मी शोध घेतोय …..



        मी आस्तिक का  नास्तिक .. ?

     जिथे थोथांड नाही,जिथे कर्मकांड नाहीत,जिथे दक्षिणेच्या रूपातील खंडणीची सक्ती नाही आणि जिथे मन प्रसन्न करणारे वातावरण आहे,अशा धार्मिक स्थळी मी इतरांबरोबर आपसूक नतमस्तक होतो.अशा स्थळांवर जाणे मला आवडते.मला काही कोणाची त्यासाठी जबरदस्ती नसते,पण ते आपोआप घडते. याचा अर्थ मी पूर्णपणे नास्तिक नाही..!
    जिथे कर्मकांड सुरु असतात..जिथे अमुकच कपडे घाला,अशी सक्ती असते..बेल्ट काढा..फक्त लुंगी लावा.अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आज्ञा असतात,जिथे दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांच्यासाठी वेगळ्या रांगा आणि श्रीमंत  भाविकांसाठी विशेष सोय असते,तिथे मी सरळ बाहेर उभा राहतो.दर्शन घेत नाही.तिथे बहुदा मी नास्तिक ठरतो.

   माझ्या घरी सकाळी  लावलेल्या अगरबत्तीचा सुवास घरातील वातावरण प्रसन्न करतो,हे देखील खरं आहे.

मी शोध घेतोय …..          मी नेमका काय आहे..?        आस्तिक कि  नास्तिक ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी