीशी लग्नाचा घाट घातल्याची माहिती हाती आल्याने याविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे समितीच्या वंदना शिंदे यांनी सांगितले . भांडुप येथे राहणार् ‍ या आणि वांद्रे येथे सोन्याचे दुकान असणार् ‍ या एका सराफाने मुंबईतील एका मुलीशी विवाहाची बोलणी सुरू केली होती . मात्र अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या त्याच्या आईवडिलांनी दोघांची कुंडली एका मांत्रिकाला दाखविली . त्यात त्यांचे ‘ गुण ’ जुळत नसल्याचे मांत्रिकाने सांगताच जमत आलेले लग्न व्यापार् ‍ याने मोडले . म्हसवडजवळील रांजनी हे या व्यापार् ‍ याचे गाव आहे . आता या व्यापार् ‍ याने आणि त्याच्या आईवडिलांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह