मनसे चे इंजिन सुसाट . . . . .

मनसे चे इंजिन सुसाट . . . . . 

          राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी राज ठाकरे हल्ली नेमकं काय करताहेत ,असा प्रश्न गेले बरेच दिवस महाराष्टात सर्व राजकीय नेत्यांना सतावत होता . अधूनमधून केव्हा तरी राजसाहेब दोन चार भाषणं करून धमाल उडवून देतात ते दिसून येत होते पण या व्यतिरिक्त ते काय करताहेत ,या प्रश्नाचे उत्तर जळगाव महापालिका आणि नांदेड परिसरातील लोहा गावातल्या मतदारांनी दिलयं !

     घरकुल घोटळ्यामुळे सगळया राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव महापालिकेत जळगावकरांनी मनसे ला आपला पाठींबा दिला आहे. मनसे १२ जागावर निवडून आली असून तिसरा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत कोणत्याही पक्ष नेत्याची सभा घेतली  नाही हे विशेष २००८ साली १ जागेवर समाधान मानावे लागले हाते .मात्र २०१३ मध्ये तरूनांनी पाठींबा देऊन मनसे १२ जागावर निवडून आली.  मनसे च्या टेकुने जळगावचा महापौर ठरणार आहे. नांदेड सह सगळया मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेल्या लोहा नगरपालिकेत मनसेला बहुमत मिळाले असून एकहाती सत्ता प्राप्त केली आहे . १७ मधून ९ जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले आहे . राज्यात प्रथमच पालिकेवर स्वबळावर सत्ता मिळवण्याची किमया मनसेने साधली आहे . 

     मनसे हा पक्ष फक्त शिवसेनेच्या मतांवर नव्हे तर इतर मतांवरही डल्ला मारतो हे विविध निवडणूक निकालांवरून दिसून येते . मुबई -पुणे -नाशिक या सुवर्णत्रिकोणी परिसरापुरती मनसे मर्यादित नसून मराठवाडा किंवा राज्याच्या इतर भागातही मनसे आपला करिश्मा दाखविण्यास सज्ज जाली आहे. 

                                                                                  

                                                       ठाणे विघ्नहर्ता प्रतिनिधी -विनायक पवार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी