वेळ आलेय परिक्षा देण्याची ...

वेळ आलेय परिक्षा देण्याची ...

अखिल भारतीय राजकीय आणि अराजकीय संघ

विषय : मराठी

वेळ : १७ एप्रिल २०१४ पर्यंत

--------------------------------------------
 प्रश्न 1)खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर १० ते १५ ओळीत निबंध लिहा.
१) मी खासदार झालो तर..
२) बंडखोर उमेदवाराचे आत्मवृत्त
३) चिकनसुप शाप कि वरदान
४) आप कुणाची गरज..?
५) माझा आदर्श नेता


प्रश्न २) कोण कोणास म्हणाले ?
१. "..मग मी काय धरणात मुतू का..?"
२."...अरे मी त्यांना चिकन सुप पाजलंय.."
३."शाई पुसुन दोनदा मतदान करा..
४."...मी तर ८ कोटी खर्च केलाय निवडून येण्यासाठी ..."


प्रश्न ३)योग्य जोड्या जुळवा
1.कलमाडी . . . अ.सिंचन घोटाळा
2.पवार........ब. cwg घोटाळा
3.देवकर.....क.आदर्श
4.चव्हाण.....ड.घरकुल घोटाळा


प्रश्न 4.चुक की बरोबर सांगा
1. गोध्रा हत्याकांडात मोदींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
2.दिल्ली खुर्ची सोडण्याआधी जनमत घेतले होते.
3.महाराष्ट्रातील रस्ते गुजरातपेक्षा चांगले आहे .
4.शिवबंधनामुळे बंडखोरी थांबली.
5.मनमोहनसिंग उत्स्फुर्तपणे बोलले

प्रश्न 5 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

1. एखाद्याचा भुजबळ करणे
2.मनसे पाठींबा देणे
3. फक्त 49 दिवस सोसणे



प्रश्न 6 गटात न बसणारा शब्द ओळखा
1. कमळ,वाघ,शिट्टी,रेल्वे इंजिन
2.दादा,साहेब ,ताई,आण्णा
3. कॉंग्रेस ,आप,भ्रष्टाचार,राष्ट्रवादी
4.द्रविड,बोस,गांधी,खन्ना


प्रश्न 7 पत्र लेखन
पक्षप्रमुखांनी तिकीट कापल्याने नाराज झालेल्या मामाची समजूत काढणारे पत्र लिहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...