का नाकारला फळांचा राजा?
युरोपीय देशांनी आंबा या फळावर आणि वांग,कारलं,पडवळ आदी भाजीपाला आयातीवर १ मे पासून बंदी घातली असून ती पुढच्या डिसेम्बर पर्यंत कायम राहील.हा मुदा सर्व ठिकाणी गाजतो आहे.हा व्यापार अडथला आहे,युरोप जाणूनबुजून भारताला अशी वागनुक देत आहे.मात्र या गदारोळात वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी.तेव्हाच समस्येवर योग्य दिशेने काम करून उपाय काढता येईल.कोणताही शेतमाल निर्यात केला जातो त्या वेळी दोन गोष्टीना सर्वोच महत्व दिलं जातं.एक म्हणजे संबधित मालात कीड नाशकांच्या अवशेष प्रमाण दुसरी म्हणजे संबधित माल कीटक व रोगजन्यू बुरशी पासून मुक्त असायला हवा.युरोपने आंबा व भाजीपाला नाकरण्याचं कारण त्यात फळमाशी सापडली,युरोपात जी कीड सापडत नाही तेथे ती पोचली यामुळे तेथील शेतीला धोका पोचू शकतो.आणि अशी दक्षता युरोपच काय पण जगातील अन्य देश हि काटेकोरपणे घेतात.
अन्न सुरक्षितता व जॆव सुरक्षितता या गोष्टीना स्रवोच प्रध्यान देणारा खंड म्हणून युरोपीय देशाकडे पहिले जाते.त्या देशात शेत्मालाविषयी नियम खूप कडक आहेत.त्यात कसलीही तडजोड नाही अन्य देश सोडा त्यांच्या देशसाठी नियम तेच आहेत अलीकडेच मधमाश्यांना हानी पोचणारया कारणावरून तीन कीटक नाशकांच्या वापरावर युरोपने बंदी आणली कोणत्याही दबावाला बळी न पडता युरोपने शेतीच हित लक्षात घेऊन आपला निर्णय प्रमाण मानला.आपला माल रिजेक्ट केला कि त्या देशावर टीका व्हायला सुरवात होते.पण का होते ते शोधून काढून त्याच्यावर विचार करून मार्ग शोधणे हे खूप महत्वाचे आहे.एकमेकांशी स्पर्धा करतांना आमचाच माल सर्वोत्तम व आरोग्याला सुरक्षित कसा करता येईल हे देखील खूप गरजेचे आहे.शेतकरीनि देखील यात लक्ष ठेवणे गरजेचे आहे प्रशिक्षण देणे हि काळाची गरज आहे.

टिप्पण्या