मोदी लाट.....


लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लाट निकालानंतरच कळते. या वेळी नरेंद्र मोदी यांची लाट होती, आणि त्यामध्ये भले भले वाहून गेले. 128 वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या कॉंग्रेसला मोदींनी नुसतेच पाणी पाजले नाही, तर अक्षरशः धूळदाण उडवली. लाट असते तेव्हा बाकी सारे गौण ठरते. मोदींचे नाणे महाराष्ट्रातही खणखणीत चालले. राज्यात शिवसेना-भाजपसह महायुतीने मिळवलेले यश अभूतपूर्व आहेच; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या कारभाराला लोक किती वैतागले आहेत, याची जाणीव करून देणारेही आहे. मोदींच्या लाटेत छगन भुजबळ, नीलेश राणे, प्रफुल्ल पटेल, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे, पद्मसिंह पाटील असे भलेभले वाहून गेले. सहाच महिन्यांत राज्यात निवडणुकीची परीक्षा देताना दोन्ही सत्ताधारी पक्षांपुढे काय वाढून ठेवले आहे, याचे दर्शन निकालाने घडवले आहे. दुसऱ्याच्या करिष्म्यावर आपला पक्ष उभा करता येत नाही, हा धडा मनसेला लोकांनी दिला. 1984 नंतर पहिल्यांदाच देशात स्पष्ट बहुमत घेऊन येणारा नेता मोदी यांच्या रूपाने पंतप्रधान होतो आहे. हे घडवून दाखवलेल्या मोदी यांचे मोकळ्या मनाने अभिनंदन करायला हवे. "अच्छे दिन आनेवाले हैं......' असे वातावरण तयार करण्यात मोदी यशस्वी झाले. लोकांना पर्याय हवा होता आणि पर्याय म्हणून लोकांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले. त्यांचा पूर्वेतिहास उगाळण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कसलीही दाद दिली नाही. एक बरे झाले; लोकांनी स्पष्ट कौल दिला. आघाडीधर्मासाठी तडजोडी कराव्या लागल्या, अशा प्रकारची पळवाटच भाजपला उरली नाही. "अच्छे दिन' येतील, यावर वाराणशीतल्या रिक्षावाल्यापासून ते मुंबई, दिल्लीतल्या उद्योगपतींपर्यंत सर्वांनी विश्वास ठेवला आहे. लोकांच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या आहेत. त्या पुऱ्या करणे हे मोदींपुढचे आव्हान असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...