निवडणुकीचे काम ऎच्छिक असावे
निवडणुकीचे काम ऎच्छिक असावे - २४ एप्रिल ला मतदान केंद्रावर निवडणुकीचे काम करत असताना ठाण्यातील शाळेत मुख्याधापिका म्हणून काम पाहणाऱ्या वेशाली भाले यांचा मृत्यू झाल्याची घटना सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी आहे.शाळेतील काम,घरच्या जवाबदाऱ्या यामुळे माणूस पार त्रासून जातो त्यात निवडणुकीचे अतिरिक्त काम त्यामुळे माणसाची घुसमट हि होणारच याचा निवडणूक आयोग कधी विचार करणार? सर्वाना कामावर येण्याची निवडणूक आयोगाने सक्ती करू नये.जे येणार नाहीत त्याच्यावर कारवाहीची भाषा करू नये.निवडणुकीचे काम ऎच्छिक असावे.कारण हे काम अतिशय वेळखाऊ आहे.हातावर १००-१५० रुपये ठेवले हि त्यांची मेहरबानी समजाची प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी चार पाच वाजता घरातून बाहेर पडायचे व सर्व पेट्या सील बंध होऊन त्या निवडणूक आयोगाच्या हवाली करेपर्यंत थांबायचे.यात २४ तास सहज जातात काम करणारयावर किती ताण येत असेल याचू कप्लना निवडणूक आयोगाला कधी होणार.आज या देशात हजारो सुशीषित बेरोजगार तरून नोकरीसाठी वणवण भटकत आहेत,त्यांना प्रशिषण देऊन त्यांची या कामासाठी नेमणूक करावी जेणेकरून शिक्षकंचा त्रास कमी होईल.
टिप्पण्या