टो पद्धत मध्ये बदल कधी होणार ?
टो पद्धत मध्ये बदल कधी होणार ?
गेल्या १०-१५ वषात ठाणे शहरात चांगली विकासकामे झाली आहे . शहर एक
डेस्टीनेशन म्हणून नावारूपाला येत आहे.नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढला
आहे.लोकसंख्या वाढते आहे तशी समस्यां मध्येही वेगाने वाढ होत आहे. सध्या
शहरात रस्त्याच्या दूतफा गाड्या पाक केलेल्या दिसतात त्यामुळे गाड्या
वळविणे कींवा एकाचवेळी दोन वाहने रस्त्यावरून जाणे मुश्कील होते त्यामुळे पाकिग वरून वाहनचालकांध्ये भांडणे होतात . ठाण्यात ही समस्यां उग्र रूप धारण करते म्हणून टो पद्धत सुरु करण्यात आली .
ठाण्यात रस्त्यावर
अनधिकृत होणारे वाहनांचे पाकिग बंद व्हावे म्हणून टो व्हन बनविण्यात
आली. वाहतूक नियम मोडणारी वाहने उचलून नेण्याची कामे टो यंत्रणा करत असते
या करवाईमुळेच कोठेही वाहन पाक करणा-यांना वचक बसला याचे ताजे उदाहरण
म्हणजे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी गडकरी ते टावर नाका या ठिकाणी वाहतूक
शाखेने एका दिवसात ६५२ वाहनांवर करवाई करून ६७ हजारांचा दंड वसूल केला .
हे जरी खरे असले तरी तेथे काम करणा-या व्यक्तीची वाहनचालकांशी
बोलण्याची पद्धत आणि गाडी उचलण्याची पद्धत खूपच चुकीची असून करवाई करतांना
त्याच्यात आणि वाहनचालकात नेहमी वाद होत असतात. अनेकदा वाहने कशीही उचलली
जात असल्याने आरसे फुटणे , गाडीला ओरखडे येण्याचे प्रकार नेहमी होत असतात .
त्यामुळे काम करणा-या व्यक्तीना प्रशिक्षण देणे हे खूप महत्वाचे आहे . तसे केल्यास वाहनचालकांची नाराजी दूर होईल .
विनायक पवार
संपादक
टिप्पण्या