उशिरा सुचलेले शहाणपण

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात भर रस्त्यात हत्या करण्यात आली.याचा तपास पुणे पोलिसांना देण्यात आला होता.या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन हजार नागरिकांची चोकशी केली,नऊ हिंधुत्ववादी संघटना,तीन मोठे धार्मिक गुरु,पंधराशे गुन्हेगार,दोन हजार संशय असलेले व्यक्ती,दुचाकी व वीस कोटी फोन केलेल्यांची तपासणी आणि जवळपास ५ ते ७ राज्यांत केलेला तपास हे करून देखील अजूनही त्यांचा मारेकरी सापडत नाही हि खूपच खेदजनक गोष्ट आहे.
  या हत्येला आठ महिने उलटूनही पुणे पोलिसांच्या तपासात ठोस प्रगती नसल्याने याचा तपास आता सीबीआय कडे सोपविला आहे हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे.हि मागणी होत असताना मात्र सीबीआय हा तपास आपल्याकडे घेण्यास उत्सुक नाही.युपिएपसुन वेगळ्या झालेल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांवर आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तपास करण्यात मात्र खूप उत्सुक असल्याचेआजपर्यंत दिसून येते.  नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हि महाराष्ट्ला लागलेला एक डाग आहे.सर्वांच्या नजरा या निकाला कडे लागलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या तपासाला सीबीआय नाकारत असेल तर त्या मागे काय कारण आहे हा मात्र संशोधनाचा विषय आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी