नागला जंगल
नागला जंगल ठाणे -बोरीवली घोडबंदर रोड अहमदाबाद हायवेला जिथे मिळतो तिथे उजवीकडे वळल कि लगेच खाडीवरचा मोठा पूल लागतो पूल ओलांडले का साधारण अर्ध्या -पाऊन किमी वर नागलाच्या जंगलात जाणारा रस्ता आहे.हि हिरवी वाट वेगळ्या विश्वात नेणारी आहे.आपण मुबई-ठाण्यात आहोत हे आपण चक्क विसरून जातो.आणि आपल्याला घनदाट जंगलाचा जबरदस्त फील जाणवतो.गायमुखचा समोरचा हा भूभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उत्तरेचा भाग आहे.हे म्हणजे नागाला जंगल.हाच पट्टा पुढे कामण,तुंगारेश्वरच्या टेकड्यांना जोडतो.त्यामुळे या जंगला मधील बिबट्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाण्या येण्याचा मार्ग सुरक्षित होतो.त्या ठिकाणी बिबटे,सांबर.रान डूकर,विविध रंगी फुलपाखरे आणि कीटक दिसतात.तसेच समुद्री गरुड,ब्राह्मणी घार देखील गुण्या गोविंदाने राहतात. ठाणे -बोरीवली घोडबंदर रोड अहमदाबाद हायवेला जिथे मिळतो तिथे उजवीकडे वळल कि लगेच खाडीवरचा मोठा पूल लागतो पूल ओलांडले का साधारण अर्ध्या -पाऊन किमी वर नागलाच्या जंगलात जाणारा रस्ता आहे.मात्र रस्त्याच्या पलीकडे वसईच्या दिशेने दोन अडीच किमी जावे लागते हायवेला लागुनच सासुपाडा हे छोटेसे गाव आहे.इथे थोडेसे आतल्या बाजूला वन खात्यांच कार्यालय आहे नागलाचा ट्रेल इथूनच सुरु होतो.त्यासाठी प्रवेश फी द्यावी लागते.ज्यांना गाएड हवा असेल तर तोही मिळतो.पावसाळ्यात तर या ठिकाणी जाण्यास खूप मजा येते आणि वेगवेगळे कीटक दिसतात मी स्वत फोटोग्राफर असल्याने त्या ठिकाणी मायक्रो फोटो ग्राफी करणारयासाठी इथे कल्पनातील कीटकसृष्टी पहावयास मिळेल पक्षी प्रेमी साठी हे ठिकाण म्हणजे वरदानच आहे.पिकनिकसाठी या ठिकाणी येत असाल तर या ठिकाणी खाण्यापीण्याची कोणतीच सोय नसल्याने तुम्हाला सर्व घेऊन आणावे लागेल.या ठिकाणी जायचे असल्यास वन खात्याशी २५८५३५८५ या क्रमांकावर संपर्क करता येईल .
टिप्पण्या