विलफूल डिफॉल्टर्स म्हणजे काय?
विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने जवळपास 7000 कोटी रुपयांची बँकांची कर्जे बुडवल्याच्या बातम्या काही महिने झळकत आहेत. परंतु, आर्थिक समस्यांची कारणं देत किंवा नादारी जाहीर करत बँकांच्या पैशांवर डल्ला मारणारे 5,275 विजय मल्ल्या भारतात असल्याचे क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड किंवा सिबिलने म्हटले आहे. कर्जदारांच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. विलफूल डिफॉल्टर किंवा स्वेच्छेने कर्जाचा हप्ता बुडवणाऱ्यांनी थकवलेली कर्जे गेल्या 13 वर्षांमध्ये नऊपटीनं वाढली आहेत. इंडियास्पेंडने सिबिलच्या माहितीचा आढावा घेतला असता, अशा 5,275 विलफूल डिफॉल्टर्सनी भारतीय बँकांचे 56,521 कोटी रुपये थकवल्याचे आढळले आहे. विलफूल डिफॉल्टर्स म्हणजे काय? ज्यावेळी आर्थिकदृष्ट्या शक्य असूनही कर्जदार मुद्दामहून कर्जाचा हप्ता भरत नाही त्यावेळी बँक अशा कर्जदाराला विलफूल डिफॉल्टर म्हणून घोषित करते. या यादीमध्ये विजय मल्ल्या चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबईतील विनसम डायमंड्स अँड ज्वेलरी (3,263 कोटी रुपये), बीटा नाफ्थोल (951 कोटी रुपये), कानपूरची...