फक्त १ मिनिट.

• फक्त १ मिनिट लागेल.
नक्की वाचा
.
• एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने
आपल्या वडिलांना सहज विचारले.
"बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू
देणार.?"
वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा."
काही वर्षांनंतर....
१४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध
पडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले.
Doctor बाहेर आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले
तुमच्या मुलीला खुप वाईट ह्रृदयाचा विकार आहे
आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे.
• रुग्णालयात असताना मुलगी तिच्या वडिलांना म्हणाली :
"बाबा, Doctor असे म्हणाले
का मी काही दिवसांनी मरण पावणार आहे.?"
वडिल म्हणाले -"नाही गं,
तु १०० वर्ष जगणार आहेस आणि अश्रू ढाळत
निघाले.
मुलगी- तुम्ही खात्रीशीर कसं सांगू शकता.?
वडिलांनी वळून सांगितले मला माहित आहे.
उपचार चालू असताना काही महिन्यांनी ती १५
वर्षांची झाली आणि बरी होऊन
जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर एक
पत्र तिला सापडले,
त्यात लिहले होते:-
.
• माझे सोने, जर तु हे पत्र वाचत असशील तर
माझ्या म्हटल्याप्रमाणेसर्व
काही ठीक आहे.
एके दिवशी तु मला विचारले होतेस की,
"तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी काय
भेटवस्तू द्याल?"
तेव्हा मला माहित नव्हते परंतू मी तुला 'माझे ह्रृदय'
भेट म्हणुन दिले आहे.
तिच्या वडिलांनी ह्रृदय दान केले होते.
.
तात्पर्य - आपल्या आई-वडिलांवर प्रेम करा.
तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी तुमच्या नकळत
त्यांनी खुप त्याग केले आहेत.
मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे व्यस्त
होतो की आपले आपल्या पालकांकडे दुर्लक्ष
होते,त्यांच्या सहवासात तुमचा पुरेसा वेळ
घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने
वागणूक द्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे