एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकान ात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.
एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”
या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”
समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”
मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.
हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.
व्यवसाय का करावा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे
ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...
-
नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या ...
-
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट सम...
-
बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष स...
-
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही...
-
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडव...
-
गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि...
-
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी ...
-
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यां...
-
shanti sagar water park 9km away from Ambarnath Railway station water park price 350/- per person without food food available is...