डॉक्टर ! तुम्हीसुद्धा.....




गर्भलिंग चाचण्या करताना कारवाईच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी सोनोग्राफी सेंटरमध्ये गणपती लक्ष्मीचे फोटो ठेवले जातात. मुलगा असल्यास गणपतीच्या फोटोकडे आणि मुलगी असल्यास लक्ष्मीच्या फोटोकडे केवळ बोट दाखवले जाते. त्याशिवाय सांकेतिक भाषेत इंग्रजीत मंडे आणि फ्रायडे असे सांगितले जाते. मंडेच्या इंग्रजी स्पेलिंगची सुरुवात 'एम' म्हणजे मेल आणि फ्रायडेची सुरवात 'एफ'ने होते. 'एफ' म्हणजे फिमेल असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते.
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाने राज्यातील ६० डॉक्टर गर्भवती महिलांच्या पाच नातेवाईकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. त्यापैकी बहुतांश डॉक्टर पुणे, धुळे जळगावमधील आहेत. दरम्यान, गुप्तपणे अशा चाचण्या करणाऱ्या डॉक्टरांवर गुप्तचरांमार्फत नजर ठेवण्यात येत आहे.

गर्भलिंग चाचण्यांप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. त्यासाठी व्हिजिलन्स इतर गुप्तचर यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. या चाचणी करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेसमोरही होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत राज्यातील ६० डॉक्टरांवर कारवाई केली आहे. केवळ डॉक्टरच नव्हे तर गर्भवती महिलेला गर्भलिंग चाचणी करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून पाच नातेवाईकांवरही कारवाई झाली आहे.

गुप्तपणे गर्भलिंग चाचण्या करणाऱ्या केंद्रांवर छापेही टाकण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी सातारा येथे रुग्णवाहिकेत गर्भलिंग चाचणी करताना डॉक्टरांना रंगेहाथ पडकले होते. पण आरोग्य विभागाच्या भरारी पथकाला प्रत्येक वेळेस संबंधितांना रंगेहाथ पडकता येत नाही. राज्यात कारवाई होत असल्यामुळे गर्भवती महिलांना शेजारील राज्यांतही नेले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

एक छोटासा प्रयत्न

गणपती बाप्पा मोरया...

अभिनंदन केले पाहिजे

तूच तुझी वैरी

त्या आठवणी...