फेसबुक प्रोफाइल खोटं असेल तर...

सोशल नेटवर्किंगमुळे सेलिब्रिटीज चाहत्यांच्या अधिक जवळ आले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत, सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने खोटी प्रोफाइल्स बनवून त्यात गैरप्रकार होण्याचे प्रकार वाढले आहेत. सेलिब्रेटीजनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली असली तरी खोट्या प्रोफाइल्सना आजही लाखोच्या संख्येने हिट्स मिळतायत. अशा बनावट सेलिब्रिटी प्रोफाइल्सपासून आपणही सावध राहणं आवश्यक झालं आहे.

कशी ओळखावीत?

सर्वसामान्यपणे ख-या सेलिब्रिटीजची पेजेस व्हेरीफाइड असतात. ज्यामध्ये सेलिब्रिटीच्या नावापुढे निळ्या रंगाची, बरोबर असं दर्शवणारी अशी टिक असते, जी फेसबुककडूनच व्हेरीफाइड म्हणून पुरवली जाते. पेजला व्हेरिफाइडची टिक नसेल तर त्या पेजशी ऑफिशिअल वेबसाइट्सच्या लिंक कनेक्ट केलेल्या असतात. खोट्या पेजवरुन शेअर होणारा आशय अनेकदा इंटरनेटवर असणारे फोटो किंवा बातम्यांच्या लिंकच असतात. ख-या प्रोफाइलवरुन अनेकदा सेलिब्रिटीजचे आधी न पहिलेले फोटो आणि खासगी मतं शेअर केली जातात. फेसबुक शिवाय ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अनेक सेलिब्रिजची खोटी अकाऊंटस असून त्यांनाही लाखोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत.

फेसबुकवरील खोट्या प्रोफाइल्सच्या बाबतीत भारत हा अव्वल दोन देशांमध्ये येतो. त्यामुळेच फेक अकाऊंट कशी ओळखावी याबद्दल दिलेल्या काही टिप्स.

*फेसबुक प्रोफाइल खोटं असेल तर...

प्रोफाइल फोल्डरमध्ये एकच फोटो असेल.

अनेक दिवसांपासून अकाऊंटवरुन काहीही अॅक्टिव्हिटी झाली नसेल.

फेसबुक वॉलवर फक्त फ्रेंडस अॅड केल्याच्या नोटीफिकेशन असल्यास.

अकाऊंटच्या फ्रेंडलिस्टमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्ती जास्त असल्या तर.

मुली सोशल साइट्सवर मोबाइल नंबर देणं टाळतात, त्यामुळे मुलीचा मोबाइल नंबर दिलेला असल्यास.

प्रोफालच्या शिक्षण आणि कामाच्या जागेवर काहीतरी थिल्लर माहिती दिली असल्यास.

अकाऊंटमध्ये १/१/XX किंवा ३१/१२/XX अशा लक्षात राहण्यास सोप्या तारखा वाढदिवस म्हणून वापरल्या असल्यास.

कायदा काय सांगतो?

एखाद्या व्यक्तीच्या नावाने खोटं अकाऊंट बनवणं हा गुन्हा आहे. २००८मधील सुधारीत आयटी अॅक्टनुसार एखाद्या व्यक्तीचं खोटं अकाऊंट बनवल्याप्रकरणी दोषी अढळल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर या अकाऊंटचा वापर करुन कुठलीही माहिती इंटरनेटवर टाकल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....