मोबाइलला आचारसंहिता लावली तर.??
आई-बाबा ऑफिसमधून थकून भागून आले की मुलांनी त्यांना पाणी देणं, जरा मोठी, कळती मुलं असतील तर त्यांनी आई-बाबांना चहा करून देणं. या किती सामान्य गोष्टी आहेत. पण हल्लीची मुलं आई-बाबांनी घरात पाय ठेवला रे ठेवला की, आधी त्यांच्या हातातील फोन मिळविण्यासाठी त्यांच्यावर एखाद्या पाळतीवर असलेल्या मांजरासारखी झेप घालतात. फोन घेवून काय करतात तर तासन्तास गेम खेळत बसतात. हातातील फोन जसे स्मार्ट झालेत तशी अगदी दुसरी-तिसरीत जाणारी मुलंही असे स्मार्टफोन स्मार्टली खेळू लागली आहेत. आपल्या कामाचा फोन आपल्या मुलांसाठी खेळण्याचं साधन बनला, याबाबत अनेक आई-बाबांची अजिबात तक्रार नाही. मुलाचं फोनवर गेम खेळणं या गोष्टीकडे अगदी सामान्य बाब किंवा मुलांची आवड म्हणून बघणारे आई-बाबा त्यांच्याही नकळत फोनकडे बेबी-सिटर म्हणून कधी पाहू लागले, ते त्यांनाही कळलं नाही. फोनवर काय गेमच तर खेळताहेत, म्हणून बिनधास्त राहणार्या आई-बाबांना खडबडून जागे करणारे मुलांचे मोबाइलवरचे प्रताप हल्ली उजेडात येऊ लागले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे नेट कनेक्टिव्हिटी असलेल्या या फोनवर नकोत्या वयातील मुलांनी ‘नक...