मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल

मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच 10 जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासननं एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर 18 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेची भायखळा ते सीएसटीपर्यंतची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळं 100 हून अधिक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
या काळात बेस्टच्या ज्यादा बसेस भायखळा आणि सीएसटी दरम्यान सोडण्यात येणार आहेत. तसेच 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या 42 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रिटीशांनी 1879 साली हँकॉक ब्रिज बांधला. या ब्रिजचा अडथळा येत असल्यानं लोकलच्या वेगावर मर्यादा येत होती. तसेच ब्रिजची उंचीही कमी असल्यानं ट्रॅकची ऊंचीही वाढवता येत नव्हती. त्यामुळं या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते.
9 जानेवारीला या गाड्या रद्द :
पंढरपूर – सीएसटी मुंबई पॅसेंजरसाईनगर शिर्डी – सीएसटी मुंबई पॅसेंजरसोलापूर – सीएसटी मुंबई एक्स्प्रेसनागपूर – सीएसटी मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसअमरावती – सीएसटी मुंबई एक्स्प्रेसलातूर – सीएसटी मुंबई एक्स्प्रेसश्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस – सीएसटी मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसगोरखपूर – सीएसटी मुंबई स्पेशल
10 जानेवारीला या गाड्या रद्द :
सीएसटी मुंबई – भुसावळ पॅसेंजरसीएसटी मुंबई – पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेससीएसटी मुंबई – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेससीएसटी मुंबई – नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसृसीएसटी मुंबई – मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेससीएसटी मुंबई – मनमाड राज्य राणी एक्स्प्रेससीएसटी मुंबई – अमरावती एक्स्प्रेससीएसटी मुंबई – लातूर एक्स्प्रेससीएसटी मुंबई – सोलापूर एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पंढरपूर एक्स्प्रेससीएसटी मुंबई – साईनगर शिर्डी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमनमाड – सीएसटी मुंबई राज्य राणी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमनमाड – सीएसटी मुंबई पंचवटी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई प्रगती एक्स्प्रेसभुसावळ – सीएसटी मुंबई पॅसेंजरपुणे – सीएसटी मुंबई डेक्कन एक्स्प्रेसश्री शाहू छत्रपती शाहू महाराज टर्मिनस – सीएसटी मुंबई कोयना एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
9 तारखेला या गाड्याचं शॉर्ट टर्मिनेशन :
नांदे़ड – सीएसटी मुंबई तपोवन एक्स्प्रेस (नाशिकपर्यंत धावणार)
10 तारखेला या गाड्याचं शॉर्ट टर्मिनेशन :
मडगाव – सीएसटी मुंबई कोकणकन्य एक्स्प्रेस (पनवेलपर्यंत धावणार)सोलापूर – सीएसटी मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस (दादरपर्यंत धावणार)गोंदिया – सीएसटी मुंबई विदर्भ एक्स्प्रेस (ठाण्यापर्यंत धावणार)श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस – सीएसटी मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (ठाण्यापर्यंत धावणार)नागपूर – सीएसटी मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस (दादरपर्यंत धावणार)नागपूर – सीएसटी मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (दादरपर्यंत धावणार)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

अभिनंदन केले पाहिजे

मायाजाल