सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा..!!

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.
       .'ती' असताना तिला जपा..तिची काळजी घ्या..गावी असेल..लांब असेल तरी आवर्जून वेळ काढून तिला भेटत राहा..अनेकदा काय होतं की आपल्या व्यापात अजाणतेपणाने आपलं तिच्याकडे दुर्लक्ष होतं..'ती'ही कधी स्वतःची खंत बोलून दाखवत नाही..तिचा तो स्वभावच नसतो..पण..पण ती 'गेल्यावर'..ती 'नसताना' आपल्याला कळतं..आपण काय गमावलंय..आणि मग तेंव्हा मात्र कायमस्वरूपी अस्वस्थतेशिवाय आपल्या हाती काहीही नसते..
म्हणून म्हटलं,ती असेल तर आत्ताच तिची काळजी घ्या..तिला प्रेम द्या..

सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा..!!  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...